22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

तुम्हीही मधुमेहाने त्रस्त आहात? तर ‘ही’ फळं अजिबात खाऊ नका, अन्यथा होऊ शकतात गंभीर परिणाम


मुंबई, 29 जुलै :  आरोग्य चांगलं राखण्यासाठी पौष्टिक आहार आवश्यक असतो. पौष्टिक म्हणजेच संतुलित आहार म्हटलं, की त्यात फळं, भाजीपाला, तृणधान्यं, कडधान्यं, सुका मेवा, दूध अशा विविध घटकांचा समावेश असणं अपेक्षित असतं. फळं आपल्या रोजच्या आहारात असणं अत्यंत चांगलं असतं. त्या त्या हंगामातली फळं आहारात असली, तर शरीराचं चांगलं पोषण होतं आणि प्रतिकारशक्तीही कणखर होते. कारण फळांमध्ये शरीराला आवश्यक असलेल्यापैकी बहुतांश पोषक घटक असतात.

त्यात अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांचा समावेश असतो. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि फ्री-रॅडिकल्समुळे शरीराच्या होणाऱ्या नुकसानापासून बचाव करण्यास मदत होऊ शकते. मात्र फळांच्या सेवनात एक जोखमीचा घटक असू शकतो, तो म्हणजे शर्करा अर्थात शुगर कंटेंन. त्याचा विचार फळांचा आहारात समावेश करताना करायला हवा. त्या संदर्भात जाणून घेऊ यात. ‘अमर उजाला’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

फळांमध्ये नैसर्गिक शर्करा असते. त्यामुळे फळं खाल्ल्यानंतर रक्तातली साखर वेगाने वाढते. त्यामुळे डायबेटीजग्रस्तांना फळं खाणं धोकादायक ठरू शकतं. तसंच वजन वाढण्याचा धोकाही असल्याने फळं खाणं अन्य काही व्यक्तींनाही त्रासदायक ठरू शकतं; म्हणूनच फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स तपासल्याशिवाय ती खाऊ नयेत, असा सल्ला आहार तज्ज्ञांकडून दिला जातो.

ग्लायसेमिक इंडेक्सच्या साह्याने खाद्यपदार्थातल्या कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण मोजलं जातं. तसंच, त्यावरून हेही कळतं, की तो पदार्थ खाल्ल्यावर रक्तातली साखर किती वेगाने वाढू शकेल. सर्वसाधारणपणे 55 पेक्षा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाणं आरोग्यासाठी लाभदायक असतं, असं मानलं जातं. कोणत्या फळांमध्ये साखरेचं प्रमाण अधिक असतं, ज्यामुळे रक्तशर्करा वाढण्याचा धोका असतो, ती फळं कोणती हे जाणून घेऊ यात.

अंजीर हे अनेक पोषक तत्त्वांनी युक्त असलेलं फळ. त्याचा शरीराला खूप चांगला उपयोग होतो. शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी अंजीरांचं सेवं लाभदायक ठरतं; मात्र अंजीराचं सेवन केल्यास रक्तातल्या साखरेची पातळी वेगाने वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे बहुतांश डायबेटीजग्रस्तांना अंजीर न खाण्याचा सल्ला दिला जातो.

द्राक्षंदेखील प्रकृतीस्वास्थ्यासाठी चांगली असतात. तो व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत असतो. व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याने द्राक्षांचं सेवन लाभदायक ठरतं; मात्र द्राक्षांमध्ये देखील साखरेची मात्रा मोठ्या प्रमाणात असते. एक कप द्राक्षांमध्ये सुमारे 23 ग्रॅम साखर असते. त्यामुळे डायबेटीज असलेल्या व्यक्तींनी द्राक्षं खाणं धोक्याचं ठरू शकतं. कारण त्यामुळे रक्तशर्करा वेगाने वाढू शकते.

‘या’ पदार्थांचा जेवणात वापर करून आजारांना करा हद्दपार, तुम्ही कल्पना केली नसेल इतके आहेत फायदे

आंबा हे सर्वांच्या विशेष आवडीचं फळ. त्याला फळांचा राजा म्हणतात ते काही उगीच नव्हे. त्याची चव, रंग आणि शरीराला असलेले उपयोग या सगळ्याच बाबी उत्तम असतात. त्यात तंतुमय पदार्थ अर्थात फायबर्सचं प्रमाण जास्त असतं. तसंच, अन्य पौष्टिक घटकही असतात. त्यात व्हिटॅमिन ए देखील असतं; मात्र आंब्यात साखरेचं प्रमाणदेखील खूप जास्त असतं. एका आंब्यात सुमारे 46 ग्रॅम साखर असू शकते. त्यामुळे डायबेटीजग्रस्तांनी आंबे खाल्ल्यास रक्तातली साखर वेगाने वाढू शकते. तसंच, डायबेटीज नसलेल्यांनीही आंबे भरपूर प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढण्याचा धोका असतो.

त्यामुळे कोणत्याही फळांचा आहारात समावेश करण्यापूर्वी डायबेटीज असलेल्यांनी, तसंच लठ्ठ व्यक्तींनी आहारतज्ज्ञ किंवा आपल्या डॉक्टर्सचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे. आपल्या प्रकृतीला साजेशी फळंच खावीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News