3.5 C
New York
Wednesday, February 21, 2024

आर्थिक लाभ आणि नावलौकिक वाढेल जाणून घ्या दैनंदिन राशी भविष्य


मुंबई, 28 जुलै: आज दिनांक २८ जुलै २०२३ . वार शुक्रवार .आज अधिक श्रावण शुक्ल दशमी. आज चंद्र वृश्चिक राशीत भ्रमण करेल. श्री गणेशाचे स्मरण करून पाहूया बारा राशींचे राशी भविष्य.

मेष

आज चंद्र भ्रमण अष्टम स्थानात होणार असून शारिरीक क्षमता कमी होईल . मानसिक क्षोभ वाढेल. घरात जास्त काम पडेल. राशीत असलेला गुरू मदत करेल. दिवस मध्यम आहे.

वृषभ

सप्तम स्थानातील चंद्र भ्रमण कौटुंबिक सुख दर्शवित आहे. . शनि कर्म स्थानी आहे . नोकरीमध्ये काळजी घ्या. कार्यालयीन कामात जागरूक रहा. व्यय राहू परदेश प्रवास घडेल असे सुचवीत आहे..चांगला दिवस.

मिथुन

राशी स्वामी बुध रवि धनस्थानात असून कार्यालयीन बाबीत उत्तम संधी देईल. आरोग्य मध्यम राहील. षष्ठ चंद्र नातेवाईक भेट घडवेल. लाभ स्थानातील ग्रह शुभ असून संतती सुख मिळेल. दिवस चांगला..

कर्क

राशीच्या पंचम स्थानात चंद्र कौटुंबिक बाबींना प्राधान्य द्या असे सांगत आहे. सामाजिक जीवन उत्तम राहिलं. वैवाहिक सौख्य मिळेल. नाते संबंध आणि आर्थिक बाजू जपा. दिवस उत्तम .

सिंह

आज चंद्र चतुर्थ स्थानात असून घर आणि व्यवसाय दोन्हीकडे लक्ष द्यावे लागेल .धर्म आणि पूजा पाठ यात आस्था वाढेल. राशीतील मंगळ शुक्र आकर्षक व्यक्तिमत्व देतील. पण स्वभाव तेज होईल. चांगला दिवस.

कन्या

दिवस उत्तम असून तृतीय स्थानात चंद्र भावंडांना वेळ द्या असे सांगत आहेत. नवीन संपर्क होईल. व्यवसायानिमित्त प्रवास होतील. आर्थिक लाभ,आणि नावलौकिक वाढेल. संतती सुख देइल..दिवस मध्यम.

लग्नाला उशीर होण्यासाठी कुंडलीतील ही कारणेही जबाबदार, सोपे ज्योतिषीय उपाय

तुला

एक चांगला दिवस असून केलेल्या कामाचे चांगले फळ मिळेल . वरिष्ठ कामाची दाखल घेतील. सामाजिक जीवनासाठी ठीक असून प्रवास योग येतील. कर्ज मुक्ती होईल.पैसा मिळेल. दिवस बरा .

वृश्चिक

आज राशीतील चंद्र भ्रमण आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात यश आणेल. व्यवसाय व आरोग्य मध्यम राहिल. मंगळ शुक्र दशमात एकूण सर्व बाबीत खर्च होतील. दिवस मध्यम.

धनु

चंद्र व्यय स्थानात असून विशेष फळ प्रदान करीत आहे .आनंदी राहण्याचा दिवस आहे. वैवाहिक जीवन चांगले राहील. प्रवास होतील. आर्थिक, व्यावसायिक आणि प्रकृतीच्या बाबत मध्यम दिवस.

मकर

आज लाभ स्थानात चंद्र भ्रमण अनेक घडामोडी करेल. प्रवास होतील. संतती खुश राहील. धार्मिक आस्था वाढीस लागेल. वैवाहिक जीवन मध्यम राहील. दिवस साधारण.

कुंभ

जपून राहण्याचा दिवस आहे. वैवाहिक जीवन मध्यम राहील. प्रवास होतील. आर्थिक, व्यावसायिक आणि प्रकृतीच्या बाबत काळजी घ्या. मित्र भेट होईल. दिवस बरा .

भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे पुनर्जन्माचे गूढ, कसा होतो व्यक्तीला दुसरा जन्म

मीन

आज दिवस सामाजिक दृष्टया चांगला आहे . व्यवसाय नोकरीसाठी शुभ. चंद्र भाग्यस्थानात असून प्रवास योग दाखवीत आहे. शत्रू पासून सावध राहा. वैवाहिक सुख उत्तम मिळेल. दिवस चांगला.

शुभम भवतू!!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News