22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

कसा असेल 28 जुलैचा दिवस? करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात


मुंबई, 28 जुलै: सितारा – द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa – The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 28 जुलै 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

दिवसासाठीचा सारांश : आज नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा. वर्तन सकारात्मक राहील याकडे लक्ष द्या. परिश्रम आणि समर्पणातून कामात यश मिळू शकेल तसंच विकासाच्या संधी दृष्टिक्षेपात येतील. ज्येष्ठ व्यक्ती किंवा गुरूजनांचे आशीर्वाद मिळवा. एखादी विकासाला पूरक अशी घटना अचानक घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवल्यास चांगले परिणाम होतील.

मेष (Aries) (21 मार्च ते 19 एप्रिल)

एक नवीन संवाद तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकतो. हा योगायोग मानू नका; कदाचित हे तुमचं भाग्य असू शकतं. तुमच्या मनातल्या विचारांनुसार कृती करा. तज्ज्ञ, मार्गदर्शक व्यक्तीचा सल्ला प्राधान्याने घ्या. नवीन संधीचा फायदा घ्या. कृती करण्यास घाबरू नका. अलीकडच्या आर्थिक घटनांचा तुमच्या अर्थ विषयक विचारांवर प्रभाव असेल. नवीन घडामोडी स्वीकारा. पैशाची आवक कशी वाढेल याकडे लक्ष द्या. खरेदी करताना जागरूक रहा. शरीर आणि त्याच्या हालचालींविषयी जागरूक राहल्यास वैचारिक स्पष्टता येईल. स्वतःची काळजी घेण्यास प्राधान्य द्या. तुमच्यासाठी अनुकूल वेळापत्रक तयार करा.

LUCKY Sign – A Lifeboat Or a Depiction Of One

LUCKY Color – A Magenta

LUCKY Number – 65

वृषभ (Taurus) (20 एप्रिल ते 20 मे)

तुमची प्रेमाविषयीची विनंती लवकरच मंजूर होईल. तुमच्या मनाला अपेक्षित असलेली शांतता आणि समाधान नात्यातून मिळेल. प्रक्रियेवर विश्वास ठेवा. साहित्यिकांना यश मिळू शकतं. नाटयमय घडामोडींकडे चौकसपणे पहा. तुम्ही करिअरला जास्त महत्त्व द्याल. नवीन पोझिशन्स आणि अन्य संधींवर बारीक लक्ष ठेवा. तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल. आरोग्यासाठी नियमित तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वतःची योग्य काळजी घेतली तर मनःशांती लाभेल.

LUCKY Sign – A Carnation

LUCKY Color – Purple

LUCKY Number – 5

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

तुम्हाला हवं असलेलं प्रेम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी विश्व एकत्र काम करत आहे. नवीन संधीचा लाभ घ्या. तुमचे विचार तुम्हाला नातेसंबंधांत समाधान मिळवून देऊ शकतात. जोपर्यंत नोकरीत भरभराट सुरू आहे, तोपर्यंत तुम्हाला यश मिळत राहील. धैर्याने प्रयत्न करा. संधीकडे दुर्लक्ष करू नका. मेहनत आणि परिश्रमाचे चीज होईल. खूप आश्वासनं दिलेली असली तरी त्यावर किती पैसा खर्च करायचा याचा विचार करा. आर्थिक स्थितीकडे बारकाईने लक्ष द्या. नवीन शक्यता दिसल्यास त्याचा लगेच फायदा घ्या. सूज्ञपणा आणि योग्य प्रमाणात खर्च केला तर तुम्हाला आर्थिक सुरक्षितता आणि यश मिळेल. कोणत्याही समस्यांचे निराकरण करताना शारीरिक आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या. रोज स्वतःची काळजी घ्या आणि शरीराच्या गरजांकडे लक्ष द्या.

LUCKY Sign – Brown Bag

LUCKY Color – Neon Pink

LUCKY Number – 6

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

रोमँटिक लाईफमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घ्याल. नवीन नातेसंबंधाला सुरूवात, वचनबद्धता किंवा जुनं प्रेम पुन्हा भेटू शकतं. सर्वोत्तम गोष्टीच्या निवडीसाठी तुम्ही मनातली अंतःप्रेरणा आणि विचारांवर विश्वास ठेवा. कारण भविष्यात या गोष्टींशी तुम्हाला जुळवून घ्यावं लागेल. यश आणि नव्या अपेक्षा या व्दारे सूचित होतील. मात्र त्या लवचिक आणि अनुकूल ठरण्यासाठी भूतकाळातील गोष्टी कारणीभूत ठरतील. नवीन सुरुवात आणि पैसा मिळण्याची शक्यता आहे. करिअरची नवीन संधी आणि उत्पन्नाचा नवा स्रोत मिळू शकतो. या संधींचा फायदा घेताना तुमच्या खरेदीच्या सवयींकडे लक्ष द्या. आज थोडा वेळ आराम करा. फिरण्यासाठी घराबाहेर पडा. अर्थपूर्ण आणि सर्जनशील गोष्टींचा शोध घ्या. यातून तुम्हाला आनंद मिळेल.

LUCKY Sign – Ceramic Vase

LUCKY Color – Powder Blue

LUCKY Number – 16

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

आज रोमान्सची संधी मिळेल. यामुळे जोडीदारासोबत जवळीक निर्माण होईल. नवीन घटनांचा सामना करण्यासाठी तयार रहा. करिअरमध्ये उलथापालथ होऊ शकते. मात्र त्यातून तुमचा विकास होईल. परिस्थितीत बदल होत नसल्याने अस्वस्थ राहाल. तुमच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवा आणि आनंद देणारं काम करा. आर्थिक लाभ होऊ शकतो. परंतु, तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. आर्थिक उदिद्ष्टांवर लक्ष ठेवा आणि भावनेच्याभरात खरेदी टाळा. आरोग्याकडे लक्ष द्या. नियमित आरोग्याची तपासणी करा. शारीरिक, मानसिक आणि भावनिक गरजा समजून घ्या.

LUCKY Sign – An Engine

LUCKY Color – Charcoal Gray

LUCKY Number – 12

लग्नाला उशीर होण्यासाठी कुंडलीतील ही कारणेही जबाबदार, सोपे ज्योतिषीय उपाय

 कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

जीवनात आनंद आणि समाधान वाढवणाऱ्या एका नवीन व्यक्तीकडे आकर्षित व्हाल. नातेसंबंधांत संवाद आणि प्रामाणिकपणा गरजेचा आहे याची जाणीव होईल. आज सावधगिरी बाळगत कामातील विशिष्ट गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. कोणत्याही गोष्टीवर घाईघाईने निर्णय घेणं टाळा. सर्व पर्यायांचा योग्य विचार करा. आज उत्पन्न वाढू शकतं आणि नवीन आर्थिक संधी मिळू शकतात. बजेट तयार करताना सावधगिरी बाळगा. खर्चावर नियंत्रण ठेवा. नवीन गोष्टी सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळेल. नियमित तपासणी करून आरोग्याची काळजी घ्या.

LUCKY Sign – White Rose

LUCKY Color – Yellow

LUCKY Number – 11

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) : आज प्रेमसंबंधात चांगल्या आणि वाईट भावनांचे मिश्रण असेल. नव्याने प्रेमात पडताना संभाव्य वादापासून सावध रहा. जोडीदाराशी संवाद साधा आणि प्रामाणिक रहा. कार्यक्षेत्रात आज तुम्हाला संयम आणि दृढता ठेवावी लागेल. तुमच्या मार्गात अडथळे येऊ शकतात. परंतु, तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि उद्दिष्टांसाठी वचनबद्ध रहा. शेवटी तुमचं प्रयत्न फलदायी ठरतील. खर्चाकडे लक्ष द्या. अनावश्यक खर्च कमी करा. आर्थिक नियोजन करा. भविष्यासाठी बचत सुरू करा. शारीरिक अक्टिव्हिटीज, विश्रांती आणि आत्मनिरीक्षणासाठी वेळ यांचे नियोजन करा. तणाव आणि चिंता टाळा. आज प्रवासाचे नियोजन किंवा प्रवास करू शकता.

LUCKY Sign – A Milestone on the way

LUCKY Color – Beige

LUCKY Number – 10

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

लव्ह लाईफमध्ये चढ-उतार जाणवेल. आज जरी तुम्हाला अडथळ्यांचा सामना करावा लागत असला तरी भविष्य आशादायी आहे. ऑफिसमध्ये विविध आव्हानं असतील. या आव्हानांवर मात करावी लागेल. तुम्ही तुमच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा आणि चिकाटीने प्रयत्न करा. भावनेच्या भरात खरेदी टाळा आणि आर्थिक शिस्तीचे पालन करा. रोमांचक प्रवासाचा अनुभव घेण्याची ही योग्य वेळ आहे. मनमोकळे राहा. साहसाचा आनंद घेताना प्रवासात नियमांकडे दुर्लक्ष करू नका.

LUCKY Sign – Observing a Sparrow

LUCKY Color – Saffron

LUCKY Number – 25

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

लव्ह लाईफमध्ये सकारात्मक ऊर्जा जाणवेल. जोडीदारासोबत नवीन बंध जुळतील. परंतु, संभाव्य वादविवाद आणि गैरसमजांपासून सावध रहा. कामाच्या ठिकाणी प्रगती होऊ शकते. विकासाच्या नवीन संधी मिळू शकतात. परंतु, इतरांचा मत्सर आणि स्पर्धात्मक धोरणापासून सावध रहा. आर्थिक स्थिती सकारात्मक असेल. त्यामुळे विकासाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. परंतु, अनावश्यक खर्च टाळा आणि आर्थिक उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. ही शारीरिक आणि भावनिक धैर्याची परीक्षा पाहणारी वेळ आहे. तुमच्यात सर्व अडथळे दूर करून जिंकण्याची क्षमता आहे. स्वतःची काळजी घ्या. शारीरिक आणि भावनिक गरजांमध्ये निरोगी संतुलन राखा. प्रवासातून सकारात्मक ऊर्जा मिळे. नवीन अनुभव मिळाल्याने वैयक्तिक ग्रोथ होईल.

LUCKY Sign – An Aquarium

LUCKY Color – Pink

LUCKY Number – 16

भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे पुनर्जन्माचे गूढ, कसा होतो व्यक्तीला दुसरा जन्म

 मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

प्रेम जीवनात सकारात्मक बदल होईल. नवीन नातेसंबंधाला सुरुवात होऊ शकते. विसंवाद आणि गैरसमज टाळण्यासाठी प्रयत्न करा. हा तुमच्या करिअरमधला समृद्ध आणि यशस्वी कालावधी आहे. तुम्हाला नवीन ओळख मिळेल किंवा अनपेक्षित संधी मिळेल. फक्त आत्मसंतुष्टपणा किंवा गर्विष्ठपणा टाळा अन्यथा याचे दीर्घकालीन वाईट परिणाम होऊ शकतात. पैशाची आवक होईल आणि यामुळे आर्थिक स्थिती सुधारू शकते. अविचारी खर्च किंवा कृती टाळा. मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्य सुधारेल. सुट्टीसाठी नवीन ठिकाणे शोधा. सुरक्षितता आणि आरोग्यासाठी आवश्यक उपाययोजना करा.

LUCKY Sign – Seeing a copper vessel

LUCKY Color – Blue

LUCKY Number – 8

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

नातेसंबंधात मजबूत कनेक्शन आणि समर्पण गरजेचे आहे. नातेसंबंध सुंदर असतील आणि त्यातून समाधान मिळेल. भागीदारीत निर्णय घेणं किंवा अडचणींवर मात करणं कठीण ठरू शकतं. व्यवसायात बदल होऊ शकतो. परिवर्तन किंवा प्रगती शक्य आहे. उत्तम आरोग्यासाठी जीवनातले इतर घटक संतुलित करा. यासाठी आवश्यक गोष्टींचा शोध घ्या. प्रवासात वैयक्तिक अनुभव समृद्ध करतील. प्रवासादरम्यान अनपेक्षित विलंब होऊ शकतो.

LUCKY Sign – A Lamp Shade

LUCKY Color – Silver

LUCKY Number – 4

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

प्रेम आणि नातेसंबंधांतून भावनिक पूर्तता होईल. नातेसंबंधात काही गैरसमज किंवा मतभेद होऊ शकतात. या गोष्टी टाळण्यासाठी मुक्त संवाद गरजेचा आहे. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. परंतु, संभाव्य अडथळे आणि वादविवाद याची जाणीव असणं आवश्यक आहे. या गोष्टी हाताळण्यासाठी संयम आणि मुत्सद्देगिरी गरजेची आहे. नियमित व्यायम, संतुलित आहार आणि योग्य दिनचर्येमुळे आरोग्यात सकारात्मक सुधारणा होईल. अनपेक्षित प्रवासाचे योग आहेत. या प्रवासाचा पुरेपूर आनंद घ्या.

LUCKY Sign – Seeing or owning a Jewellery Box

LUCKY Color – Gold

LUCKY Number – 50

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News