23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

कसा असेल 29 जुलैचा दिवस? ऑफिस पॉलिटिक्समधून संयमाने मार्ग काढा


मुंबई, 29 जुलै: सितारा – द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa – The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 29 जुलै 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

दिवसासाठीचा सारांश : मेष राशीच्या व्यक्तींनी घरातलं वातावरण सलोख्याचं राखण्याला प्राधान्य द्यावं. रिलेशनशिप्समध्ये प्रेम आणि पॅशन अंगीकारावी. वृषभ राशीच्या व्यक्तींना घरी समाधान लाभेल आणि कामाच्या ठिकाणी यश मिळेल; मात्र थकवा येऊ नये यासाठी कामं वाटून द्यायला विसरू नका. मिथुन राशीच्या व्यक्तींनी घरातले भावनिक मुद्दे हाताळावेत. काम पुढे नेण्यासाठी तयार राहावं. कर्क राशीच्या व्यक्तींनी घरात शांतता प्रस्थापित होण्यासाठी आणि सुरक्षित नातेसंबंधांसाठी प्रयत्न करावेत. सिंह राशीच्या व्यक्तींनी उत्साहाने नेतृत्व करून कामाच्या ठिकाणी यश मिळवावं. स्वतःच्या स्वास्थ्याला प्राधान्य द्यावं. कन्या राशीच्या व्यक्तींनी घरी स्थिरता प्राप्त करावी, कामात कौशल्यवृद्धी करावी. तूळ राशीच्या व्यक्तींनी जीवनाच्या सगळ्या क्षेत्रांत संतुलन साधावं आणि खुला संवाद साधावा. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आरोग्य सुधारण्यासाठी भावनिक जखमा दुरुस्त करून परिवर्तनाचं स्वागत करावं. धनू राशीच्या व्यक्तींनी नाराजी सोडून द्यावी आणि संभाव्य ताजी रोमँटिक नाती शोधावीत, प्रगती साधावी. मकर राशीच्या व्यक्तींनी घरातलं वातावरण सुधारण्यासाठी आणि बिझनेसच्या कामांत सुधारणा होण्यासाठी प्रयत्न करावेत. कुंभ राशीच्या व्यक्तींनी भावनिक समाधानाचा शोध घ्यावा. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात हळूहळू परिवर्तन करावं. मीन राशीच्या व्यक्तींनी घरात ऊर्जा आणि सर्जनशीलता आणावी. शांततापूर्ण नातेसंबंध जोपासावेत.त अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवावा आणि समोर येणाऱ्या संधी हातच्या जाऊ देऊ नयेत.

कुंडलीत जर असं काही असल्याने होतात मृत्यूसमान वेदना, होतात हे गंभीर परिणाम

मेष (Aries) (21 मार्च ते 19 एप्रिल)

घरात शिस्त असणं गरजेचं आहे. संतुलित वातावरण राखणं आवश्यक आहे. पार्टनरशिप्स शांततापूर्ण असतील. प्रेमाचा स्वीकार करा आणि रोमँटिक काळ मनात साठवून ठेवा. आनंददायी फॅमिली रियुनियन होण्याची शक्यता आहे. सध्याच्या कामात यशप्राप्ती कराल, प्रोफेशनल आयुष्यात स्थिरता असेल. कटिबद्ध आणि फोकस्ड राहण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी स्वतःहून लादून घेतलेली बंधनं/मर्यादा कधी तरी ओलांडण्याचा प्रयत्न करा. आकर्षक बिझनेस संधी दिसतील. गुंतवणूक पर्यायांची निवड करताना सावधगिरी बाळगा. आर्थिक लाभाची शक्यता आहे. मुत्सद्दी नातेसंबंध जोपासा, वाद टाळा. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर व्हा. कौटुंबिक वाद असल्यास ज्येष्ठांचा सल्ला घ्या.

LUCKY Gemstone – Ruby

LUCKY Color – Red

LUCKY Number – 90

वृषभ (Taurus) (20 एप्रिल ते 20 मे)

दृढ भावनिक बंधांतून नातेसंबंध जोपासत असल्याने घरात शांतता, समाधान अनुभवाल. कुटुंबीयांचा दयाळूपणा, पाठिंबा अनुभवाल. कामाच्या ठिकाणी दखल घेतली जाईल. स्पष्टपणे संवाद साधायला हवा आणि सर्जनशीलपणे विचार करायला हवा. आर्थिक स्थिरता आणि सुरक्षिततेसाठी किरकोळ लढाई असेल. आर्थिक लाभ अपेक्षित आहे; मात्र नजीकच्या भविष्यात नाही. जवळच्या मित्राने योग्य वेळी दिलेल्या सल्ल्यामुळे फायदेशीर गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणच्या वातावरणात सुधारणा होण्यासाठी कोलॅबोरेशन्स करा. चांगलं आरोग्य आणि जोम यामुळे आनंदी असाल. सेलिब्रेशन्स आणि मजेशीर कौटुंबिक अनुभव अपेक्षित आहेत.

LUCKY Gemstone – White Sapphire

LUCKY Color – Green

LUCKY Number – 24

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

कुटुंबातल्या भावनिक समस्यांशी सामना करा. नव्या रिलेशनशिप्स आणि प्रेमविषयक धाडसांची शक्यता आहे. नातेवाईकांशी गुडविल राखावं, गैरसमज टाळावेत. तुमचं मन उत्साही, उत्सुक आहे. करिअरमध्ये प्रगतीसाठी खूप प्रयत्न घेत आहात. कामाचा थकवा टाळण्यासाठी कामं वाटून द्या. आर्थिक बाबतींत विवेक बाळगा. गुंतवणूक करण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घ्या. ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहा. वस्तुनिष्ठता राखा. स्वतःच्या काळजीला प्राधान्य द्या. क्षमाशीलता, हीलिंग या गोष्टींची नितांत गरज आहे.

LUCKY Gemstone – Citrine

LUCKY Color – Yellow

LUCKY Number – 47

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

मजबूत, समर्पित भागीदारी टिकून राहण्यासाठी काळजी घेणं, घरात शांतता टिकवणं गरजेचं आहे. कुटुंबीयांबद्दलच्या मर्यादा आखून घेतल्या पाहिजेत. प्रोफेशनच्या बाबतीत भावनिक बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलतेची उच्च पातळी पाहू शकता. कामाचं ठिकाण सपोर्टिव्ह आणि समाधानकारक होण्यासाठी प्रयत्न करू शकता. सध्याच्या पोझिशनमध्ये तुम्हाला थकल्यासारखं वाटू शकेल. त्यामुळे अन्य करिअर पर्याय धुंडाळा. या आठवड्यात अनपेक्षित स्रोतातून रोख रकमेचा लाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतली जोखीम आणि फायदे यांचं मूल्यमापन करण्याची क्षमता तुमच्याकडे असायला हवी. विनम्र राहा, वेगवेगळे दृष्टिकोन लक्षात घ्या. जोम आणि क्षमता प्राप्त होईल. वाद मिटवून पुढे वाटचाल करण्याचा विचार कराल.

LUCKY Gemstone – Onyx

LUCKY Color – Silver

LUCKY Number – 33

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

घरगुती बाबतीत संयम राखा, सहनशक्ती बाळगा. त्यातून प्रेम आणि काळजी घेणारी नाती जपली जातील. तुम्ही अशा परिस्थितीत असाल, की जिथे तुम्हाला एखाद्याला मदत करावी लागेल किंवा त्याच्या बाजूचा बचाव करावा लागेल. आज तुम्हाला तुमचे नेतृत्वगुण दाखवण्याची संधी मिळेल. चिकाटी ठेवा, बारीकसारीक तपशीलांकडे लक्ष द्या. कंपनीच्या कामासाठी स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगचा सल्ला दिला जाऊ शकतो. तातडीने आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून संभाव्य परतावा मिळण्याचे संकेत आहेत. तुमच्या करिष्म्याचा चांगला उपयोग करून घ्या आणि चांगला बदल होण्याच्या दृष्टीने प्रभाव पाडा. आरोग्य चांगलं राहील. औषधांवरचं अवलंबित्व कमी होईल. राग कमी करा. समेट घडवण्यासाठी क्षमाशील राहा.

LUCKY Gemstone – Emerald

LUCKY Color – Gold

LUCKY Number – 18

Vastu Tips: हा जीव आपल्यासाठी किती शुभ आणि किती अशुभ

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

पॅशनेट आणि मजबूत नातेसंबंध जोपासण्यासाठी वेळ व्यतीत केल्यावर गृहजीवनात व्यवहार्यता आणि स्थिरता येईल. तुमच्या जीवनातली विचित्र माणसं किंवा तसे नातेवाईक यांच्यापांसून अंतर ठेवा. नोकरीत कौशल्यवृद्धी आणि समर्पण भावना वाढेल. सहकाऱ्यांशी बंध वाढवा. चिकाटी ठेवा. बिझनेसमधल्या समस्यांना रचनात्मक पद्धतीने तोंड द्या. येत्या आठवड्यात आर्थिक चढउतार होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीचे निर्णय घेण्याआधी योग्य मार्गदर्शन घ्या. निष्पक्षपणे आणि पारदर्शक वागा. अंतर्मुख व्हा, स्वतःची काळजी घ्या. कुटुंब, वारसा या बाबींची दृढ जाणीव ठेवा.

LUCKY Gemstone – Moonstone

LUCKY Color – Blue

LUCKY Number – 25

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

संतुलन राखा आणि घराशी संबंधित निर्णय घ्या. ते प्रेम आणि भावनिक समाधानाचं प्रतीक ठरेल. सहकाऱ्यांशी मर्यादशील वागणं गरजेचं आहे. करिअरमध्ये आज उत्साह प्राप्त होईल. शांततामय आणि मदत करणारं वातावरण कामाच्या ठिकाणी असेल. कॉर्पोरेट सक्सेससाठी कोलॅबोरेशन आणि पार्टनरशिप्स शक्य आहेत. तुम्हाला अनुकूल ठरेल अशी फायनान्शियल रिकव्हरी लवकरच होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक मजबूत आणि सुरक्षित आहे. फरक असेल तर तो भरून काढा. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत संतुलन राखा, न्याय्य वागणूक ठेवा. सध्याच्या घडीला कुटुंबीयांशी खुला आणि प्रामाणिक संवाद साधावा लागण्याची शक्यता आहे.

LUCKY Gemstone – Coral

LUCKY Color – Pink

LUCKY Number – 12

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

इतरांना क्षमा करा आणि भावनिक जखमा भरण्यास मदत करा. जिथे रिलेशनशिप्समध्ये भावनिक गुंतवणूक असेल, तिथे उपाय शोधणं गरजेचं असेल. तुमच्या जवळच्या मित्रांना मदत करण्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. प्रोफेशनल लाइफमध्ये गुप्तता बाळगा, धोरणात्मक तयारी करा. कामाच्या ठिकाणी मोठ्या जबाबदारीसाठी आज दखल घेतली जाईल. नव्या, सर्जनशील बिझनेसविषयक संधी मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांनी केलेल्या कार्यवाहीमुळे तुम्हाला अनुकूल असे आर्थिक बदल होतील. गुंतवणूकविषयक निर्णय घेण्याआधी सखोल संशोधन करा. तुमची अंतःप्रेरणा आणि क्षमता यांचा उपयोग चांगला बदल घडवण्यासाठी करा. चांगल्या आरोग्याच्या दृष्टीने बदल आणि सुधारणा होतील. स्वतःची काळजी आणि भावनिक स्वास्थ यांसाठी काही वेळ राखून ठेवला पाहिजे.

LUCKY Gemstone – Turquoise

LUCKY Color – Black

LUCKY Number – 36

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

जुनी नाराजी जोडून द्या आणि घरात पुन्हा नवी सुरुवात करा. नवं प्रेम मिळण्याची, भावनिक प्रगती होण्याची शक्यता आहे. साह्य आणि मार्गदर्शन यांसाठी कुटुंबीयांशी चर्चा करा. तुमच्या प्रोफेशनमधला तुमचा उत्साह आणि ओरिजिनॅलिटी दाखवण्याची संधी मिळू शकेल. परीक्षा घेणाऱ्या प्रोफेशनल परिस्थितीत दृढता आणि सहनशक्ती दाखवा. सध्याच्या कंपनीच्या प्लॅन्सचं मूल्यमापन करून नव्या पर्यायांकडेही पाहायला हवं. हळूहळू, पण सातत्याने आर्थिक प्रगती होईल. गुंतवणूक करण्यापूर्वी सल्लागाराचा सल्ला घ्या. तुमच्या तत्त्वांशी एकनिष्ठ राहा आणि न्यायाची बाजू धरा. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत संतुलन, संयम राखा. कुटुंबीयांना अनुकूल अशा अ‍ॅडजस्टमेंट्स आणि संधींची शक्यता आहे.

LUCKY Gemstone – Pearl

LUCKY Color – Purple

LUCKY Number – 91

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

कष्ट आणि चिकाटीच्या साह्याने तुमच्या आजूबाजूचं वातावरण सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा. रिलेशनशिपमध्ये आधी काही समस्या असतील, तर आता भावनिक समाधान मिळेल. तुमचं यश एकट्याने साजरं करण्यापेक्षा प्रिय व्यक्तींसमवेत साजरं कराल. प्रोफेशनमधल्या समस्यांना सर्जनशील उत्तरं शोधाल. आज कामाच्या ठिकाणी नवे पर्स्पेक्टिव्ह्ज आणि संधी मिळतील. कमर्शियल ऑपरेशन्समध्ये यश आणि आर्थिक सुरक्षितता मिळेल. दीर्घकालीन फायद्याचे आर्थिक लाभ मिळणं शक्य आहे. दीर्घकालीन प्रकल्पांत गुंतवणूक करा. ऑफिस पॉलिटिक्समधून संयमाने मार्ग काढा. आरोग्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. कौटुंबिक सलोखा आणि क्षमता आज दिसेल.

LUCKY Gemstone – Diamond

LUCKY Color – Brown

LUCKY Number – 41

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

भावनिक अपेक्षांवर नियंत्रण ठेवा आणि घरगुती मुद्द्यांमध्ये पुढे वाटचाल करा. नव्या संभाव्य रोमँटिक शक्यतांचं स्वागत करा. जुन्याच्या वेदना विसरून जा. कुटुंबीयांशी संवाद साधताना, स्पष्ट राहा, विवेकीपणाने वागा. दिवसाच्या लॉजिकल रीझनिंगमुळे करिअरला लाभ होईल. संतुलन साधण्याचा आणि कामाच्या ठिकाणी जजमेंटचा प्रयत्न कराल. आधीच्या संकल्पनांकडे परत जाणं आणि प्रेरित होणं असा त्याचा अर्थ. आर्थिक स्थिरतेचा काळ. गुंतवणूक करण्याआधी आई-वडिलांशी चर्चा करा. ओरिजिनल विचार करण्याला, पुढचा विचार करण्यातून परिवर्तनाला प्रोत्साहन द्या.  कौटुंबिक समेट आणि क्षमाशीलता शक्य आहे.

LUCKY Gemstone – Blue Sapphire

LUCKY Color – Aqua

LUCKY Number – 3

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

वैयक्तिक आयुष्यात उत्साह आणि धाडस अनुभवता येईल. आनंदी आणि शांततापूर्ण रिलेशनशिप असेल. सल्ला आणि साह्यासाठी कुटुंबीयांची मदत घ्या. दिवसभर ऑफिसमध्ये सर्जनशील ऊर्जा आणि आकर्षकपणा असेल. खरं यश प्राप्त करण्यासाठी सहकार्य आणि टीमवर्कची आवश्यकता आहे. नव्या, सर्जनशील बिझनेस संधी मिळण्याची शक्यता आहे. नवी संकल्पना राबवल्यास आर्थिक यशाची अपेक्षा करू शकता. गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा. तुमच्या आकलनशक्तीच्या साह्याने ऑफिस पॉलिटिक्स खुबीने हाताळा. मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करा. योग्य सीमा आखा आणि कुटुंबाची बाजू सांभाळा.

LUCKY Gemstone – Opal

LUCKY Color – Sea Green

LUCKY Number – 52

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News