23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

जोडीदारासोबत वेळ घालवाल जाणून घ्या दैनंदिन राशी भविष्य


मुंबई , 29 जुलै: आज दिनांक २९ जुलै २०२३. शनिवार. आज अधिक श्रावण शुक्ल एकादशी. कमला एकादशी. चंद्र आज वृश्चिक राशीत भ्रमण करीत असून पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

मेष

अचानक व्यवसायात होणारे बदल त्रासदायक ठरतील. आज व्यवसाय, नोकरीत जास्त ताण पडेल. मानसिक ताण होईल. घराची जबाबदारी राहील. कुटंब आणि आर्थिक दृष्ट्या मध्यम दिवस. दिवस आनंदात जाईल.

वृषभ

आज दिवस शांततेने व्यतीत करण्याचा आहे . दशमात शनि वक्री , व्यय स्थानात ग्रह नुकसानीचे योग आणतील. प्रकृती जपा. पितृ चिंता संभवते. सप्तम चंद्र घरात आनंद निर्माण करेल. आर्थिक दृष्ट्या दिवस बरा.

Chanakya Niti: लक्ष्मीप्राप्तीसाठी फॉलो करा चाणक्याची ही नीती, का नष्ट होते मनुष्याची संपत्ती

मिथुन

काहीसा सामाजिक ताण उद्भवणार असून ईश्वरी पाठबळ राहील . खर्च खूप होईल. शनि लहान सहान दुखणी देईल. प्रवास टाळा. कोणालाही जामीन देऊ नका. धार्मिक आणि आर्थिक दृष्ट्या बरा दिवस.

कर्क

दशमात गुरू राहू योग आहे. राशी स्वामी चंद्र पंचम स्थानात सामाजिक जीवनात लाभाचे योग आणेल. संततिविषयी ताण अनुभव कराल.. गुरूचे पाठबळ व शुक्र नोकरीत चांगले फळ देईल . प्रकृती जपून काम करा. दिवस चांगला .

सिंह

राशीस्थानात शुक्र आणि मंगळ स्वतः वर फार खुश होऊ नका असे सांगत आहे. प्रकृतीची काळजी घ्या.. चतुर्थ चंद्र आहे महत्वाचे निर्णय होतील.. गुरू भाग्यात उत्तम साथ देईल. दिवस ईश पूजनात घालवा.

कन्या

सामाजिक आणि गृह क्षेत्रात काही कटकटी निर्माण होतील. प्रकृती नाजूक राहील. तृतीय चंद्र लाभ देणार असून कुटुंबीयांचे आरोग्याचे प्रश्न कमी होतील. संतती चिंतेत राहील. दिवस उत्तम. नामस्मरण करावे.

तुला

शुक्र मंगळ लाभात नोकरी मध्ये संधी देईल..अध्यात्मिक बाबीत खर्च भरपूर होईल .घरात सुखसोयी मध्ये वाढ होईल. सामाजिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील . जबाबदारी येईल. संतती कडे लक्ष द्या . प्रवासात जपून रहा. दिवस मध्यम.

वृश्चिक

दशमात मंगळ चंद्र वृश्चिक व्यक्तीना नोकरी निमित्त प्रवास,बढती देईल. वडिलांची प्रकृती जपण्याचे संकेत देत आहे . प्रयत्न पूर्वक जागरूक रहा. वैवाहिक जीवनात वादळ येऊ शकते. विवाहसौख्य , आर्थिक, धर्म कारण यासाठी उत्तम फळ देईल . ईश स्मरण करावे.

कुंडलीत जर असं काही असल्याने होतात मृत्यूसमान वेदना, होतात हे गंभीर परिणाम

धनू

गुरुकृपा आणि रवि बळ नोकरी व्यवसायात अडचणीतून मार्ग काढेल .पंचम गुरू व व्यय चंद्र सामाजिक दर्जा,आर्थिक भरभराट देईल.. प्रकृती ठीक राहील. संतती चिंता होईल. दिवस चांगला .

मकर

लाभ चंद्र आणि अष्टम मंगळ यांचा योग आहे त्यामुळे कौटुंबिक जबाबदारी, आर्थिक नुकसानीचे योग बनत आहे. वैवाहिक जीवन मध्यम राहील. प्रवास योग येतील . जोडीदारासोबत वेळ घालवाल. दिवस पूजेत व्यतीत करा.

कुंभ

शनी राशीमध्ये वक्री भ्रमण करीत आहे. कुंभ व्यक्ती आज ताण अनुभव करतील. चंद्र घरात जास्त जबाबदारी निर्माण करेल . प्रकृती जपा. नातेवाईक भेट होईल . मुलांचे प्रश्न सुटतील. संतती , व्यवसाय नोकरी साठी मध्यम दिवस.

मीन

राशी स्वामी गुरु सध्या राहू सोबत असून परदेश गमन होईल. चंद्राच्या भाग्य स्थानातील उपस्थिती मुळे आर्थिक लाभ आणि कौटुंबिक जीवनात अनेक गोष्टींमुळे प्रसिद्धी असा हा काळ आहे. कार्यालयीन जीवनात सुधारणा होईल. . दिवस मध्यम..

शुभ भवतू!!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News