27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

सकाळचा चहा सोडायचाय, पण डोकेदुखी होते? करा तज्ज्ञांनी सांगितलेला रामबाण उपाय – News18 लोकमत


मुंबई, 27 जुलै : अनेक जणांना सकाळी चहा घेण्याची सवयच लागलेली असते. त्यांची ही सवय कालांतराने त्यांचं व्यसन बनून जाते. त्यामुळे जर कधी त्यांना सकाळी चहा मिळाला नाही तर त्यांचं डोकं दुखायला लागतं. ही डोकेदुखी लोकांना सहन होत नाही. म्हणून त्यांची इच्छा नसतानाही त्यांना चहा घ्यावाच लागतो. मात्र आज आम्ही तुम्हाला अशी एक रेमेडी सांगणार आहोत, जी तुमची ही डोकेदुखी दूर करण्यास मदत करेल.

इंस्टाग्रामवर डॉक्टर दीक्षा यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या अनेक रुग्णांना उच्च रक्तदाब, हँगओव्हर, ताप, नेहमीचा चहा वेळेवर न मिळणे, मायग्रेन, निद्रानाश, ताणतणाव यामुळे डोकेदुखीचा सामना लागतो. तर काही रुग्णांना कॅफीन (चहा/कॉफी) , गोड पदार्थ, तंबाखू, दारू यांसारखे व्यसन सोडण्याचा प्रयत्न केल्यावर डोकेदुखी होते.

मात्र या डोकेदुखीवर उपाय म्हणून त्यांनी एक आयुर्वेदिक रेसिपी सांगितली आहे, ज्याचा त्यांच्या रुग्णांनाही फायदा झाला आहे. त्यामुळे जर तुम्हाला मायग्रेन, हार्मोनल असंतुलन, हँगओव्हर, अनियंत्रित मधुमेह, इन्सुलिन रेझिस्टन्स, ब्लोटिंग, अन्नाची तीव्र इच्छा होणे असे त्रास होत असतील किंवा तुम्ही एखादे व्यसन सोडण्याचा प्रयत्न करत असाल तर या आयुर्वेदिक चहाचा वापर करा.

आयुर्वेदिक चहासाठी लागणारे साहित्य

1 ग्लास पाणी (300 मिली)

अर्धा चमचा ओवा (कॅरम सीड्स)

1 बारीक ठेचलेली वेलची

1 टीस्पून धणे

5 पुदिन्याची पाने

डोकेदुखी कमी करणारा चहा बनवण्यासाठी वरील सर्व गोष्टी घेऊन एका पातेल्यात मध्यम आचेवर 3 मिनिटे उकळवा आणि तुमचा आयुर्वेदिक चहा तयार होईल.

या चहाचे वैशिष्ठ्य

– ओवा पोट फुगणे, अपचन, खोकला, सर्दी, मधुमेह, दमा आणि वजन कमी करण्यास मदत करते.

– चयापचय, मायग्रेन डोकेदुखी, हार्मोनल संतुलन आणि थायरॉईड सुधारण्यासाठी धणे सर्वोत्तम आहेत.

– चहाचे व्यसन, मूड विंग्स, निद्रानाश, ऍसिडिटी, मायग्रेन, कोलेस्ट्रॉल आणि बरेच काही दूर करण्यासाठी पुदिन्याची पाने उपयुक्त ठरतात.

– वेलची मोशन सिकनेस, मळमळ, मायग्रेन, उच्च रक्तदाब आणि अगदी त्वचा आणि केसांसाठी चांगली आहे. कारण त्यात अँटी-ऑक्सिडेंट असतात.

– सामान्य चहाऐवजी डोकेदुखी दूर ठेवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी सकाळी सर्वात आधी हा चहा घ्या.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News