27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

स्वच्छतागृहे ही एक सर्वसमावेशक जागा तयार करण्यासाठी, स्वच्छतागृहे परिचारकांना ज्ञानाने सुसज्ज करणे – News18 लोकमत


स्वच्छतागृहे ही मानवी प्रतिष्ठा, आरोग्य आणि कल्याणासाठी आवश्यक जागा आहे. परंतु सार्वजनिक शौचालये वापरणे प्रत्येकाला आरामदायक किंवा सुरक्षित वाटत नाही. विशेषत: जे लोक उपेक्षित ह्या गटात मोडतात, जसे की ट्रान्सजेंडर , अपंग आणि खालच्या जातीतील लोकांना ही असुरक्षितता जास्त वाटते. ह्या गटातील लोकांना बरेचदा सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये भेदभाव, छळ आणि हिंसाचाराचा सामना करावा लागतो. ह्या सगळ्याचे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. म्हणून,  स्वच्छतागृहे वापरणाऱ्या सगळ्यांच्या विविधतेचा आणि गरजांचा आदर करणाऱ्या सर्वसमावेशक जागा तयार करणे खूप महत्वाचे आहे.

सार्वजनिक शौचालयांच्या सर्वसमावेशकतेवर प्रभाव टाकणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे शौचालय परिचारक. हे लोक सार्वजनिक शौचालये व्यवस्थापित करतात, स्वच्छ करतात आणि त्यांची देखभाल करतात. ते दररोज शौचालय वापरकर्त्यांशी संवाद साधतात. त्यामुळेच वापरकर्त्यांसाठी सकारात्मक किंवा नकारात्मक अनुभव निर्माण करण्याची शक्ती त्यांच्यात असते. परंतु अनेक शौचालय सेवकांकडे   वापरकर्त्यांशी आदरपूर्वक आणि सहानुभूतीपूर्वक व्यवहार करण्याचे ज्ञान आणि कौशल्ये नसते. हे लोक जुन्या आणि पूर्वग्रह दूषित विचार सरणीचे असल्यामुळे त्याची एका विशिष्ट गटाप्रती असलेली वागणूक आणि वृत्तीमुळे परिणाम होतो. त्यांना ह्या विशिष्ट गटांना सार्वजनिक शौचालये वापरताना त्यांच्या पुढे असलेली आव्हाने आणि त्यांच्या भिन्न गरजा यांची देखील माहिती नसते.

येथे प्रशिक्षण आणि संवेदना कार्यक्रम महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.

प्रशिक्षणाचे महत्त्व

प्रशिक्षण आणि संवेदना कार्यक्रम हे शैक्षणिक हस्तक्षेप आहेत ज्याचा उद्देश शौचालय सेवकांना सर्व शौचालय वापरकर्त्यांसाठी सर्वसमावेशक जागा निर्माण करण्यासाठी,  आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करणे हा आहे. ह्या अंतर्गत  मानवी हक्क, लिंग ओळख आणि अभिव्यक्ती, अपंगत्व जागरूकता,जातीय भेदभाव, शौचालय स्वच्छता, संवाद आणि ग्राहक सेवा, आणि संघर्ष निराकरण यांसारखे विषय समाविष्ट केलेले आहेत. हा कार्यक्रम शौचालय सेवकांना विविध लोकांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या दृष्टीकोनातून आणि अनुभवातून शिकण्याची संधी देखील देतो.

मूलभूत स्वच्छता मानके

स्वच्छता राखण्याचे महत्त्व शौचालय सेवकांना कळण्यासाठी त्यांना शिक्षित करण्यासाठी प्रशिक्षण सुरू केले पाहिजे. यामध्ये नियमित साफसफाईचे वेळापत्रक, स्वच्छता एजंट्सचा योग्य वापर आणि रोगांचा प्रसार रोखण्यासाठी स्वच्छ वातावरणाचे महत्त्व समजून घेणे इत्यादींचा समावेश होतो.

सर्वसमावेशकता समजून घेणे

सुरुवातीला, सर्वसमावेशकतेची संकल्पना काही लोकांसाठी अवघड असू शकते. शौचालय सेवकांना ह्या संकल्पनेची खोल समज असण्याची गरज आहे, जेणेकरून ते ज्या वापरकर्त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत अशाना अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकतील. यामध्ये अपंग, वृद्ध आणि LGBTQ+सदस्यांचा समावेश असू शकतो. शौचालय सेवकांना ह्या गटाच्या लोकांना सुविधा निर्माण करून देणे आणि त्यांना सामावून घेण्याची जाणीव करून देणे आवश्यक आहे. या गटांना जेव्हा आवश्यक असेल तेव्हा मदत करण्यास देखील त्यांनी तयार असले पाहिजे.

संभाषण कौशल्य

प्रभावी संवाद सर्वश्रेष्ठ आहे आहे. टॉयलेट अटेंडंटना संवाद कसा साधावा हे माहित असले पाहिजे तसेच त्यांना वापरकर्त्यांशी आदरपूर्वक वागणे, त्यांना योग्यरित्या संबोधित करणे आणि आक्षेपार्ह किंवा अपमानास्पद अशी भाषा टाळणे हे सुद्धा माहिती असले पाहिजे. त्यांना तक्रारी हाताळण्याचे आणि रचनात्मकपणे अभिप्राय देण्याचे प्रशिक्षणही दिले पाहिजे.

विविध गरजांबद्दल सहानुभूती

संवेदना कार्यक्रमांनी सहानुभूती निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे. या विशिष्ट गटातील लोकांना  कधीकधी तोंड द्यावे लागणारे प्रतिकूल अनुभव, तसेच त्यांची आव्हाने ह्याविषयी शौचालय सेवकांना माहिती दिली पाहिजे. तसेच ह्या लोकांच्या गरजा समजावून घेऊन त्यांना आदरपूर्वक वागणूक दिली पाहिजे.

जुनाट विचारसरणी आणि पूर्वग्रह नाहीसा करणे

स्वच्छतागृहात असलेल्या सेवकांमधील कोणत्याही विद्यमान रूढी किंवा पूर्वग्रहांचे निराकरण करणे अत्यावश्यक आहे. संवेदनशीलता हे अडथळे दूर करण्यात मदत करते, परिचारकांना लिंग, वंश किंवा अपंगत्व विसरून तो माणूस म्हणून पाहण्यास सक्षम करते.

संवेदनशील परिस्थिती हाताळणे

शौचालय सेवकांना संवेदनशील परिस्थिती काळजीपूर्वक आणि विवेकबुद्धीने हाताळण्यासाठी प्रशिक्षित केले पाहिजे. उदाहरणार्थ, एखाद्या ट्रान्सजेंडर व्यक्तीला शौचालयात छळाचा सामना करावा लागत असल्यास, परिचारकाला आदरपूर्वक हस्तक्षेप करता आला पाहिजे. आणि गरज भासल्यास सुरक्षा किंवा व्यवस्थापन सतर्क करता आले पाहिजे.

प्रशिक्षण आणि संवेदीकरण कार्यक्रमांचे फायदे

जेव्हा टॉयलेट अटेंडंट योग्यरित्या प्रशिक्षित आणि संवेदनाक्षम असतात, तेव्हा खूप मोठा प्रभाव पडतो.  प्रशिक्षण आणि संवेदीकरण कार्यक्रमांचे प्रत्येकासाठी अनेक फायदे असू शकतात: स्वतः शौचालय सेवक, शौचालय वापरकर्ते आणि समाज:

शौचालय सेवकांसाठी, हे कार्यक्रम त्यांची व्यावसायिक क्षमता, आत्मविश्वास वाढवू शकतात आणि त्यांना नोकरीत समाधान मिळू शकते. ह्याद्वारे त्यांना शौचालय वापरकर्त्यांची ओळख किंवा पार्श्वभूमी काहीही असली तरीसुद्धा सर्वांबद्दल सहानुभूती आणि आदराची भावना विकसित करण्यात मदत होऊ शकते. ही सहानुभूती फक्त कामाच्या ठिकाणापर्यंत मर्यादित राहत नाही. परंतु अश्या व्यक्ती त्यांना कामाच्या ठिकाणांव्यतिरिक्त दुसरीकडे भेटल्यास त्यांना समजून घेण्यास मदत होते.

स्वच्छतागृहांच्या वापरकर्त्यांसाठी, त्यांच्या विशिष्ट गरजा आणि प्राधान्यांनुसा सुरक्षित, स्वच्छ आणि आरामदायी शौचालयांची सुविधा निर्माण करू शकतात. सार्वजनिक शौचालयांमध्ये छळ किंवा हिंसा तसेच  भेदभावाचा सामना करण्याचा धोका देखील कमी करू शकतात. शौचालयात आपल्याला मदत करणारे कोणीतरी आहे हे माहिती असल्याने अपरिचित वातावरणात देखील वापरकर्त्यांचा आत्मविश्वास वाढतो.

समाजामध्ये ते सामाजिक समावेश, एकसंधता आणि सुसंवाद वाढवू शकतात. लोकांच्या विविध गटांमध्ये सहिष्णुता आणि स्वीकृतीची संस्कृती निर्माण करण्यास मदत करू शकतात. जेव्हा हे परिचारक पक्षपाती, फोबिक किंवा अगदी साध्या चुकीची माहिती असलेल्या लोकांशी बोलतात तेव्हाते आणखी काही करू शकतात. ते आणखी संभाषण वाढवून ह्या लोकांना त्यांचा पूर्वग्रह आणि फोबियावर मात करण्यास मदत करतात. हे अगदी त्यांना पाठिंबा देऊन मदत करण्यासारखे आहे,

ह्यामुळे प्रसाधनगृहाचे वातावरणच नाही तर परिचारकांचे वर्तन आणि वृत्ती  वापरकर्त्यांना प्रभावित करू शकते. आदर, सहानुभूती आणि समजूतदारपणा दाखवणाऱ्या अटेंडंटद्वारे व्यवस्थापित केलेले शौचालय, हे  वापरकर्त्यांसाठी एक उदाहरण ठेवतात, ज्यांच्यामध्ये ही मूल्ये असतात आणि ते समाजात ती व्यापकपणे पसरवतात.

केस स्टडी: हार्पिक आणि न्यूज18 चा समावेशी शौचालयासाठी पुढाकार

शौचालय परिचरांसाठी प्रशिक्षण आणि संवेदना कार्यक्रमांचे एक उदाहरण म्हणजे हार्पिक द्वारे घेतलेला पुढाकार. हार्पिक, लॅव्हेटरी केअर विभागातील भारताचा अग्रगण्य ब्रँड आहे. भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशनला लागून असलेल्या अनेक उपक्रमांमध्ये हार्पिकने काम केलेले आहे.- उदाहरणार्थ, हार्पिक वर्ल्ड टॉयलेट कॉलेजेसची स्थापना. केवळ स्वच्छतेवर नाही तर सर्वसामावेशकतेवर देखील लक्ष केंद्रित करणाऱ्या मोहिमा आणि उपक्रम डिझायनिंगमध्येही हार्पिकने पुढाकार घेतला आहे.

हार्पिकने न्यूज १८ सोबत मिशन स्वच्छता और पानी ह्या उपक्रमात भागीदारी केली आहे – हा एक उपक्रम आहे जो केवळ स्वच्छतेच्या संकल्पनेचा प्रसार करतो. ही शौचालयांचे महत्त्व ओळखणारी चळवळ आहे. ह्या चळवळीचा उद्देश स्वच्छतागृहात केवळ कार्यात्मक जागा म्हणून नव्हे तर सुरक्षित स्थान म्हणून पाहणे हा आहे. हे अपवादात्मक मिशन स्वच्छ आणि सर्वसमावेशक शौचालये सर्वांना सामावून घेणारा आणि सशक्त करणारा समाज निर्माण करण्यासाठी अत्यावश्यक आहेत, या दृढ विश्वासावर उभारले आहे.

मिशन स्वच्छता और पानी सेलिब्रिटी, पॉलिसी निर्माते, डॉक्टर, कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था आणि प्रमुख सरकारी भागधारक यांना एकत्र आणून आवश्यक मुद्द्यांकडे त्यांचे लक्ष वेधून ह्या सगळ्यांकडून एकत्रित कृती करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ प्रदान करते. हार्पिक आणि न्यूज18चे मिशन स्वच्छता और पानी ज्ञानविषयक लेख, व्हिडिओ आणि इतर साहित्याचा संग्रह तयार करण्यात मदत करत आहेत. हा संग्रह इंटरसेक्स, ट्रान्सजेंडर आणि नॉन-बायनरी समुदाय फक्त शौचालयात जाण्यासाठी. ज्या आव्हानांना सामोरे जातात, ती आव्हाने माध्यमांद्वारे सगळ्यांसमोर मांडण्यास मदत करते.

निष्कर्ष:

सर्वसमावेशक जागा तयार करणे ही एक सामायिक जबाबदारी आहे ज्यामध्ये समजून घेणे, आदर करणे आणि सहानुभूती दाखवणे इत्यादींचा समावेश आहे. शौचालय परिचारकांसाठी सर्वसमावेशक प्रशिक्षण आणि संवेदना कार्यक्रमांमध्ये गुंतवणूक करून सार्वजनिक शौचालये स्वागतार्ह आणि सर्वांसाठी आदरणीय वातावरण तयार करीत आहेत याची खात्री करण्यासाठी आपण एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहोत. अशा कार्यक्रमांचा प्रभाव शौचालयाच्या भिंतींच्या पलीकडे पसरतो. हे कार्यक्रम अधिक समावेशक आणि समजूतदारपणा वाढवण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवतात.

या राष्ट्रीय कार्यक्रमात तुम्ही कसा भाग घेऊ शकता याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, आमच्यासोबत येथे सामील व्हा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News