27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

LGBTQ+ कर्मचार्‍यांना सक्षम बनवणे आणि विविधता आणि समावेश याला चालना देणे – News18 लोकमत


भारताच्या कॉर्पोरेट क्षेत्राच्या गजबजलेल्या इकोसिस्टममध्ये, विविधता आणि समावेशाने हळूहळू परंतु निश्चितपणे लक्ष वेधले आहे. कंपन्यांना आता समजले आहे की कर्मचारी समाधान आणि उत्पादकतेसाठी आणि सर्वोत्कृष्ट आणि तेजस्वी लोकांना आकर्षित करण्यासाठी आपलेपणाचे वातावरण तयार करणे अत्यावश्यक आहे. असे असले तरी, आपल्या विविधतेच्या प्रयत्नांमध्ये एक महत्त्वपूर्ण सामूहिक दुर्लक्षित भाग आहे.

हे एका विचार प्रयोगाने स्पष्ट करू. आपण एक स्त्री आहात अशी कल्पना करा. कल्पना करा की तुमच्या कार्यालयाने तुम्हाला सांगितले की त्यांनी लैंगिक समानता गांभीर्याने घेतली आहे आणि ते महिलांसाठी ग्लास सीलिंग निश्चित करण्यासाठी आणि वेतनातील तफावत कमी करण्याच्या समस्यांसाठी कठोर परिश्रम करत आहेत… आणि तरीही त्यांनी महिलांसाठी शौचालये बांधली नाहीत.

तुम्ही त्यांना गांभीर्याने घ्याल?

आता, हाच विचार प्रयोग वापरुया, आणि कल्पना करा की तुम्ही ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स किंवा नॉन-बायनरी आहात. तुमची कामाची जागा तीच आश्वासने देते. तुमच्याकडे नोकरी आहे, पण दररोज तुम्हाला पुरुषांचे शौचालय वापरायचे की महिलांचे शौचालय हे ठरवण्याच्या तणावातून जावे लागते आहे. गर्दी टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या टॉयलेट ब्रेकच्या वेळेवर विचार करण्यामध्ये बराच वेळ खर्च करता आणि लक्ष घालता. गर्दी नसली तरीही, ही तुमच्यासाठी अत्यंत तणावपूर्ण परिस्थिती असते – तिथे आहात म्हणून तुमचा कधी अपमान होईल हे तुम्हाला कळत नाही. ‘चुकीचे’ टॉयलेट वापरल्याबद्दल कोण तुम्हाला विरोध करेल, तुमचा अपमान करेल, तुम्हाला त्रास देईल, तुम्हाला धमकावेल किंवा तुम्हाला आवारातून बाहेर काढण्यासाठी सुरक्षा रक्षकाला बोलवेल याची कल्पना तुम्हाला नाही.

आणि जेव्हा असे काही घडते तेव्हा प्रत्येकजण कार्यालयातील चर्चेमुळे याची माहिती काढतो. आता तुम्हाला या लोकांसोबत काम करावे लागेल, ज्यांना तुमच्या अपमानाची जाणीव आहे. सर्वात वाईट भाग: म्हणजे तुम्हाला अजूनही कोणते शौचालय वापरायचे आहे हे माहितच नाही. तुमच्या कामाच्या ठिकाणी विविधता आणि समावेश महत्त्वाचा आहे यावर तुमचा विश्वास आहे का? तुम्हाला इथे काम करायला आवडेल का?

सर्वसमावेशक स्वच्छतागृह सुविधा सुनिश्चित करण्याची पहिली पायरी म्हणजे LGBTQ+ समाजाच्या विविध गरजा समजून घेणे. ट्रान्सजेंडर आणि लिंग-निश्चिती नसलेल्या व्यक्तींसाठी, पुरुष किंवा महिलांच्या स्वच्छतागृहाचा वापर करणे त्रासदायक आणि असुरक्षित देखील असू शकते. पारंपारिक लिंग निकषांच्या आधारे भेदभाव न करणाऱ्या सर्वसमावेशक सुविधा असे वातावरण निर्माण करतात जिथे LGBTQ+ कर्मचाऱ्यांना आपलेपणा आणि सुरक्षित वाटू शकेल.

सर्वसमावेशी शौचालयांचा सकारात्मक परिणाम

कामाच्या ठिकाणी सर्वसमावेशाला प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने ठोस पाऊल उचलण्यासोबतच, सर्वसमावेशी स्वच्छतागृहांचे अनेक मूर्त फायदे देखील आहेत.

कर्मचारी कल्याण आणि मानसिक आरोग्य:

सर्वसमावेशक स्वच्छतागृह सुविधा LGBTQ+ कर्मचार्‍यांचे कल्याण साधण्यासाठी आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी योगदान देतात. जेव्हा कामाची ठिकाणे सुरक्षित जागा उपलब्ध करून देतात, तेव्हा कर्मचाऱ्यांना भेदभाव किंवा छळाची भीती बाळगण्याची गरज नसते आणि ते त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतात. यामुळे ताणतणाव कमी होण्यासाठी आणि मानसिक आरोग्यामध्ये सुधारणा होण्यासाठी हातभार लागतो.

ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स आणि नॉन-बायनरी व्यक्ति सहसा स्वच्छतागृहामध्ये जाणे पूर्णपणे टाळतात, ते ‘धरून ठेवणे’ यास प्राधान्य देतात आणि त्यांचे खाणे आणि पाणी यावर मर्यादा आणतात. यामुळे त्यांच्या शरीरावर प्रचंड ताण निर्माण होतो, ज्यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गापासून, किडनीच्या समस्या, बद्धकोष्ठता आणि निर्जलीकरणापर्यंत विविध शारीरिक व्याधी होतात. जेव्हा स्वच्छतागृहे प्रत्येक व्यक्तिसाठी वापरण्यासाठी सुरक्षित असतात, तेव्हा या समस्या मागे टाकल्या जातात.

उत्पादकता वाढली:

स्वच्छतागृहामध्ये केव्हा आणि कुठे जायचे याबद्दल काळजी करण्याच्या अतिरिक्त ताण नसेल तर कर्मचारी कामात व्यस्त आणि उत्पादनक्षम असण्याची अधिक शक्यता असते. त्यांचे कार्यस्थळ त्यांच्या ओळखीचा आदर करते आणि त्यांना पाठिंबा देते हे आश्वासन त्यांना त्यांचे सर्वोत्तम कार्य करण्याची प्रेरणा देते.

संघटनात्मक संस्कृती समृद्ध करणे:

सर्वसमावेशकता भौतिक जागांच्या पलीकडे जाते. जेव्हा कंपन्या सर्व कर्मचार्‍यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ते एक मजबूत संदेश पाठवते की विविधतेचे मूल्य आहे. यामुळे, दयाळू, मुक्त आणि मतभेद स्वीकारणारी संस्कृती जोपासण्यात मदत होते. अशा कामाच्या ठिकाणी, विविध प्रकारच्या पार्श्वभूमीतील लोक चर्चा आणि निर्णय घेण्यास हातभार लावू शकतात, ज्यामुळे कमी गृहीतके, कमी न लसकाहत घेतलेल्या गोष्टी आणि अनेक चांगले माहितीपूर्ण निर्णय होऊ शकतात. यातूनच मजबूत कामगिरी करणारे संघ आणि व्यवसाय पुढे येतात.

प्रतिभा आकर्षित करणे आणि टिकवून ठेवणे:

विविधतेला आणि सर्वसमावेशाला प्राधान्य देणारी कार्यस्थळे मोठ्या टॅलेंट पूलला आकर्षित करण्याची अधिक शक्यता असते. जेथे LGBTQ+ अधिकारांची किंमत ओळखली जाते ती ठिकाणे प्रत्येकालाच सुरक्षित वाटतात आणि अधिक समावेशक असतात. ही ठिकाणे कमी पक्षपात सहन करतात आणि स्टिरियोटाइपिंगमध्ये गुंतण्याची शक्यता कमी असते – कामाच्या ठिकाणाचे असे सर्व संकेतक जे लोकांशी न्याय्यपणे वागतात. म्हणून, अर्थातच, ते सर्वोत्तम आणि तेजस्वी क्रयशक्तील आकर्षित करतात.

लिंग समावेशी शौचालये लागू करणे सोपे आहे

याचा सर्वोत्तम भाग: लिंग-समावेशक स्वच्छतागृहे लागू करण्याची किंमत खूप मोठी नसते. बर्‍याच कार्यालयांमध्ये, सुविधा आधीपासूनच अस्तित्वात आहेतच – पुरुष स्वच्छतागृहांमध्ये मुतारी असते, ज्यांना विभागले जाऊ शकते आणि महिला स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी उत्पादने डिस्पेंसर आणि कलेक्शन बिन सारख्या सुविधा आहेत, ज्या इतर स्टॉलमध्ये डुप्लिकेट केल्या जाऊ शकतात. मध्यवर्ती हँडवॉशिंग क्षेत्रामध्ये बदल करण्याची गरज नाही.

काय केले जाणे आवश्यक आहे ते येथे आहे:

  • स्पष्ट आणि आदरयुक्त चिन्ह दर्सहविणे जी सूचित करतात की ते प्रत्येकासाठी खुले आहे. कार्यानुसार क्षेत्रे स्पष्टपणे चिन्हांकित करा – जर मुतारी तशीच ठेवली जात असेल तर तसे दर्शवा. व्हीलचेअरसाठी अनुकूल असलेल्या स्टॉलकडे स्पष्ट चिन्हे दर्शविली पाहिजेत. त्याचप्रमाणे, सॅनिटरी उत्पादनांचे डिस्पेंसर स्पष्टपणे चिन्हांकित केले पाहिजेत.
  • पुरेशी गोपनीयता आणि सुरक्षितता उपाय, जसे की लॉक आणि विभाजने. सुरक्षा रक्षकांना बोलावणारी पॅनिक बटणे प्रत्येकाला विशेषत: अशा कामाच्या ठिकाणी जेथे तिरस्कार किंवा द्वेषपूर्ण हल्ले झाले आहेत तेथे सुरक्षिततेची भावना देतात.
  • अपंग लोकांसाठी वापरण्यायोग्य वैशिष्ट्ये प्रदान करा, जसे की पकडण्यासाठी बार, उतरण किंवा कमी ऊंचीचे सिंक.
  • शौचालयाचा साठा ठेवा (साबण, स्वच्छताविषयक उत्पादने, कागदी टॉवेल इ.) आणि व्यवस्थित ठेवा.
  • शौचालय मदतनिसांना संवेदनशीलता प्रशिक्षण दिले आहे याची खात्री करा.

हे इतके सोपे आहे.

आदरयुक्त वातावरण तयार करणे

केवळ स्वच्छतागृहातील मदतनिसांनाच संवेदनशीलता प्रशिक्षणाची गरज नाही. जेव्हा विविधता आणि सर्वसमावेशाचा विचार केला जातो तेव्हा सावधगिरीने बाळगणेच चांगले. अप्ली कार्यस्थळे आपण ज्या समाजातून आलो आहोत त्या समाजाला प्रतिबिंबित करतात. जर आपण अशा संस्कृतीत राहतो जी खूपच पितृसत्ताक आहे आणि स्त्री-पुरुषांचे बायनरी असे लिंग मानते करते, तर तेच येथेही लागू होते. केवळ लिंग वैविध्यपूर्ण पूलमधून काम करून आपण वैविध्यपूर्ण कार्यस्थळे तयार करू शकत नाही, आपल्याला सुरक्षित आणि स्वागतार्ह वाटेल अशा जागा निर्माण कराव्याच लागतील.

कार्यालयीन राजकारणाचा बळी ठरलेल्या कोणालाही समजते की, भेदभाव क्वचितच स्पष्ट केला जातो. हे पाठीमागे केले जाते – जो प्रकल्प तुम्हाला नियुक्त केला गेला नाही, ज्या क्लायंट मीटिंगमध्ये तुम्हाला आमंत्रित केले गेले नाही, तुमचा ‘चुकून’ समावेश नसलेल्या टीम व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये, तुमच्या किमतीवर केलेले ‘विनोद’ आणि अर्थातच, तुमच्या चुका ज्या प्रकारे सुधारल्या गेल्या.

विविधतेची भरभराट होणारी कामाची ठिकाणे ही ती असतात जिथे लैंगिक वैविध्य असलेल्या व्यक्तींची भरभराट होते. हे केवळ भेदभाव दूर करण्याबद्दल नाही तर अशी परिस्थिती निर्माण करणे आहे जिथे LGBTQ+ समाजातील व्यक्ति आणि महिला त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांइतकेच सक्षम, वचनबद्ध आणि तितकेच पुढे जाण्यास इच्छुक आहेत.

समज आणि सहानुभूतीची सुरुवात शिक्षणाने होते

संवेदनशीलता प्रशिक्षण बाजूला ठेवून, अशी अनेक संसाधने आहेत जी आपल्या कामाच्या ठिकाणी समज आणि सहानुभूती निर्माण करण्यात मदत करतात. उदाहरणार्थ, एनजीओ आणि LGBTQ+ अधिकारांमध्ये विशेषज्ञ असलेल्या तज्ञांच्या सहकार्याने कामाच्या जागांना फायदा होऊ शकतो. भागीदारीद्वारे, कंपन्या सर्वसमावेशक वातावरण तयार करण्याच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल सखोल माहिती प्राप्त करू शकतात.

मिशन स्वच्छता और पानी, हार्पिक आणि न्यूज 18 मधील उल्लेखनीय सहकार्य, धोरण निर्माते, डॉक्टर, कार्यकर्ते, NGO आणि प्रमुख सरकारी भागधारकांना एकत्र आणणारा प्लॅटफॉर्म तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे ते ही जेथे अशा मुद्द्यांवर या सर्व भागधारकांकडून एकत्रितपणे एकत्रित कृती करणे आवश्यक आहे. शौचालयांमध्ये लिंग समावेशकतेच्या मुद्द्याकडे त्यांचे लक्ष वळवून, हार्पिक आणि न्यूज 18 चे मिशन स्वच्छता और पानी हे ज्ञानविषयक लेख, व्हिडिओ आणि इतर साहित्याचा संग्रह तयार करत आहेत जे आंतरलिंगी, ट्रान्सजेंडर आणि नॉन-बायनरी यांच्या आव्हानांबद्दल जागरूकता निर्माण करण्यात मदत करत आहेत जे हा समाज अनुभवतो आणि ते ही फक्त स्वच्छतागृहामध्ये जाण्यासाठी.

स्वच्छतेच्या वचनबद्धतेसाठी प्रसिद्ध असलेला ब्रँड म्हणून, हार्पिकने बदलाची हाक स्वीकारली आहे. मोकळ्या मनाने आणि सखोल समजुतीने, ब्रँडने आपली उत्पादने LGBTQ+ समाजाचा समावेश असलेल्या समाजातील समृद्ध वीण पूर्ण करतात याची खात्री करण्यासाठी उल्लेखनीय प्रगती केली आहे. शिक्षण ही मनोवृत्ती बदलण्याची गुरुकिल्ली आहे हे ओळखून, हार्पिकने प्रेरणादायक मोहिमा सुरू केल्या आहेत ज्या लिंग ओळखीच्या विविधतेवर प्रकाश टाकतात.

येथे मुद्दा योग्य संवाद सुरु करण्याचा आहे. मित्रत्वाचे वातावरण तयार करण्यासाठी, स्वतःला शिक्षित करून सुरुवात करा. LGBTQ+ समुदायाला भेडसावणार्‍या समस्या समजून घेणे, विशेषत: सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या वापरासंदर्भात एक उत्तम सुरुवात आहे. भिन्न लिंग ओळख आणि अभिव्यक्ती आणि प्रत्येकासमोरील वेगवेगळ्या आव्हानांबद्दल जाणून घ्या. हार्पिक आणि न्यूज 18 च्या मिशन स्वच्छता और पानी उपक्रमामध्ये काही उत्कृष्ट कंटेंट आहे ज्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता.

त्यानंतर, आपल्या सहकाऱ्यांशी बोला आणि समर्थन गोळा करा. एचआरशी बोला. तुमच्या कंपनीच्या विविधता आणि सर्वसमावेशाच्या प्रयत्नांचे नेतृत्व करणाऱ्या लोकांशी बोला. इतर सहयोगी शोधा आणि त्यात सामील व्हा. तुमच्या मोठ्या संस्थेच्या त्या एका कार्यालयात फक्त एक लिंग समावेशक शौचालय तयार करण्यात तुम्ही यशस्वी झालात तरीही तुम्ही खारीचा वाटा उचलला आहे! महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही आदर्श निर्माण कला आहे. एकदा का कंपनीकडे एक जरी लिंग समावेशक स्वच्छतागृह असेल तर ते इतरांना अनुसरण करण्यासाठीचा मार्ग मोकळा करते.

या राष्ट्रीय संभाषणात तुम्ही कसा भाग घेऊ शकता हे जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत येथे सामील व्हा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News