22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

आज एखाद्या नवीन व्यक्तीची ओळख होईल जाणून घ्या दैनंदिन राशी भविष्य


मुंबई, 25 जुलै: आज दिनांक २५ जुलै २०२३. मंगळवार. अधिक श्रावण शुक्ल सप्तमी. चंद्र आज कन्या राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

मेष

आज षष्ठस्थानातील चंद्र अनेक घडामोडी घडवेल. घरात तणावाचे वातावरण राहील. नकारात्मक विचारांना दूर ठेवा. जास्तीचे काम काढून घराची सजावट करण्याकडे कल राहील. पूजा, धार्मिक कार्य घडेल. प्रवास टाळा. दिवस मध्यम.

वृषभ

गुरू राहू परदेश संबंधी घडामोडी करीत आहे. धार्मिक बाबीमध्ये, घरात खर्चिक अनुभव येतील. वक्री शनि नोकरीत जपुन राहण्याचे संकेत देत आहे. प्रवास योग येतील. साधारण फळ देणारा असा हा दिवस आहे.

मिथुन

आज चतुर्थ चंद्र व्यावसायिक आणि कौटुंबिकदृष्ट्या फळ देईल. जबाबदाऱ्या पूर्ण कराल. रवि बुध नियम न मोडण्याचे संकेत देत आहेत. जोडीदाराला काही त्रास होऊ शकतो. काळजी घ्या. दिवस बरा.

कर्क

आज राहू गुरू दशम स्थानात असून नोकरीत बदल देईल . कामात पारदर्शकता येईल. सांसारिक जीवनात ताण राहील . प्रकृती जरा शिथिल ठेवेल. नवीन व्यक्तींशी संपर्क होईल दिवस जपुन राहण्याचा आहे.

सिंह

आज शुक्र मंगळ राशी स्थानात असेल. अचानक प्रवास योग. भावंड भेट होईल . स्वतः मध्ये सुधारणा करा. द्वितीय चंद्र आहे, आर्थिक लाभ होतील. खर्च टाळायचा प्रयत्न करा. घरामध्ये वेळ द्या .दिवस मध्यम जाईल.

लग्नाला उशीर होण्यासाठी कुंडलीतील ही कारणेही जबाबदार, सोपे ज्योतिषीय उपाय

कन्या

अष्टम स्थानातून गुरूराहू भ्रमण कष्ट देणारे असून , घरामध्ये घडामोडी दर्शवित आहे. मित्र मैत्रिणीसोबत दिवस व्यतीत करा. नकोसे विचार टाळा. घरात जास्तीचे खर्च होतील. जोडीदाराला लाभ देखील होतील. दिवस मध्यम .

तुला

आज दिवस पाहुणे मंडळींची भेट, समारंभ ,प्रवास अश्या बाबी मध्ये यश देईल.नवीन व्यक्तीची ओळख होईल. प्रवास योग येतील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कार्यालयात जास्तीचे काम पडेल. जोडीदाराची काळजी घ्या. दिवस मध्यम.

वृश्चिक

षष्ठस्थानातील ग्रह वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद घेण्यास आणि घरासंबंधी काही निर्णय घेण्यास योग्य आहे. लाभ चंद्र संततीला शुभ. दिवस मध्यम.

धनु

आज दिवस घरगुती कामात जाईल. मन रमेल. संततीचे आरोग्य सांभाळा. नकारात्मक व्यक्ती आणि विचार दूर ठेवा. कार्य करण्यासाठी प्रवृत्त व्हाल. जोडीदाराची चिंता वाटेल. आर्थिक दृष्ट्या दिवस बरा आहे.

मकर

कौटुंबिक जीवन आणि भावंड यांची काळजी घेण्याचा आज दिवस आहे. नोकरी साठी प्रवास करताना जपून राहा. आरोग्य चिंता वाटेल. आर्थिक दृष्ट्या एकूण दिवस बरा आहे.

स्वप्नात जर वाहन किंवा दागिने चोरीला गेले तर काय समजायचा अर्थ?

कुंभ

राशी स्थानातील शनी भ्रमण हे काही व्यक्ती पासून सावध रहा असे आवाहन करीत आहे. प्रकृती उत्तम राहील. संततिशी कलह टाळा. वैवाहिक जीवनात कुरबुरी होतील. प्रवास योग येतील. गुरू साथ देईल. दिवस बरा.

मीन

आज सप्तम चंद्र घरामध्ये ताण निर्माण करेल.लाभ ,जबाबदारी मध्ये सहभागी व्हा असे संकेत देत आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या उत्तम दिवस.शैक्षणिक लाभ होतील. दिवस उत्तम.

शुभम भवतू..

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News