3.5 C
New York
Wednesday, February 21, 2024

कसा असेल 25 जुलैचा दिवस? करिअरमध्ये आज तुम्हाला यश मिळेल


मुंबई, 25 जुलै: सितारा – द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa – The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 25 जुलै 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

दिवसासाठीचा सारांश : सध्याच्या भविष्यानुसार तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तुमच्या ध्येयांसाठी तुम्ही खूप मेहनत घेत असाल, निष्ठेनं काम करत असाल, तर आता त्याचा मोबदला तुम्हाला मिळेल. एखादं नवं नातं दृष्टिपथात आहे. हे एखादं रोमँटिक किंवा प्लेटॉनिक नातं असू शकतं. यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद, सकारात्मकता येईल. नव्या नात्याबाबत तुमचं मन आणि बुद्धी खुली ठेवा. भूतकाळातल्या आठवणी विसरून जा. तुम्हाला अडवून ठेवणाऱ्या नकारात्मक भावना बाजूला सारा. यामुळे स्पष्ट विचारांनी पुढे जाण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल आणि नवं उद्दिष्ट मिळेल.

मेष (Aries) (21 मार्च ते 19 एप्रिल)

तुमच्या लव्ह लाइफमध्ये आज आनंद आणि सलोखा राहील. तुमचं नातं सकारात्मक दिशेनं प्रवास करत असल्याची ही खूण आहे. तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. करिअरमध्ये प्रगती आणि विकासाच्या टप्प्यात प्रवेश करत आहात. यश मिळवण्याची क्षमता तुमच्यात आहे; पण अवाजवी अपेक्षा करू नका, लक्ष केंद्रित करा. आरोग्य आणि स्वास्थ्याबाबत थोडी लवचिकता आणि ताकद असण्याची गरज आहे. काही आव्हानांचा सामना करत असलात, तर तुमच्या निश्चयावर दृढ राहा आणि पुढे जात राहा.

LUCKY Sign – A Peacock feather

LUCKY Color – Indigo

LUCKY Number – 2

वृषभ (Taurus) (20 एप्रिल ते 20 मे)

तुम्ही एखादं नवीन नातं जोपासत असाल किंवा एखादं नातं दृढ करण्याच्या प्रयत्नात असाल. तुमच्या आयुष्यात प्रगती, समृद्धता, ऊर्जा येईल आणि प्रिय व्यक्तींबरोबरचे तुमचे बंध दृढ होतील असं हे भविष्य सांगतं. आर्थिकदृष्ट्या संपत्ती आणि विपुलता मिळेल. करिअरमध्ये आर्थिक यश मिळेल. खर्चाच्या सवयींबाबत जागरूक राहा व गुंतवणूक हुशारीनं करा. जीवनात समतोल राखण्याची गरज भासेल. तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याला आधारभूत ठरेल असं दैनंदिन वेळापत्रक आखा. प्रवास लाभदायक ठरू शकतो. यामुळे तुमचं नेटवर्क मजबूत करता येऊ शकतं.

LUCKY Sign – A Rudraksh Bead

LUCKY Color – Pink

LUCKY Number – 66

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

आज नातेसंबंधांमध्ये संवाद महत्त्वाचा ठरेल. आज तुमच्या खऱ्या भावना व्यक्त करण्याची आणि स्वतःसोबतच इतरांशी प्रामाणिक राहण्याची गरज भासेल. तुमच्या रोमँटिक जोडीदारासोबत खोल आणि अर्थपूर्ण नातं टिकवण्याची गरज आहे. करिअरमध्ये नव्या कल्पना आणि नव्या संधी अनुभवाल. खर्चाच्या सवयींबाबत जागरूक राहा. गुंतवणूकही योग्य ठिकाणी करा. एखाद्या नवीन ठिकाणच्या प्रवासाचे किंवा स्थानिक परिसर फिरण्याचे बेत चांगले ठरतील. शारीरिक आणि मानसिक गरजा पूर्ण करणाऱ्या आहाराच्या योग्य सवयी स्वतःला लावून घ्या. खूप वर्दळीच्या ठिकाणी जाऊ नका.

LUCKY Sign – A Solo Performance

LUCKY Color – Brown

LUCKY Number – 26

स्वप्नात जर वाहन किंवा दागिने चोरीला गेले तर काय समजायचा अर्थ?

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

प्रेमाच्या नात्याचा प्रवास तुम्ही सुरू कराल. म्हणजे एखादं नवं नातं जोडाल किंवा एखाद्या नात्यात मैलाचा दगड पार कराल किंवा प्रेमाशी निगडित आत्मशोधाचा प्रवास कराल. या प्रवासात प्रगती होईल. करिअरच्या बाजूमध्ये समृद्धता आणि विपुलता मिळेल. प्रगती आणि बदलाच्या नैसर्गिक चक्रावर विश्वास ठेवा आणि संयम ठेवा. भागीदारी किंवा भेट देण्याचे योग येऊ शकतात. याचा अर्थ तुम्हाला आधार देणारी नाती तुमच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरतील. प्रवासामुळे नवा दृष्टिकोन लाभेल, नवे अनुभव मिळतील आणि जनसंपर्क वाढेल.

LUCKY Sign – A New Acquaintance

LUCKY Color – Silver

LUCKY Number – 17

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

जीवनात यश आणि चांगली कामगिरी होणार असल्याचं तुमचं भविष्य सांगतं. तुमच्या जोडीदाराशी स्पष्ट आणि प्रामाणिकपणे संवाद साधा. करिअरमध्ये अनपेक्षित संधी मिळतील. त्याद्वारे तुम्हाला समृद्धी व प्रगती साधता येईल. तुमची उद्दिष्टं गाठण्यासाठी तुम्ही संयम आणि चिकाटी राखली पाहिजे. प्रवासामुळे तुम्हाला कामाशी निगडित काही फायदा मिळेल. आरोग्याविषयी योग्य जागी आणि योग्य पद्धतीनं प्रयत्न करा. शेजारीपाजारी होणाऱ्या छोट्या चोऱ्यांपासून सावध राहा.

LUCKY Sign – A Table Calendar

LUCKY Color – Blue

LUCKY Number – 25

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

हे भविष्य भागीदारी आणि समतोल यावर प्रकाश टाकतं. नातेसंबंधांबाबत तुम्ही सुसंवादाच्या टप्प्यामध्ये प्रवेश कराल. दोन व्यक्तींच्या वादामध्ये तुम्हाला मध्यस्थीसाठी बोलावलं जाऊ शकतं. प्रवासाचे बेत आखले जाऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतून काही लाभ मिळण्याची शक्यता आहे. प्रवासातून आणि नव्या संधींमधून फायदा होऊ शकतो. स्वतःच्या प्रतिमेवर लक्ष द्या आणि समतोल साधण्यासाठी आत्मचिंतन करा. काही आध्यात्मिक गोष्टी किंवा आध्यात्मिक गुरूंसोबत संवाद साधल्यानं फायदा मिळू शकतो.

LUCKY Sign – A Fancy Lampshade

LUCKY Color – Peach

LUCKY Number – 4

लग्नाला उशीर होण्यासाठी कुंडलीतील ही कारणेही जबाबदार, सोपे ज्योतिषीय उपाय

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

प्रेमाच्या नातेसंबंधांचा मोकळेपणाने स्वीकार कराल. क्षमा, सहानुभूती आणि स्वतःविषयीचं प्रेम यावर भर द्या. या सगळ्या गोष्टी स्वतःमध्ये अंतर्भूत करण्यासाठी एखादी आध्यात्मिक गोष्ट तुम्हाला मदत करेल. इतरांविषयी कृतज्ञतेची भावना ठेवा आणि तुम्हाला जे हवंय ते देण्यासाठी ही सृष्टी प्रयत्नशील आहे, यावर विश्वास ठेवा. करिअरमध्ये आर्थिक सुरक्षितता जाणवेल. काही नव्या संधींची शक्यताही जाणवेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी कोणाचं तरी मार्गदर्शन घ्याल. आध्यात्मिक गुरूंकडूनही आधार आणि मार्गदर्शन मिळेल. सकारात्मक बदल घडवण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित आणि शक्ती मिळाल्यासारखं वाटेल. तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा आणि जोखीम स्वीकारा. तुमच्या आजूबाजूच्या जगाविषयी कुतूहल वाटेल व साहसी विचार येतील.

LUCKY Sign – A Piece Of Abstract Art

LUCKY Color – Lilac

LUCKY Number – 18

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

मजबूत आणि साह्यकारी मैत्री विकसित करण्यावर तुमचा भर असेल. हे भविष्य एकनिष्ठता आणि विश्वास दर्शवतं. इतरांसोबत दृढ आणि अर्थपूर्ण नातेसंबंध तयार करणं शक्य होईल. हे भविष्य माहिती आणि मार्गदर्शन दर्शवतं. म्हणजेच नवे गुरू शोधाल आणि तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी उच्च शिक्षण घ्याल. यश मिळवण्यासाठी इतरांकडून शिकण्यासाठी तयारी दर्शवली पाहिजे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी तुमचे विचार आणि भावनांबाबत जागरूकता ठेवली पाहिजे. नव्या ठिकाणी प्रवास कराल किंवा नवे अनुभव मिळवाल.

LUCKY Sign – A Floral Design

LUCKY Color – Cyan

LUCKY Number – 8

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

प्रियजनांसोबतचे तुमचे भावनिक बंध दृढ करण्यासाठी तुम्हाला गोष्टींचा स्वीकार करावा लागेल, मोकळं मन ठेवावं लागेल. कामाच्या ठिकाणी एखादं सर्जनशील किंवा नावीन्यपूर्ण काम मिळू शकतं. यशाच्या नव्या संधी मिळवण्यासाठी वेगळ्या पद्धतीनं विचार करावा लागेल. अंतर्मनाची साद वारंवार ऐकावी लागेल. तुमच्या मनाचा कौल घ्या आणि स्वतःबद्दलची सखोल जाणीव ठेवा. नव्या अनुभवांमधून प्रगतीच्या शक्यता विस्तारतील. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. नव्या आणि रोमांचक जागी प्रवासाला जाल. यामुळे स्वविकास आणि बदलाची संधी मिळेल.

LUCKY Sign – A Teakwood Table

LUCKY Color – Saffron Orange

LUCKY Number – 77

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

तुम्ही एखाद्या नव्या रोमँटिक नात्याबाबत तयार असाल किंवा तुमचं सध्याचं नातं अधिक बांधिलकीकडे जाईल. प्रेमाचा स्वीकार करा आणि तुमच्या आयुष्यात योग्य व्यक्ती येण्यासाठी ही सृष्टी प्रयत्नशील आहे, यावर विश्वास ठेवा. तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा आणि क्षमतांवर विश्वास ठेवा. तुमचे गुरू किंवा त्या क्षेत्रातले मार्गदर्शक यांच्याकडून सल्ला घेणं फायदेशीर ठरेल. स्वतःविषयी शंका किंवा असुरक्षिततेची भावना मनात येईल. त्यासाठी स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण क्षमतांची जाणीव ठेवा. आध्यात्मिक गुरू किंवा प्रिय व्यक्तींचा पाठिंबा मिळाल्याने फायदा होईल. विश्रांती आणि टवटवीतपणा आणण्यासाठी प्रवास उपयोगी ठरेल. स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळ द्या. शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्याची काळजी घ्या.

LUCKY Sign – A Large Coffee Mug

LUCKY Color – Cream

LUCKY Number – 22

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

तुमच्या रोमँटिक नातेसंबंधांत सुरक्षितता आणि विश्वासाची भावना राहील. प्रेमाच्या ताकदीवर आणि नातेसंबंधांवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. करिअरमध्ये यश मिळेल; पण काही वेळा स्वतःबद्दलची शंका किंवा आत्मविश्वासाची कमतरता यामुळे ते यश तुम्हाला लादल्यासारखं वाटेल. स्वतःच्या काळजीकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात, त्यामुळे त्यावर लक्ष द्या. प्रवास उपयुक्त ठरेल. त्याद्वारे विश्रांती मिळेल. रूटीनमधून थोडी विश्रांती घ्या आणि स्वतःच्या काळजीवर भर द्या.

LUCKY Sign – A Money Plant

LUCKY Color – Brown

LUCKY Number – 45

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

नातेसंबंधात प्रेम आणि रोमान्स असेल. एखादं नवं नातं फुलू शकतं किंवा असलेलं नातं दृढ होऊ शकतं. प्रेमाच्या बाबतीत हे चराचर तुम्हाला पाठबळ देत आहे. करिअरमध्ये काही अडचणी येऊ शकतात. त्यावर मात करून यश मिळवण्यासाठी आधार मिळेल. तुमच्या आतल्या शक्तीची जाणीव जगाला करून द्या. तुम्ही कठीण परिस्थितीतून जात असलात, तरी तुमच्या अंगी त्यावर मात करण्याची शक्ती आहे. एखाद्या साहसी प्रवासाचं प्लॅनिंग करण्यासाठी वेळ मिळेल. प्रवास तुम्हाला बदलून टाकणारा अनुभव देईल. यातून नव्या गोष्टी शिकण्याची संधी मिळेल आणि नवा दृष्टिकोनही मिळेल.

LUCKY Sign – A Creeper

LUCKY Color – Dark Grey

LUCKY Number – 3

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News