22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

परदेश संबंधी व्यवहारात यश मिळेल जाणून घ्या दैनंदिन राशी भविष्य


मुंबई, 27 जुलै: आज दिनांक २७ जुलै २०२३. वार गुरूवार. आज अधिक श्रावण शुक्ल नवमी.

आज चंद्र तुला राशीत भ्रमण करीत आहे.चंद्र गुरू प्रतियोग होत असून श्रीगणरायाला वंदन करून पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

मेष

चंद्र सप्तम स्थानात असून चंद्र गुरू राहू केंद्र योग आहे. मानसिक ताण वाढेल .कामाची जबाबदारी येईल. पंचम मंगळ संतती साठी त्रास दायक असून त्यांच्या खाण्या पिण्याची काळजी घ्या. चंद्र भ्रमण वैवाहिक दृष्ट्या उत्तम फळ देईल. दिवस चांगला.

लग्नाला उशीर होण्यासाठी कुंडलीतील ही कारणेही जबाबदार, सोपे ज्योतिषीय उपाय

वृषभ ः-

षष्ठस्थानात चंद्र भ्रमण योग आहे. ठरविलेले काम ,भावंडांशी संपर्क होईल. तसेच प्रवासात खर्च जपून करा. वैवाहिक जीवनात सांभाळून रहा. संततीला जपुन राहण्याचे संकेत आहे. नोकरीत आणि घरात अडचणी आल्या तरी यश मिळेल. . दिवस शुभ. .

मिथुन

तृतीय स्थानातील शुक्र आणि मंगळ, भाग्यात शनि योग समाधान कारक आहे.. द्वितीय चंद्र आहे, आर्थिक चिंता दूर होईल. मागील येणे वसूल करा. शुक्र आर्थिक लाभ तर मंगळ खर्च करील. वैवाहिक जीवनात जबाबदारी येईल. दिवस उत्तम..

कर्क ः- वरिष्ठांना न दुखावता तुमचे निर्णय त्यांना सांगा. कायद्याचे पालन करा.आरोग्य जपा असे ग्रह सांगत आहेत. वैवाहिक सुख मिळेल तसेच प्रवास आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाल. दिवस चांगला.

सिंह ः

मानसिक ताणतणाव होऊ शकतो. भाग्य स्थानातील गुरुराहू योग धार्मिक बाबीत तणाव निर्माण करेल. वडीलधाऱ्या मंडळींनी सावध रहा. कौटुंबिक जबाबदारी येईल. प्रकृती जपा .तृतीय चंद्र आहे परदेशगमन साठी दिवस उत्तम .

कन्या ः-

महत्त्वाच्या कामात व्यग्र रहाल. घरातील लोकांना खूश करण्यासाठी प्रयत्न कराल. . चंद्र द्वितीय स्थानात उत्तम फळ देईल. संतती कडून दुखावले जाल. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तणाव राहील . वैवाहिक जीवन मध्यम राहील. दिवस साधारण.. .

बेडरूम आणि किचनमध्ये केलेल्या या चुका देतात गरिबीला आमंत्रण

 तूळ ः-

ईश्वरी चिंतनात मनाची एकाग्रता होईल. कार्यालयात मन द्विधा करणारी बातमी मिळेल. खर्च आणि नुकसान त्रस्त करतील. प्रवास योग येतील. परदेश संबंधी व्यवहारात यश मिळेल. वैवाहिक जीवनात कलह, गैरसमज होतील. दिवस मध्यम.

वृश्चिक ः-

मनावरील ताण दुपार नंतर कमी होईल.. नवीन ओळख होईल. रवि बुध योग भाग्य स्थानात अधिकारी वर्ग आणि वडिलांकडून सहयोग देईल.आर्थिक लाभ होतील.. नाते संबंध जपा. दिवस चांगला.

धनु –

रागावर ताबा ठेवा. तुमच्यावर आरोप होण्याची शक्यता आहे. चंद्र आर्थिक लाभ देईल. प्राप्ती होईल पण खर्च ही होईल . कार्यालयीन कामकाज सुरु राहील. जास्त दगदग टाळा. दिवस मध्यम.

मकर ः

कुटुंबात अडकून रहाल. चांगली बातमी मिळेल. धंदा वाढेल. महत्त्वाचे काम टाळण्याचा प्रयत्न करा.दशम चंद्र योग आहे .नोकरीत अस्थिर वाटेल. परदेश प्रवास योग येतील. खर्च होतील. दिवस मध्यम.

कुंभ ः-

आज प्रकृती विषयी समस्या असतील तर सोडवण्यात वेळ लागेल. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. वाहन जपून चालवा. प्रवास योग येतील .आर्थिक लाभ होतील. चंद्र मातृ भेट घडवेल. दिवस चांगला .

मीन ः- कुटुंबात महत्त्वाची चर्चा होईल. गृह सौख्य मिळेल. वैवाहिक जीवन ठीक राहील.आर्थिक दृष्ट्या ठीक असून संतती जपा. अष्टम चंद्रकेतू आहे. घरामध्ये वेळ जाईल. दिवस मध्यम.

शुभम भवतू!!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News