23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

विजेची बचत करण्यासाठी फ्रीज बंद करणं गरजेचं? याचा फायदा काय, वाचा सविस्तर


मुंबई, 25 जुलै : रेफ्रिजरेटर किंवा फ्रिज हे सर्वत घरात महत्वाचं आहे. यामुळे फळ आणि भाज्या फ्रेश राहण्यात मदत मिळते. अनेक पदार्थ आपण दीर्घकाळ सुरक्षित देखील ठेवू शकतो. रेफ्रिजरेटरला सामान्य भाषेत फ्रीज म्हणतात. बहुतांश लोकांच्या घरी 24 तास फ्रीज वापरतात आणि ते कधीच बंद करत नाहीत. तर काही लोक विजेची बचत व्हावी म्हणून दिवसातून अनेक वेळा फ्रीज बंद करतात.

आता प्रश्न पडतो की रोज फ्रीज बंद करणे गरजेचे आहे का? तसेच ते फायद्याचे आहे का? चला याविषयीच्या महत्त्वाच्या गोष्टींवर सविस्तर जाणून घेऊया.

फ्रीज रोज बंद करावा का?

सामान्यत: फ्रीज बंद करण्यामागे त्याचा कूलिंग नियंत्रित करणे आणि विजेची बचत करणे हा असतो. दिवसातून एक-दोन तास फ्रीज बंद ठेवण्यात अर्थ नसला तरी. आजच्या काळात, बहुतेक रेफ्रिजरेटर्स ऑटोकट फीचरसह येत आहेत, जे विशिष्ट तापमानापर्यंत थंड झाल्यावर आपोआप बंद होतात.

फ्रीज ऑटोकट झाल्यानंतर कॉम्प्रेसरही बंद होतो आणि विजेची बचत होत राहते. मग कूलिंगची गरज पडताच, कॉम्प्रेसर आपोआप सुरू होतो. गरजेनुसार फ्रीज आपोआप चालू आणि बंद होतो. तुम्हाला बंद करण्याची गरज नाही.

बराच वेळ बाहेर गेल्यास काय करावे?

जर तुम्ही काही आठवडे किंवा 1 महिन्यासाठी घराबाहेर जात असाल तर तुम्ही तुमचा फ्रीज बंद करू शकता, जेणेकरून विजेची बचत होईल. मात्र, त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल. सर्व प्रथम, फ्रीज रिकामा करणे आवश्यक आहे आणि त्यातून सर्व वस्तू बाहेर काढाव्या लागतील. फ्रीज रिकामे केल्यावर तुम्ही ते बंद करू शकता

यामुळे फ्रीज खराब होणार नाही आणि परत आल्यानंतर तुम्ही ते पुन्हा स्वच्छ करून सुरू करू शकता. तथापि, जर तुम्ही 1 किंवा 2 दिवसांसाठी घराबाहेर जात असाल तर तुम्ही फ्रीज चालू ठेवू शकता. यातून कोणतेही नुकसान होणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News