27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

सकाळी ब्रश न करता पाण्यात मिसळून प्या ही 5 पानं, रक्तातील साखर राहील नियंत्रित! – News18 लोकमत


मुंबई, 23 जानेवारी : मधुमेह हा अत्यंत गंभीर आजार आहे. कारण तो पूर्णपणे असाध्य आहे. केवळ आपणच त्यावर नियंत्रण ठेवू शकतो. मधुमेहाची कोणतीही गंभीर लक्षणे दिसत नसली. तरी त्याची सामान्य लक्षणे सुरुवातीपासूनच लक्षात न घेतल्यास इतर गंभीर आजार होऊ शकतात. मधुमेहाची समस्या ही आपल्या जीवनशैलीशी निगडीत आहे. त्यामुळे ती टाळण्यासाठी आपल्या जीवनशैलीत खूप बदल करण्याची गरज आहे.

मधुमेह ही केवळ भारताचीच नाही तर जागतिक समस्या आहे. अलीकडच्या काळात भारतात मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, भारतात 18 वर्षांवरील सुमारे 77 दशलक्ष लोक टाइप 2 मधुमेहाने ग्रस्त आहेत. तर दुसरीकडे सुमारे 25 दशलक्ष लोक मधुमेहाचे बळी होण्याच्या मार्गावर आहेत. आपण आपल्या आहारात बदल करून मधुमेहावर नियंत्रण ठेवू शकतो आणि याशिवाय काही नैसर्गिक उपायांचा अवलंब करून आपण मधुमेहापासून आराम मिळवू शकतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते काही पानांच्या माध्यमातून आपण रक्तातील साखर नियंत्रित करू शकतो.

कढीपत्ता : कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. एनसीबीआयच्या अहवालानुसार कढीपत्ता मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. कढीपत्त्यात फायबर मुबलक प्रमाणात आढळते आणि त्यामुळे पचनक्रिया मंदावते. यामुळे खाल्लेल्या अन्नाचे चयापचय लवकर होत नाही आणि त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तुम्ही सकाळी ब्रश न करता पाण्यासोबत कढीपत्ता देखील घेऊ शकता.

तुळशीची पानं : तुळस ही एक अशी वनस्पती आहे, जिला आयुर्वेदिक महत्त्वासोबतच धार्मिक महत्त्व आहे. तुळशीमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व आढळतात जे शरीराला अनेक गंभीर आजारांपासून वाचवतात. तुळशीमुळे आपल्याला संसर्ग टाळण्यासही मदत होते. जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर तुळशीची पाने उकळून त्याचे पाणी सकाळी लवकर प्या.

इन्सुलिन वनस्पतीची पाने : मधुमेहाच्या रुग्णांसाठी इन्सुलिन हे रामबाण औषधापेक्षा कमी नाही. जेव्हा मधुमेहाची केस जुनी असते तेव्हा डॉक्टर रुग्णाला इन्सुलिनचे इंजेक्शन देतात. जर तुम्हाला मधुमेहाची सौम्य लक्षणे असतील तर तुम्ही इन्सुलिन वनस्पतीच्या पानांचे सेवन करू शकता. त्याची पाने रक्तातील साखरेची पातळी कमी करतात.

आंब्याची पाने : आंब्याच्या पानांमध्ये मॅंगीफेरिन एन्झाईम आढळते, ज्यामध्ये अल्फा ग्लुकोसिडेस रोखण्याची क्षमता असते. आंब्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. हे दोन्ही आपल्या रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल कमी करतात. सकाळी उठल्यावर आंब्याच्या पानांचे पाणी प्यायल्यास साखरेची पातळी नियंत्रित राखण्यास मदत होते.

पेरूची पानं : पेरू आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु त्याच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म देखील अधिक आहेत. संशोधनात असे दिसून आले आहे की, पेरूच्या पानांचा रस अल्फा ग्लुकोसिडेसची क्रिया रोखतो. हे एक प्रकारचे एंझाइम आहे. जे स्टार्च आणि इतर कार्बोहायड्रेट्सचे ग्लुकोजमध्ये खंडित करते. पेरूची पाने पाण्यात उकळून प्यायल्यास रक्तातील साखरही नियंत्रणात राहते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News