22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

LGBTQ+ व्यक्तींसाठी आधार देणारे वातावरण वाढवणे – News18 लोकमत


जेव्हा गरजांच्या क्रमाचा विचार केला जातो, तेव्हा स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृहांची गरज उत्तम पोषण, मूलभूत उत्पन्न, घरे आणि आरोग्यसेवेच्या गरजे बरोबरच सर्वात वरच्या स्थानावर येते. सामाजिक स्तरावर, जेव्हा आपण या मूलभूत गरजांची काळजी घेतो, तेव्हा आपले लोक केवळ जगण्यापलीकडे जाऊन पाहू शकतात आणि काहीतरी मोठे करण्याचे स्वप्न बघू शकतात.

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी लिहिले आहे की स्वच्छतागृहे जीव वाचवतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा अंदाज आहे की स्वच्छतागृहाच्या अस्वच्छतेमुळे होणाऱ्या अतिसाराच्या आजारांमुळे दरवर्षी 432,000 लोकांचा मृत्यू होतो, ज्यामध्ये पाच वर्षांखालील मुले सर्वात जास्त असुरक्षित असतात. जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, अस्वच्छ स्वच्छतागृहांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला दरवर्षी 260 अब्ज डॉलरची उत्पादकता कमी होते. जेव्हा आपण शाळांमध्ये महिलांना स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृहे देत नाही, तेव्हा त्या शाळा सोडून देतात. दुसरीकडे, स्वच्छतागृह स्वच्छतेमध्ये गुंतवलेल्या प्रत्येक रुपयामागे, वाढीव उत्पादकता आणि आरोग्यसेवा खर्च कमी होण्यामधून चौपट परतावा मिळतो. आर्थिक फायद्यांमध्ये जागतिक GDP च्या एकूण अंदाजे 1.5% वाढ आणि पाणी आणि शौचालय स्वच्छता सेवांमध्ये गुंतवणूक केलेल्या प्रत्येक रुपयासाठी व्यक्ती आणि समाजासाठी आरोग्य सेवा खर्च कमी झाल्यामुळे $4.3 परतावा अंतर्भूत आहे.

स्वच्छ भारत मिशननंतर प्रत्येक भारतीयाला शौचालयाची सुविधा उपलब्ध झाली आहे. आपल्या शौचालयाच्या स्वच्छता पद्धती सुधारत असताना, आपल्या समाजाचे आरोग्यही सुधारते, जरी आपण आपल्या समाजाची शहर स्तरावर व्याख्या केली तरी. रोगाचे कमी झालेले ओझे म्हणजे आपल्या कार्यालयात, कारखाने आणि घरांमध्ये उच्च उत्पादकता आणि आपल्या शाळांमध्ये उत्तम असलेली उपस्थिती. सुलभ शौचालयापासून आर्थिक प्रगतीपर्यंतची रेषा अगदी थेट आहे.

आणि तरीही, आपल्यामध्ये एक समाज आहे ज्यांना या सुधारणांचा फायदा झालेला नाही. ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स किंवा नॉन-बायनरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या व्यक्ती आपली लिंगविशिष्ट स्वच्छतागृहे वापरण्यासाठी सक्षम होण्यासाठी स्वत:ला पुरुष किंवा स्त्री ओळख देऊ शकत नाहीत. ते लेडीज टॉयलेट किंवा जेंट्स टॉयलेटमध्ये जाण्याचा निर्णय घेतात, त्यांना नेहमी बाहेर काढले जाण्याचा, अपमानित करण्याचा, दूर ठेवले जाण्याचा, परिसर सोडण्यास सांगितले जाण्याचा, शाब्दिक हल्ला आणि काही प्रकरणांमध्ये, अगदी शारीरिक हल्ला होण्याचा धोका असतो.

जेव्हा ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स आणि नॉन-बायनरी लोकांकडे लिंग तटस्थ स्नानगृह नसतात आणि त्यांनी लिंगनिहाय जागा वापरणे आवश्यक असते, तेव्हा त्यांना सार्वजनिक शौचालयात शाब्दिक छळ, शारीरिक हल्ला आणि लैंगिक अत्याचार होण्याचा धोका असतो. शौचालये ही संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांचा (SDGs) अविभाज्य भाग आहेत, ज्यात सर्वांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित शौचालयांसह पाणी आणि स्वच्छता हे निश्चित करणे आणि लिंग, अपंगत्व किंवा इतर कोणत्याही स्थितीवर आधारित असमानता कमी करणे आवश्यक आहे.

LGBTQ+ समाजासाठी, समाजाला सहयोगींची गरज असलेल्या महत्त्वाच्या क्षेत्रांपैकी एक म्हणजे सार्वजनिक सुविधा, विशेषत: स्वच्छ स्वच्छतागृहांचा समान वापर सुनिश्चित करणे.

सहयोगी भूतकाळात LGBTQ+ हक्कांसाठी कसे लढले आणि जिंकले

भारतातील LGBTQ हक्कांसाठीचा लढा मुख्यत्वे तळागाळातील चळवळींच्या नेतृत्वामध्ये आहे आणि विवाह समानतेसाठीचा सध्याचा जोर हे एक ताजे उदाहरण आहे. कलम 377 रद्द करण्याचा लढा हा जवळजवळ एखाद्या महाकाव्यासारखा भासतो आणि भारतातील तळागाळातील चळवळींच्या स्थिर शक्ती आणि परिणामकारकतेचा पुरावा आहे. 17 वर्षे वकिली केली गेली आणि खटला चालवला गेला, परंतु 2018 मध्ये, एका अधिक प्रगतीशील खंडपीठाने या मुद्द्यावर पुन्हा विचार केला. न्यायालयाने एकमताने कायदा रद्द केला आणि LGBTQ+ लोकांसाठी हक्क सुनिश्चित करण्यात विलंब झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

आता आपल्याला शौचालयाच्या सर्वसमावेशकतेसाठी तसाच जोर लावणे आवश्यक आहे – आपल्या सर्वांना शौचालयात जाण्यासाठी सुरक्षित, स्वच्छ, खाजगी जागेची आवश्यकता आहे. सध्या, अप्ली लिंग विशिष्ट शौचालये ना स्वागतार्ह आहेत, ना ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स आणि नॉन-बायनरी व्यक्तींसाठी सुरक्षित आहेत.

आपण या मुद्द्याला जितकी अधिक दृश्यमानता आणतो, तितकी स्वीकार्यता निर्माण होते. कलम 377 रद्द करण्याच्या यशस्वी प्रयत्नाप्रमाणेच, चळवळीला तळगाळातून पाठिंबा मिळाला: संभाषणांमुळे समजूतदारपणा आला, समजूतदारपणामुळे स्वीकृती झाली, स्वीकृतीमुळे वकिली झाली. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की केवळ LGBTQ+ समाजानेच कलम 377 च्या विरोधात मोर्चा काढला नाही तर त्यांच्या सिसजेंडर मित्रांनीही हातभार लावला.

असाच चिरस्थायी बदल घडतो – जेव्हा आपण एकमेकांसाठी उभे राहतो.

तुम्ही प्रभावी सहयोगी कसे होऊ शकता?

बाजू मांडणे हे केवळ कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्थांचे काम नाही; ही एक सामूहिक जबाबदारी आहे ज्यात आपल्या सर्वांचा समावेश होतो. बाजू मांडणे याला अनेक आकार आणि बाजू आहेत – यात निषेध मोर्चातच सामील होण्याची आवश्यकता नाही, परंतु जर तुम्हाला ते करायचे असेल तर ते ही होऊ शकते. यात समर्थनासाठी काहीतरी भव्य करण्याची देखील आवश्यकता नाही. काहीवेळा, आपण खूप मोठे महत्त्वाचे काम करतो परंतु ते आपल्या लहान, रोजच्या संभाषणांमधून देखील होत असते.

स्वतःला शिक्षित करून सुरुवात करा. LGBTQ+ समुदायाला भेडसावणाऱ्या समस्या समजून घ्या, विशेषत: सार्वजनिक शौचालयांच्या वापराबाबत. भिन्न लिंग ओळख आणि अभिव्यक्ती आणि प्रत्येकासमोरील अद्वितीय आव्हानांबद्दल जाणून घ्या. हार्पिक आणि न्यूज18 च्या मिशन स्वच्छता और पानी उपक्रमामध्ये काही उत्कृष्ट सामग्री आहे जी तुम्ही त्याच्या वेबसाइटवर पाहू शकता.

एकदा तुम्हाला असे वाटले की तुमच्या हातात असलेल्या समस्यांचे पुरेसे आकलन तुम्हाला झालेले आहे, की मग तुमच्या कक्षेतील लोकांशी बोला. एखादी नवीन कल्पना कुठेतरी एखादा लेख वाचून समजण्यापेक्षा एखाद्या मित्राकडून, कुटुंबातील सदस्याकडून किंवा सहकाऱ्याकडून आल्यावर स्वीकारणे लोकांसाठी सोपे असते. तुमचे प्रत्येक संभाषण, अगदी अयशस्वी असले तरी ते देखील काही तरी योगदान नक्की देते. तुम्ही खारीचा वाटा उचलत आहात, एका वेळी एक संभाषण.

समर्थन दर्शविण्याचा दुसरा मार्ग म्हणजे वकिलीच्या प्रयत्नांमध्ये भाग घेण्याचा विचार करणे. मोहिमांमध्ये सामील व्हा, याचिकांवर स्वाक्षरी करा, सभा आणि प्रात्यक्षिकांमध्ये भाग घ्या जे लिंग-समावेशक सार्वजनिक शौचालयांच्या समर्थनावर लक्ष केंद्रित करत आहेत. याशिवाय, NGO आणि तळागाळातील संस्थांना समर्थन द्या. या संस्थांना पैशाच्या आणि/किंवा वेळेच्या दृष्टीने योगदान द्या – त्यांच्याकडे नेहमीच अनेक प्रकल्प तयार असतात आणि तुमचे कौशल्य (किंवा फक्त तुमची उपस्थिती!) कुठे वापरले जाऊ शकते हे तुम्हाला माहीत नसते.

कॉर्पोरेट क्षेत्रासोबत काम करा. यासाठी सीएसआर कार्यक्रम बनवले जातात! सर्वांसाठी स्वच्छतागृहांमध्ये समान प्रवेश प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या उपक्रमांमध्ये योगदान देण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा. तुम्ही यशस्वी झाला नाही तरीही, तुम्ही त्यांना त्यांच्या स्वतःच्या व्यवसायात ते काय करू शकतात याची कल्पना नक्कीच दिलेली असेल. प्रत्येक कॉर्पोरेशनच्या लिंगानुसार स्वच्छतागृहे लिंग तटस्थ स्वच्छतागृहामध्ये बदलण्याच्या एकत्रित परिणामाची कल्पना करा… आणि ते घडवून आणण्यात तुमचा सहभाग असेल. अर्थात, तुम्ही स्वत: व्यवसायाचे मालक असल्यास, तुमच्या स्वत:च्या लिंग नुसार असलेल्या स्वच्छतागृहांना लिंग तटस्थ बनवण्याचा विचार करा.

स्थानिक सरकारमध्ये सहभाग घ्या: सर्वसमावेशक सार्वजनिक शौचालय स्वच्छता सुविधांचे महत्त्व सांगण्यासाठी पत्रे, ईमेल लिहा किंवा स्थानिक प्रतिनिधींची भेट घ्या. धोरणातील बदल सुचवा आणि विद्यमान सुविधा अधिक सुलभ करण्यासाठी उपाय सुचवा – तुम्हाला तुमचा परिसर उत्तम माहीत आहे. तुमच्या मित्रांकडून किंवा सोशल मीडियावरील तुमच्या पोस्ट्सद्वारे पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करा आणि स्थानिक सेलिब्रिटी आणि मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स असलेल्या इतर लोकांपर्यंत पोहोचा आणि त्यांना तुमच्या विनंत्यांना पाठिंबा देण्यास सांगा.

बलाढ्य कॉर्पोरेशन बलाढ्य सहयोगी बनवतात

ज्या कॉर्पोरेशन्सची संसाधने पुष्कळ आहेत ते बदलाचे शक्तिशाली चालक होऊ शकतात. स्वच्छ भारत मिशन हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. कार्यक्रमाच्या विविध टप्प्यांवर भारत सरकारने अनेक संस्थांशी हातमिळवणी केली. काही नावे सांगायची तर महिंद्रा ग्रुप, लार्सन अँड टुब्रो, इंडसइंड बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि अदानी ग्रुप यांनी स्वच्छतागृहे बांधण्यासाठी योगदान दिले किंवा त्यांच्यासाठी निधी बाजूला ठेवला.

लॅव्हेटरी केअर सेगमेंटमधील भारतातील अग्रगण्य ब्रँड हार्पिकने स्वच्छ भारत मिशनशी संबंधित असलेल्या अनेक उपक्रमांवर काम केले आहे – उदाहरणार्थ, हार्पिक वर्ल्ड टॉयलेट कॉलेजेसची स्थापना. हार्पिकने केवळ शौचालय स्वच्छतेवरच लक्ष केंद्रित न करता सर्वसमावेशकतेवर भर देणार्‍या मोहिमा आणि उपक्रमांची रचना करण्यातही पुढाकार घेतला आहे.

LGBTQ+ व्यक्तींनी केलेल्या संघर्षांबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि जनता आणि धोरणकर्त्यांना संवेदनशील बनवणे ही वकिली करण्यामधील एक आवश्यक बाब आहे. हार्पिक आणि न्यूज18 चे मिशन स्वच्छता और पानी सारखे उपक्रम केवळ स्वच्छतेच्या संकल्पनेच्या पुढे जाणारे आहेत. ही एक चळवळ आहे जी स्वच्छतागृहांचे गहन महत्त्व ओळखते, त्यांना केवळ कार्यभाग साधण्याची एक जागा म्हणून पाहत नाही तर सुरक्षिततेचे बीकन्स आणि उपेक्षित लोकांसाठी स्वीकारले जाण्याची जागा म्हणून बघते. स्वच्छ आणि सर्वसमावेशक स्वच्छतागृहे आम्हा सर्वांना बिनशर्त सामावून घेणार्‍या आणि सक्षम बनविणार्‍या समाजाला चालना देण्यासाठी अत्यावश्यक आहेत या दृढ विश्वासावर हे अपवादात्मक मिशन उभारले आहे. अटूट समर्पणासह, हार्पीक आणि न्यूज18 सक्रियपणे LGBTQ+ समाजाचा समावेश करतात आणि त्यांचे समर्थन करतात, प्रत्येक व्यक्ती सुरक्षित आणि स्वीकारार्ह ठिकाणी प्रवेशास पात्र आहे, जिथे त्यांचा सन्मान राखला जातो आणि त्यांची उपस्थिती आनंदाने मान्य केली जाते असा संदेश दिला जातो.

मिशन स्वच्छता और पानी सह सामील होऊन, वकीली करणारे गट LGBTQ+ समाजाला भेडसावणाऱ्या विशिष्ट आव्हानांबद्दल जागरुकता वाढवण्यास तसेच सर्वसमावेशक स्वच्छतागृह स्वच्छता धोरणांसाठी सार्वजनिक समर्थन मिळवण्यास सक्षम आहेत.

आपली विविधता स्वीकारणे

भारतातील महानगरांमध्ये राहणारी कोणतीही व्यक्ति आपल्या मिश्रित आणि वैविध्यपूर्ण समाजाची साक्ष देऊ शकतो. वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या, वेगवेगळ्या देवांची प्रार्थना करणाऱ्या, वेगवेगळ्या राजकीय पक्षांना मतदान करणाऱ्या, वेगवेगळे सण साजरे करणाऱ्या आणि सामाजिक-आर्थिक विविधतेच्या सर्व भागांतून आलेल्या लोकांसोबत आपण शिकतो, काम करतो आणि खेळतो. जर आपण हे सर्व फरक स्वीकारू शकतो, तर आपण लिंग भिन्नतेला का बाजूला ठेवतो?

तेही, जेव्हा भारताला विविध लिंग स्वीकारण्याचा मोठा वारसा आहे. हिजडा समुदाय, ज्यामध्ये ट्रान्सजेंडर, आंतरलिंगी आणि नपुंसक व्यक्तींचा समावेश आहे, हा नेहमीच आपल्या शाही दरबारांचा आणि सांस्कृतिक समारंभांचा, आपल्या विवाहसोहळ्यांचा आणि आपल्या मृत्यूच्या विधींचा एक भाग राहिला आहे. वसाहतवादी होण्यापूर्वी, हा समाज रहस्यमय आणि आदरणीय दोन्ही मानला जात असे.

आपण आपला बराचसा वसाहतवादी भूतकाळ झटकून टाकला आहे. आपण एक चमकणारी अर्थव्यवस्था आहोत ज्याने जगातील काही मजबूत अर्थव्यवस्थांना मागे टाकून 5 व्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या स्थानावर दावा केला आहे आणि लवकरच तिसरे स्थान मिळवण्यासाठी पुढे जात आहोत. आपला साक्षरता दर 1951 मध्ये केवळ 18.3% वरून 2022 मध्ये 77.7% वर पोहोचला आहे. आपण तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यामध्ये जगामध्ये आघाडीवर आहोत, मग ते मोबाइल पोहोच, डिजिटल पेमेंट किंवा अगदी टेलिमेडिसिन का असेना. थोडक्यात, आपण भविष्याकडे आत्मविश्वासाने पाऊल टाकत आहोत.

1947 मध्ये, आपण स्वराज्यासाठी योग्य नाही ही मानसिकता काढून टाकली. स्त्रियांना हीन समजणारी आणि “त्या केवळ घरामध्ये काम करण्यासाठी चांगल्या आहेत” अशी मानसिकता पुसून टाकण्याचे काम आपण सातत्याने केले आहे. आपल्याकडे एक स्थिर, वाढता आणि वैविध्यपूर्ण कर्मचारी वर्ग आहे ज्यामध्ये योग्यता असलेल्या महिला आहेत – STEM पासून कला पर्यंत सगळीकडे. आपण आपल्या जातिव्यवस्थेचे बंधन इथपर्यंत तोडत आहोत की महानगरांमध्ये वाढलेल्या आपल्यापैकी बहुतेकांना आपण किंवा आपले आई-वडील कोणत्या जातीचे आहोत याची कल्पनासुद्धा नाही.

लिंग सर्वसमावेशकतेचाही मनापासून स्वीकार करून आपल्या वसाहतवादी मानसिकतेचा शेवटचा अवशेष झटकून टाकण्याची वेळ आली आहे, नाही का? चला हे करूया. चला असा समाज घडवूया जिथे आपल्या सर्वांना स्वीकृती, आदर आणि प्रतिष्ठा असेल. आपल्या सर्वांना सुरक्षित आणि स्वागतार्ह वाटेल अशा जागा तयार करूया. ‘इतर’ वरून ‘आपण’ असा संवादात बदल करूया. चला मित्र बनूया.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शब्दात सांगायचे तर, आपली विविधता हीच आपली सर्वात मोठी शक्ति आहे.  या राष्ट्रीय परिवर्तनात तुम्ही कसे सहभागी होऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे आमच्यात सामील व्हा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News