13.3 C
New York
Monday, March 4, 2024

Money Mantra – बराच काळ अडकलेले पैसे आज मिळू शकतील – News18 लोकमत


मुंबई, 25 जुलै: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (25 जुलै 2023) राशिभविष्य

मेष (Aries) : आज एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून सहकार्य मिळू शकतं. यातून फायदाही होईल. आज घरात किंवा ऑफिसमध्ये बांधकामासंदर्भात दुरुस्ती करण्याची गरज जाणवेल. तुम्ही याबाबत नियोजन करून खर्च करू शकता. व्यवसायासंदर्भात काही चांगली बातमी मिळेल. यामुळे तुमचा उत्साह वाढेल.

उपाय : गणपतीला लाडू अर्पण करा.

वृषभ (Taurus) : आज तुमच्या कामात, वर्तनात प्रामाणिक राहावं. कठोर परिश्रमातून तुमची सर्व कामं यशस्वी होतील. यामुळे तुमचा उत्साह वाढेल आणि आनंद मिळेल.

उपाय : सूर्याला सूर्योदयावेळी अर्घ्य अर्पण करा.

मिथुन (Gemini) : आज सासरकडच्या एखाद्या व्यक्तीला पैसे उधार द्यायचे असतील तर ते विचारपूर्वक द्या. कारण हे पैसे परत मिळण्याची शक्यता कमी आहे. तुमच्या कोणत्याही कामास विरोध होऊ शकतो. त्यामुळे सावध राहावं. सामाजिक क्षेत्रात तुमचा सन्मान वाढेल.

उपाय : पिवळ्या कापडात हरभरा डाळ आणि गूळ बांधून ते भगवान विष्णूच्या मंदिरात अर्पण करा.

कर्क (Cancer) : कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करूनही तुम्हाला अपेक्षित लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल; पण निराश होण्याऐवजी स्वतःला सकारात्मक ठेवा आणि सर्व गोष्टी देवावर सोडा. आज तुमच्या व्यवसायासंदर्भात एखादा छोटा किंवा मोठा प्रवास करावा लागेल. परंतु, प्रवासात पुरेशी काळजी घ्या.

उपाय : गरीब व्यक्तीला कपडे आणि अन्नदान करा.

सिंह (Leo) : कुटुंबातले सदस्य तुमच्याकडे काही मोठ्या मागण्या करू शकतात. या मागण्या तुम्ही विचारपूर्वक पूर्ण कराव्यात अन्यथा भविष्यात तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. उद्योग-व्यवसायाशी संबंधितांची विश्वासार्हता विविध क्षेत्रांत वाढली तर त्यांना आजचा दिवस चांगला जाईल.

उपाय : भगवान श्रीकृष्णाला दही-साखर अर्पण करा.

कन्या (Virgo) : आज सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगली प्रसिद्धी मिळेल आणि त्यांचा प्रभाव वाढेल. तुम्हाला चांगल्या बातम्या मिळतील. त्यामुळे आज तेच काम करा, जे पूर्ण होणं अपेक्षित आहे. रखडलेली कामंही पूर्ण करू शकाल.

उपाय : केलेली पहिली चपाती गायीला खाऊ घाला.

स्वप्नात जर वाहन किंवा दागिने चोरीला गेले तर काय समजायचा अर्थ?

 तूळ (Libra) : कार्यक्षेत्रात आत्मविश्वास कायम राहील. एकामागून एक कामं तुम्ही सहजपणे पूर्ण करू शकाल. आज संध्याकाळी आईशी कामावरून काही वैचारिक मतभेद होऊ शकतात.

उपाय : भगवान शंकराचं ध्यान करा आणि शिवमंत्राचा जप करा.

वृश्चिक (Scorpio) : आज कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांमुळे काही समस्यांना सामोरं जावं लागेल. परंतु, तुम्हाला त्यांच्याशी चांगलं वागावं लागेल. तुम्ही आज थोडे काळजीत असाल.

उपाय : गरजूंना तांदूळ दान करा.

धनू (Sagittarius) : आज वाहनांवर खर्च करावा लागू शकतो. आज हातात पुरेसा पैसा असूनही कौटुंबिक जीवनातली अस्वस्थता त्रास देऊ शकते. कारण कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण असेल.

उपाय : श्री शिवमंत्राचा जप करून तांदूळ दान करा.

मकर (Capricorn) : कोणतीही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असलात, तर त्या संदर्भातल्या कायदेशीर बाबी नक्की तपासा. व्यवसायासाठी विचारपूर्वक निर्णय घ्या. तुम्हाला यश नक्की मिळेल.

उपाय : तुळशीला पाणी घाला. गायीला गूळ-चपाती खाऊ घाला.

कुंभ (Aquarius) : आर्थिक बाबतीत आजचा दिवस चढ-उताराचा असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज कोणाकडून पैसे उधार घेण्याचा विचार करत असलात, तर ते अजिबात घेऊ नका. कारण ते पैसे परत करणं कठीण जाईल.

उपाय : लक्ष्मीला खीर अर्पण करा.

लग्नाला उशीर होण्यासाठी कुंडलीतील ही कारणेही जबाबदार, सोपे ज्योतिषीय उपाय

मीन (Pisces) : आज काही नवीन प्रयत्न करू शकता. त्यांचा नोकरी, व्यवसायात फायदा होईल. बराच काळ अडकलेले पैसे आज मिळू शकतील. त्यामुळे मन आनंदी राहील.

उपाय : ज्येष्ठ व्यक्ती किंवा गुरुजनांचे आशीर्वाद घ्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News