12.8 C
New York
Monday, March 4, 2024

आज होऊ शकतो आर्थिक लाभ, जाणून घ्या दैनंदिन राशी भविष्य


मुंबई, 24 जुलै: आज दिनांक २४ जुलै २०२३. सोमवार. अधिक श्रावण शुक्ल षष्ठी. चंद्र आज कन्या राशीत भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

मेष

आज दिवस मजेत घालवा .राशीतील गुरू प्रसिद्धी आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व देतील. घरामध्ये सत्संग घडेल. भावंडांची जबाबदारी पार पाडाल. कुटंब आणि आर्थिक दृष्ट्या मध्यम दिवस.

वृषभ

व्यय राहू गुरू खर्चाचे मार्ग निर्माण करेल . काही आनंदाचे प्रसंग देखील येतील .खुश रहा. कार्यालयीन कामा निमित्त प्रवास ,संतती, नातेवाईक भेट संभवते. घरात विशेष घटना घडतील. आर्थिक लाभ होतील . दिवस सुखद.

मिथुन

चतुर्थ स्थानात चंद्र आहे. काही कारणाने खूप काम टाकणारे वातावरण आहे. चूक होऊ शकते. कार्य करताना विचार करा. संतती आनंदी राहील. व्यवसाय आणि आर्थिक दृष्ट्या बरा दिवस.

कर्क

दशम गुरू आणि चंद्र तृतीयस्थानात नोकरीत आर्थिक विकास करेल. वैवाहिक जीवन जपुन राहण्याचे संकेत आहे. व्यवसायात लाभ होईल. घरामध्ये प्रकृती जपून काम करा..दिवस बरा .

सिंह

आर्थिक दृष्ट्या दिवस उत्तम आहे. गृह सौख्य मिळेल. भाग्य स्थानातील ग्रह प्रत्येक गोष्टीत साथ देतील. सप्तम शनी आणि राशीतील मंगळ वैवाहिक जीवनात ताण निर्माण करेल. योगायोगाने कोणी मोठी व्यक्ती भेटेल. कौटुंबिक दृष्ट्या दिवस साधारण.

कन्या

समाज आणि शैक्षणिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. संतती सुख मिळेल. चंद्र नातेवाईक भेट घडवून आणेल. तसेच आर्थिक लाभ होतील. प्रवास योग येतील. जोडीदाराच्या आरोग्या संबंधी काळजी घ्या. दिवस उत्तम.

तुला

शुक्र घरामध्ये आवश्यक वस्तूंची खरेदी करील. खर्च भरपूर होईल पण नवीन संधी मिळतील . जबाबदारी येईल. जोडीदाराच्या आयुष्यात अनेक बदल होतील.  संतती कडे लक्ष द्या . प्रवासात जपून रहा. दिवस मध्यम.

शनिदेव आणि शुक्राच्या युतीमुळे तयार होतोय ‘खप्पर योग’, या 3 राशींचे उजळेल भाग्य

वृश्चिक

मंगळ शुक्र सिंह राशीत वृश्चिक व्यक्तींना प्रवास योग आणेल. प्रयत्न पूर्वक शांत रहा. नैराश्याचा झटका येऊ शकतो. वैवाहिक जीवनात गैरसमज टाळा. चंद्र गृह सौख्य, संतती यासाठी मध्यम फळ देईल .

धनू

गुरू राहू घर आणि वाहन या बाबतीत अडचणी आणील.. पंचम गुरू व दशम चंद्र योग घडामोडी निर्माण करणार आहे. प्रकृती जपा. नातेवाईक भेट होईल . लिखाण मध्ये यश मिळेल. आर्थिक लाभ होतील . व्यवसाय नोकरी साठी मध्यम दिवस.

मकर

राशीच्या भाग्यस्थानात चंद्र नवीन संधी प्राप्त करून देईल. संततीची उत्तम प्रगती होईल. मित्र भेट संभवते. खर्च जपून करा.घरामध्ये पाहुणे येतील. जोडीदाराची काळजी घ्या. दिवस शुभ.

कुंभ

राशीतील शनी आणि कष्टदायक चंद्र शुभ नसून व्यवसायात जपून असा असे संकेत देत आहे. सप्तम मंगळ शुक्र नाते संबंध ताणलेले असून सामाजिक जीवनात कष्ट देईल.. दिवस बरा.

भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे पुनर्जन्माचे गूढ, कसा होतो व्यक्तीला दुसरा जन्म

मीन

राशी स्वामी शुभ आहे. गुरू उपस्थिती मुळे सामाजिक,आर्थिक जीवनात अनेक गोष्टींमुळे प्रसिद्धी असा हा काळ आहे. अध्यात्मिक अनुभव येतील. प्रवास, बंधुभेट संभवते. दिवस मध्यम.

शुभ भवतू!!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News