27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

कपडे धुताना वॉशिंग मशिनमध्ये टाका बर्फाचे तुकडे; रिझल्ट पाहून व्हाल चकीत! – News18 लोकमत


मुंबई, 24 जुलै : दररोज सकाळी आंघोळ केली की, वापरून झालेले कपडे धुवावे लागतात. कपडे धुण्यापासून तर ते सुकवून इस्त्री करून कपाटात नीटनेटके ठेवण्यापर्यंतचं काम खूप कंटाळवाणं आहे. या कामात आनंद मिळतो, अशी व्यक्ती क्वचितच सापडेल. नोकरदार लोकांसाठी कपडे धुण्याचं काम डोकेदुखीपेक्षा कमी नाही. अनेकवेळा वीकेंडला कपडे धुण्यात, वाळवण्यात आणि इस्त्री करण्यात किती वेळ जातो, हे लक्षातही येत नाही. असं हे बोअरिंग काम सोपं करण्यासाठी काही हॅक्स म्हणजेच युक्त्या माहिती असणं गरजेचं आहे. ‘नवभारत टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

कपडे धुण्याचे व त्याला इस्त्री करण्याचे कष्ट कमी करण्यासाठी तुम्हाला फक्त काही बर्फाचे तुकडे आणि ड्रायर असलेल्या वॉशिंग मशिनची गरज आहे. मशीनमध्ये कपडे धुतल्यानंतर, ड्रायरमध्ये वाळवण्यापूर्वी कपड्यांमध्ये काही बर्फाचे तुकडे घाला. जेव्हा तुम्ही कपडे ड्रायरमधून बाहेर काढता तेव्हा त्यावर अजिबात वळ्या दिसत नाहीत. त्यामुळे इस्त्री करण्याची गरजच वाटत नाही.

Monsoon Hacks : पावसात खिडक्या आणि दरवाजे झाले आहेत जाम? या 4 ट्रिक्स वापरा पुन्हा होणार नाही त्रास

हे अप्रतिम वॉशिंग मशीन हॅक करून पाहण्यासाठी तुम्हाला फार जास्त बर्फाची गरज नाही. सर्वोत्तम परिणामांसाठी कपड्यांमध्ये बर्फाचे फक्त तीन क्युब्ज टाकणं आणि 10 मिनिटं ड्रायर चालवणं पुरेसं आहे. कपड्यांवर वळ्या पडू नयेत म्हणून ड्रायरमध्ये बर्फ वापरण्यामागे कोणतंही रॉकेट सायन्स नाही. त्यामागील तर्क अतिशय साधासोपा आहे. ड्रायरचं तापमान वाढल्यानं बर्फाचे तुकडे वितळतात आणि वाफ तयार होते. त्यामुळे कपडे आपोआप सरळ होतात.

तुमच्याकडे इन-बिल्ट ड्रायर किंवा कपडे वाळवणारं वॉशिंग मशीन नसेल तरीदेखील तुम्ही कपड्यांच्या वळ्या नाहीशा करू शकता. त्यासाठी 1:3 च्या प्रमाणात व्हिनेगर आणि पाणी एकत्र करा. हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरा. नंतर कपडे हँगर्सवर लटकवा आणि ज्या ठिकाणी वळ्या दिसत आहेत त्या ठिकाणी पाणी स्प्रे करा. असं केल्यास, कपडे सुकल्यावर त्यावर अजिबात वळ्या दिसत नाहीत.

Morning Routine : सकाळचा नाश्ता करण्याची योग्य वेळ कोणती? नाश्त्यात हे पदार्थ नक्की खा

या शिवाय, कपडे धुताना मशीनमध्ये किती डिटर्जंट पावडर वापरायची, हेसुद्धा जाणून घेतलं पाहिजे. जास्त पावडर टाकल्यास तुमचे कपडे खराब होऊ शकतात. तुमच्या कपड्यांचा रंग फिका पडू शकतो, कपडे धुतल्यानंतरही त्यावर पांढरे डाग दिसू शकतात. कपडे धुताना जास्त डिटर्जंट पावडर वापरल्यामुळे तुमच्या कपड्यांचं आयुष्यही कमी होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News