22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

कसा असेल 24 जुलैचा दिवस? सरप्राइजसाठी तयार राहा – News18 लोकमत


मुंबई, 24 जुलै: सितारा – द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa – The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 24 जुलै 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

दिवसासाठीचा सारांश : या ओरॅकल रीडिंगमध्ये कार्ड्स एक प्रकारची गूढ ऊर्जा प्रकट करतात. हे राशींबाबतचं मार्गदर्शन नकारात्मक प्रभावापासून स्वतःला सुरक्षित ठेवणं आणि कृतींवर भर देण्याचं महत्त्व अधोरेखित करतं. संयम आणि चिकाटीमुळे यश नक्की मिळू शकतं, असा सल्ला हे भविष्य देतं. खूप काळापासूनची एखादी इच्छा पूर्ण होईल व काही सकारात्मक बदल होईल, असंही हे भविष्य सांगतं. समोरच्याकडून मिळणारे आशीर्वाद स्वीकारा आणि त्या योग्य वेळेवर विश्वास ठेवा. भविष्याचं हे मार्गदर्शन स्वीकारलं, तर प्रगती आणि परिपूर्णता लाभेल.

मेष (Aries) (21 मार्च ते 19 एप्रिल)

एखाद्या नव्या व्यक्तीची भेट तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरू शकेल. याला योगायोग समजू नका, हेच तुमचं नशीब असू शकेल. तुमच्या मनाचा कौल घ्या. गुरूंकडून मार्गदर्शन घेण्यावर सध्या तुमचा भर असला पाहिजे. नव्या संधींचा लाभ घ्या. जुजबी आर्थिक ज्ञानामुळे अर्थकारणाविषयी तुमचं मत तयार झालं आहे. नवे अपडेट्स घ्या आणि रोख रक्कम खेळती राहील, याला प्राधान्य द्या. खर्चाबाबत जागरूक राहा. तुमचं शरीर आणि यांत्रिक आयुष्य याबाबत जागरूकता ठेवल्यास विचार स्पष्ट राहतील. स्वतःची काळजी घ्या व सोयीचं रूटीन ठेवा.

LUCKY Sign – A lifeboat

LUCKY Color – Magenta

LUCKY Number – 65

वृषभ (Taurus) (20 एप्रिल ते 20 मे)

तुमची प्रेमासाठीची प्रार्थना आज स्वीकारली जाईल. लवकरच तुम्हाला अपेक्षित असणारं परिपूर्ण आणि सुंदर नातं तुमच्या आयुष्यात येईल. लेखनाच्या क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. उत्सुक असाल, तर नाटकाबाबतचं प्रशिक्षण घ्या. आधीपेक्षा आता तुमच्या करिअरला अधिक अर्थ प्राप्त होईल. नवी भरती आणि संधींबाबत लक्ष ठेवा आणि त्याचा फायदा घ्या. आर्थिक परिस्थिती सुधारेल. नियमित आरोग्य तपासणी करा. आरोग्याला प्राधान्य द्या. स्वतःची काळजी घेतल्यास मनाला शांतता लाभेल.

LUCKY Sign – Carnation

LUCKY Color – Purple

LUCKY Number – 5

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

तुम्हाला अपेक्षित प्रेम तुमच्या आयुष्यात यावं, यासाठी संपूर्ण चराचर प्रयत्नशील असेल. नव्या शक्यतांसाठी मन खुलं ठेवा. तुमचं मन तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल, यावर विश्वास ठेवा. करिअरमध्ये भरारी घ्याल, यश दृष्टिपथात येईल. तुमच्या ध्येयांबाबत धाडस दाखवा. जोखीम पत्करण्यास घाबरू नका. तुमची मेहनत आणि निष्ठेचं फळ मिळेल. आर्थिकदृष्ट्या विपुलता असेल; पण खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाजूवर लक्ष ठेवा आणि नव्या संधी मिळाल्यावर लगेचच त्याचा फायदा घ्या. योग्य नियोजन आणि खर्चावर मर्यादा ठेवल्याने तुम्ही आर्थिक बाबतीत स्थैर्य मिळवू शकता. आरोग्याला प्राधान्य द्या. शरीराच्या गरजांकडे लक्ष द्या.

LUCKY Sign – A Brown Bag

LUCKY Color – Neon Pink

LUCKY Number – 6

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

तुमच्या लव्ह लाइफमध्ये आज एखादा महत्त्वपूर्ण पर्याय निवडावा लागू शकतो. एखादं नवं नातं जोडण्याचा निर्णय किंवा बांधिलकी जपण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. तुमच्या अंतर्मनाची साद ऐका. तुमच्या आयुष्यात काही बदल घडणार आहेत. ही यशाची आणि नव्या संधी मिळण्याची खूण आहे; मात्र तुम्ही लवचीक राहून परिस्थितीशी जुळवून घेतलं पाहिजे. काही नव्या आर्थिक संधी मिळू शकतात. नव्या नोकरीची संधीही मिळेल किंवा उत्पन्नाचं नवं साधन मिळेल. त्यांचा लाभ घेऊन खर्चावर नियंत्रण ठेवा. विश्रांती घ्या, निसर्गाशी नाळ जोडा. आनंद मिळवून देणाऱ्या सर्जनशील गोष्टी शोधा.

LUCKY Sign – A Ceramic Vase

LUCKY Color – Powder Blue

LUCKY Number – 16

भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे पुनर्जन्माचे गूढ, कसा होतो व्यक्तीला दुसरा जन्म

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

तुमच्या राशीला नवी रोमँटिक संधी दृष्टिपथात आहे. यात एखादं नवं नातं जोडलं जाऊ शकतं किंवा असलेलं नातं दृढ होऊ शकतं. या नव्या ऊर्जेकरिता तुमचा दृष्टिकोन खुला असण्याची गरज आहे. हा काळ करिअरमधल्या बदलाचाही असू शकतो. काही नवीन मिळवण्यासाठी तुम्ही उत्सुक आणि अस्वस्थ असाल. अंतर्मनाची साद ऐका. आर्थिक नफ्याची संधी येऊ शकते; पण खर्चाच्या सवयीबाबत जागरूक राहा. अवास्तव आर्थिक उद्दिष्टं ठेवू नका. विचार न करता खरेदी करू नका. नियमित तपासण्या करून स्वतःची प्रकृती जपा. शारीरिक, मानसिक आणि भावनिक गरजांकडे लक्ष द्या.

LUCKY Sign – An Engine

LUCKY Color – Charcoal Grey

LUCKY Number – 12

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडे तुम्ही आकर्षित व्हाल. सध्याच्या नात्यात तुम्हाला संवाद आणि प्रामाणिकपणाची गरज जाणवेल. कामाच्या ठिकाणी सावधगिरी आणि तपशिलांकडे लक्ष देण्याचं धोरण असेल. निर्णय घेताना घाई करू नका. सगळ्या पर्यायांचा नीट विचार करा. उत्पन्नात वाढ दिसून येईल आणि नव्या आर्थिक संधी चालून येतील. खर्चाच्या नियोजनाबाबत काळजी घ्या. नवी आव्हानं स्वीकारण्यासाठी तुम्ही उत्सुक असता. नियमित तपासण्या करून स्वतःच्या प्रकृतीचीही काळजी घ्या.

LUCKY Sign – A White Horse

LUCKY Color – Yellow

LUCKY Number – 11

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

तुमच्या लव्ह लाइफमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारची ऊर्जा राहील. नवं नातं जोडलं जाण्याची शक्यता आहे; मात्र वाद उद्भवू शकतात, त्याबाबत सावध राहा. संवादावर भर द्या. स्वतःशी आणि जोडीदाराशी प्रामाणिक राहा. करिअरमध्ये संयम आणि चिकाटीची गरज आहे. मार्गात अडथळे येतील; पण ध्येयापासून विचलित होऊ नका, तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. तुमच्या मेहनतीला अखेर फळ मिळेल. खर्चाच्या सवयींबाबत जागरूक राहा. अनावश्यक खर्च टाळा. भविष्यासाठी बचत करा आणि खर्चाचं नियोजन करा. व्यायाम आणि विश्रांतीसाठी वेळ द्या. तणाव किंवा काळजीची काही लक्षणं असतील, तर त्याकडे वेळीच लक्ष द्या. एखादी ट्रिप किंवा नव्या प्रवासाचा अनुभव घ्या.

LUCKY Sign – A Milestone

LUCKY Color – Beige

LUCKY Number – 10

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

तुमच्या लव्ह लाइफमध्ये काही चढ-उतार येतील. काही आव्हानांचा सामनाही करावा लागेल; पण यातून सकारात्मकता आणि आशेचा संदेश मिळेल. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात. तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा आणि प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. खर्चाच्या सवयींबाबत जागरूक राहा. विचार न करता खरेदी करू नका. पैशांबाबत शिस्तीचं धोरण ठेवा. प्रवासातून साहसी नवे अनुभव मिळतील. त्यांचा स्वीकार करा आणि प्रवासाबाबतचं तुमचं धोरण साधं ठेवा.

LUCKY Sign – A Sparrow

LUCKY Color – Safffron

LUCKY Number – 25

शनिदेव आणि शुक्राच्या युतीमुळे तयार होतोय ‘खप्पर योग’, या 3 राशींचे उजळेल भाग्य

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

तुमच्या आयुष्यात उत्कटता आणि रोमान्सचा काळ आहे. लव्ह लाइफमध्ये सकारात्मक ऊर्जा असेल; मात्र वाद किंवा गैरसमजांबाबत सावध राहा. कामाच्या ठिकाणी प्रगती आणि विकासाच्या संधी दिसून येतील. शत्रू आणि स्पर्धकांपासून सावध राहा. आर्थिक परिस्थितीतही सकारात्मक ऊर्जा दिसेल. तिथेही प्रगतीच्या संधी मिळतील. अति खर्च टाळा आणि आर्थिक उद्दिष्टं आवाक्यात ठेवा. शारीरिक आणि भावनिक बाजू बळकट होईल. आव्हानांवर मात करण्याची आणि संकटातून बाहेर पडण्याची शक्ती तुमच्याकडे आहे. शारीरिक आणि भावनिक गरजांमध्ये समतोल साधा व स्वतःची काळजी घ्या. प्रवासातून नवे अनुभव मिळतील, वैयक्तिक प्रगती साधाल.

LUCKY Sign – An Aquarium

LUCKY Color – Pink

LUCKY Number – 16

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

तुमच्या लव्ह लाइफमध्ये सकारात्मक बदल घडू शकतो. कदाचित नवं नातं जोडलं जाऊ शकतं; मात्र गैरसमज किंवा विसंवाद होणार नाही, याबाबत जागरूक राहा. करिअरमध्ये यश आणि समृद्धीचा काळ आहे. तुमची ओळख प्रस्थापित होऊन एखादी अनपेक्षित संधी मिळू शकते. केवळ आत्मसंतुष्ट आणि गर्व होणार नाही, याची काळजी घ्या. कारण भविष्यात याचे नकारात्मक परिणाम दिसू शकतात. आर्थिक बाबतीत सकारात्मक परिस्थिती राहील. विचार न करता खर्च करण्याचा मोह टाळा. शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्यात सुधारणा दिसून येईल. प्रवासाची नवी ठिकाणं शोधाल किंवा आयुष्य बदलणारा एखादा अनुभव मिळेल. सुरक्षितता आणि स्वास्थ्याची खबरदारी घ्या.

LUCKY Sign – A Copper Vessel

LUCKY Color – Blue

LUCKY Number – 8

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

दृढ आणि घट्ट नातं तयार होण्याची शक्यता हे भविष्य वर्तवतं. सुंदर आणि सलोख्याचं नातं निर्माण होईल; मात्र नात्यामध्ये एखादा अवघड निर्णय किंवा कठीण आव्हान पार करावं लागू शकतं. करिअरमध्ये बदल घडेल. या बदलामुळे नव्या संधी आणि प्रगती चालून येईल. समाधानकारक आरोग्याकडे तुमची वाटचाल सुरू आहे; मात्र आणखी चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी आयुष्यातल्या काही गोष्टींमध्ये समतोल राखावा लागेल. अचानक ठरलेल्या ट्रिपमुळे वैयक्तिक प्रगती होऊ शकते. अनपेक्षितपणे काही विलंबही होऊ शकतो.

LUCKY Sign – A Lamp Shade

LUCKY Color – Silver

LUCKY Number – 4

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

प्रेम आणि नातेसंबंधांबाबत सकारात्मक ऊर्जा राहील. यातून भावनिक परिपूर्णता लाभू शकते. काही गैरसमज किंवा वाद उद्भवू शकतात, त्यासाठी प्रामाणिक संवाद असावा लागेल. करिअरच्या काही संधी मिळतील; मात्र एखादा वाद किंवा सेटबॅकच्या शक्यतेबाबत जागरूक राहा. यातून बाहेर पडण्यासाठी संयम आणि मुत्सद्देगिरी आवश्यक आहे. स्वतःची काळजी, चांगला आहार, नियमित व्यायामामुळे आरोग्यात सकारात्मक बदल घडतील. सकारात्मक अनुभव आणि नव्या साहसानं भरलेला एखादा प्रवास घडू शकतो. सरप्राइजसाठी तयार राहा. वर्तमानात जगा आणि प्रवासाचा आनंद घ्या.

LUCKY Sign – Seeing or possessing a jewellery box

LUCKY Color – Gold

LUCKY Number – 50

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News