3.5 C
New York
Wednesday, February 21, 2024

सकाळचा नाश्ता करण्याची योग्य वेळ कोणती? नाश्त्यात हे पदार्थ नक्की खा – News18 लोकमत


सकाळचा नाश्ता हा आपल्याला संपूर्ण दिवसाची एनर्जी देत असतो. जर हा नाश्ता वेळेवर आणि योग्य केला नाही तर दिवसभर थकवा जाणवू शकतो. तेव्हा जर हेल्दी राहायचं असेल तर तुम्हाला सकाळचा नाश्ता योग्य वेळेत करणे गरजेचे आहे. तेव्हा सकाळचा नाश्ता करण्याची योग्यवेळी कोणती हे जाणून घेऊयात.

नाश्ता कधी करावा?

तज्ञांच्या मते, नाश्ता करण्याची योग्य वेळ ही सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान असते. पण समजा जर ही वेळ चुकली तर तुम्ही सकाळी 10 वाजेपर्यंत देखील नाश्ता करू शकता. झोपून उठल्यानंतर एका तासाच्या आत नाश्ता करणे गरजेचे आहे. ही सकाळचा नाश्ता करण्याची योग्यवेळी मानली जाते. त्यामुळे तुमची उठायची वेळ कोणती, हे सुद्धा महत्त्वाचे आहे. रात्रीपासून सकाळपर्यंत तुम्ही उपाशी असता, तेव्हा सकाळी उठल्यावर शरीराला ऊर्जेची अत्यंत आवश्यकता असते. सकाळी शरीरातील ग्लुकोजची मात्रा खूप कमी असते. नाश्ता केल्यानंतर आपली पचनक्रिया ॲक्टिव्ह होते आणि आपल्याला दिवसभरासाठी ऊर्जा मिळते.

Morning Routine : दररोज सकाळी खा एक केळ, ‘या’ गंभीर आजारांपासून राहाल दूर

सकाळच्या नाश्त्यात कोणते पदार्थ खावे?

सकाळचा नाश्ता हा नेहमी हेल्दी असावा. चहा किंवा कॉफी सारखे द्रव पदार्थ खाण्यापेक्षा फळांचा ज्यूस प्यावे. तसेच नाश्त्यात ओट्स, रवा इडली, डोसा, अंडी, फळ असा नाश्ता करावा. यामुळे लवकर भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात रहाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News