22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

स्वप्नात जर वाहन किंवा दागिने चोरीला गेले तर काय समजायचा अर्थ?


मुंबई, 24 जुलै: वास्तुशास्त्रानुसार, काही स्वप्ने अशी असतात की ती मनाला शांती देतात, तर काही स्वप्ने भीतिदायक असतात, ज्यांना पाहून मन विचलित होते. आपण पाहतो त्या प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो. वास्तुशास्त्रामध्ये स्वप्नांचा आपल्या जीवनावर होणारा प्रभाव सांगितला आहे, चला जाणून घेऊया.

स्वप्नात वाहन चोरीला गेल्याचे दिसणे अशुभ लक्षण मानले जाते. त्यामुळे येणारा काळ कठीण असू शकतो, असे मानले जाते. महत्त्वाच्या कामात अडथळे येऊ शकतात. धनहानी होण्याची शक्यता कायम असते.

स्वप्नात सोने, चांदी इत्यादी धातूंची चोरी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अशुभ मानली जाते. स्वप्नात नवीन घर दिसले तर नोकरी किंवा व्यवसायात लवकरच मोठा बदल होणार आहे असे मानले जाते. स्वप्नात बहुमजली इमारत दिसली तर ती जीवनात समृद्धीचे आगमन दर्शवते.

कुंडलीत जर असं काही असल्याने होतात मृत्यूसमान वेदना, होतात हे गंभीर परिणाम

जर तुम्ही तुमच्या स्वप्नात नवीन शहरात प्रवेश करत असाल तर याचा अर्थ तुमच्या आकांक्षा लवकरच पूर्ण होणार आहेत. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात बंद दरवाजा असलेले घर दिसले तर ते व्यवसायातील कठीण समस्या दर्शवते.

स्वप्नात दवाखाना आणि प्रयोगशाळा पाहणे अशुभ मानले जाते. जर तुम्ही स्वप्नात घर बांधत असाल तर ते भाग्यवान मानले जाते. स्वप्नात विहिरीचे पाणी पाहणे शुभ मानले जाते.

स्वप्नात पाऊस पाहणे हे कामातील यशाचे लक्षण आहे. स्वप्नात पुराचे पाणी पाहणे अशुभ मानले जाते. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात नदीचे पाणी दिसले तर हे लक्षण आहे की तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. जर तुम्हाला वाईट स्वप्नांमुळे जाग आली तर तुम्ही परत झोपी जावे.

कुंडलीत जर असं काही असल्याने होतात मृत्यूसमान वेदना, होतात हे गंभीर परिणाम

 वाईट स्वप्नांचा प्रभाव दूर करण्यासाठी सूर्यदेवाची नित्य पूजा करावी. सूर्यदेवाला रोज अर्घ्य अर्पण करावे. घरी हवन केल्यावर दोषांपासून मुक्ती मिळते.

स्वप्नशास्त्रानुसार तेजस्वी सूर्यप्रकाश पाहणे हे शुभ स्वप्न मानले जाते. शास्त्रामध्ये सूर्याला नवीन जीवनाचा आधार आणि प्रतीक मानले गेले आहे, त्यामुळे स्वप्नात तेजस्वी सूर्यप्रकाश दिसणे म्हणजे तुमच्या जीवनात लवकरच नवीन बदल घडणार आहेत, जे तुमच्यासाठी शुभ असतील. याशिवाय नोकरी, व्यवसायातही प्रगतीचे संकेत मिळू शकतात.

जर तुमचा स्वप्न विज्ञानावर विश्वास असेल, तर स्वत:ला थंडीत कुडकुडताना पाहणे हेदेखील एक शुभ स्वप्न आहे. हे स्वप्न एक लक्षण आहे की तुमचा वाईट काळ गेला आहे आणि येणारा काळ तुमच्यासाठी प्रगती करेल. याशिवाय तुमची जी काही कामं अजूनही काही कारणास्तव रखडलेली आहेत, ती लवकरच पूर्ण होतील असंही सूचित करते.

असे मानले जाते की स्वप्नात स्वतःला बाजारात खरेदी करताना पाहणे खूप शुभ असते. हे स्वप्न सूचित करते की तुमच्या जीवनातून आर्थिक संकट दूर होणार आहे आणि लवकरच तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. याशिवाय व्यवसायातही लाभाचे संकेत आहेत.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News