22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

LGBTQ+ समाजातील व्यक्तींवर सर्वसमावेशक स्वच्छतागृहांचा प्रभाव – News18 लोकमत


मानवी इतिहासाच्या बहुसंख्य भागामध्ये, समाज सर्वांगीण कल्याण साधण्यासाठी मानसिक आरोग्याचे महत्त्व ओळखण्यात अयशस्वी ठरला आहे. सुदैवाने, यामध्ये आता बदल होत आहे. जागतिक चर्चेमध्ये  आता केवळ व्यक्तींच्या कल्याणावरीलच नव्हे तर संपूर्ण समाजावरील आघात आणि चिंतेचा प्रभाव यावर लक्ष दिले गेले आहे. आपण व्यक्तीवरील आणि समाजावरील आघात ओळखतो, आपल्याला गैरवर्तनाच्या मागील प्रेरणेची चांगली समज आलेली आहे आणि वांशिक, धार्मिक आणि लिंग ओळखींसाठी हानिकारक वृत्तींचा प्रसार करण्यात सांस्कृतिक प्रतिमानांची भूमिका आपल्याला समजते.

जगभरात, वंशविद्वेष, गैरसमज, ट्रान्सफोबिया, होमोफोबिया आणि अशाच इतर किती हानिकारक वृत्ती असू शकतात हे आपण जाणतो. यामुळेच प्रगतीशील राष्ट्रे अल्पसंख्याक, स्त्रिया, भिन्न दिव्यांग आणि अर्थातच LGBTQ+ समाजाच्या हक्कांची नोंद घेणारे आणि त्यांचे संरक्षण करणारे कायदे स्वीकारत आहेत. LGBTQ+ समाजाला विशेष राग येतो तो अशा गैरसमजामुळे की हा LGBTQ+ समाजामधील व्यक्तींनी निवडलेला एक पर्याय आहे. जर त्यांनी केवळ पुरुष किंवा स्त्री असणे निवडले आणि फक्त विरुद्ध लिंगी व्यक्तींवर प्रेम करणे निवडले तर आपण सर्व सुखाने नांदू.

दुर्दैवाने, या गैरसमजामुळे संशयाचे, भीतीचे आणि द्वेषाचे वातावरण निर्माण होते, ज्याचे परिवर्तन काही प्रमाणातील आक्रमकता, उघड भेदभाव आणि अगदी द्वेषपूर्ण हल्ल्यांमध्ये होते. LGBTQ+ समाजामध्ये, विशेषतः ट्रान्सजेंडर आणि नॉन बायनरी व्यक्ती असुरक्षित असतात. त्यांच्या लिंग व्यक्तिमत्वामुळे त्यांना अनेकदा पूर्वग्रह, भेदभाव आणि सामाजिक कलंकाचा सामना करावा लागतो आणि स्वीकृती आणि मान्यतेसाठी होणारा संघर्ष दीर्घकाळ तणाव, चिंता आणि नैराश्याला कारणीभूत ठरू शकतो. दुर्दैवाने, दैनंदिन जीवनातील एक पैलू जो ही आव्हाने वाढवतो तो म्हणजे सार्वजनिक शौचालयांचा वापर.

टॉयलेटला जाण्यामध्ये टाळता येण्याजोगा संघर्ष

ट्रान्सजेंडर आणि नॉन बायनरी व्यक्तींसाठी, स्वच्छतागृह वापरण्यासारखी सामान्य गोष्ट चिंता आणि त्रासाचे कारण बनू शकते. स्वच्छतागृहांची पारंपारिक विभागणी, पुरुष आणि स्त्री या लिंगांच्या बायनरी संकल्पनेवर आधारित, त्यांच्या अनुसार नसलेल्या लिंग व्यक्तिमत्वाची सतत आठवण करून देते. जेव्हा तुम्ही ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स किंवा नॉन-बायनरी म्हणून ओळख बाळगता, तेव्हा पुरुष किंवा महिलांच्या स्वच्छतागृहात जाणे हे ‘चुकीच्या’ शौचालयात जाण्यासारखे आहे. तुम्हाला सतत भीती वाटत राहते की कोणी तुम्हाला बाहेर काढेल, तुम्हाला स्वच्छतागृहाचा वापर करण्यापासून रोखेल, शाब्दिक त्रास देईल, तुम्हाला लाज वाटायला लावेल, सुरक्षा रक्षकांना कॉल करेल आणि तुम्हाला तेथून हाकलून देईल आणि सगळ्यात वाईट म्हणजे, तुमच्यावर शारीरिक हल्ला करेल.

अभ्यास असे दर्शवितात की ट्रान्सजेंडर आणि/किंवा नॉन-बायनरी तरुणांमध्ये ज्यांनी स्वच्छतागृहा संदर्भात  भेदभाव अनुभवला आहे, त्यातील 85% व्यक्तींनी निराश मनःस्थिती नोंदवली, तर 60% आत्महत्येचा गंभीरपणे विचार करत आहेत. धक्कादायक म्हणजे, स्वच्छतागृहासंबंधी भेदभावाचा अनुभव घेणाऱ्या या तरूणांपैकी तीन मधील एक तरुणाने गेल्या वर्षी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, पाच मधील एकाने एक पेक्षा जास्त आत्महत्येचे प्रयत्न केले आहेत. हे अभ्यास युनायटेड स्टेट्समध्ये आयोजित केले गेले असताना, त्यांचे निष्कर्ष जगभरातील आणि भारतातील LGBTQ+ समाजासाठी आश्चर्यकारक असे नाहीत.

सर्वसमावेशी स्वच्छतागृहांची भूमिका

सर्वसमावेशक स्वच्छतागृहे ही अशी स्वच्छतागृहे आहेत जी मानवी शरीरातील आणि ओळखी मधील विविधता सामावून घेण्यासाठी डिझाइन केलेली आहेत. त्यांना लिंग-तटस्थ, सर्व-लिंग, किंवा युनिसेक्स टॉयलेट म्हणून देखील ओळखले जाते. सर्वसमावेशक स्वच्छतागृहे वेगवेगळ्या स्वरूपात असू शकतात, जसे की सिंगल-स्टॉल किंवा मल्टी-स्टॉल युनिट, परंतु त्यांच्यामध्ये काही वैशिष्ट्ये सामायिक असतात:

  • ते वापरकर्त्यांमध्ये त्यांच्या जन्माच्या वेळी नियुक्त झालेले लिंग, लिंग ओळख किंवा लिंग अभिव्यक्तीच्या आधारावर भेदभाव करत नाहीत.
  • तेथे स्पष्ट आणि आदरयुक्त चिन्हे असतात जी सूचित करतात की ती प्रत्येकासाठी खुली आहेत.
  • तेथे पुरेसे एकांत आणि सुरक्षा उपाय असतात, जसे की कुलूप, पडदा किंवा विभाजक भिंत.
  • तेथे अपंग व्यक्तींसाठी वापर करण्यास मदत करणारी वैशिष्ट्ये असतात, जसे की पकडण्यासाठी बार, उतरण किंवा कमी उंचीवर असलेले सिंक.

लिंग-तटस्थ किंवा ट्रान्सजेंडर-समावेशक स्वच्छतागृहे अशा सर्वसमावेशक स्वच्छतागृह सुविधा निर्माण करणे, LGBTQ+ व्यक्तींचे मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्य सुधारण्यात परिवर्तनकारी भूमिका बजावू शकते. ही सर्वसमावेशक स्वच्छतागृहे केवळ पारंपारिक लिंग बायनरीमध्ये बसत नसलेल्या व्यक्तींसाठी एक व्यावहारिक उपायच देत नाहीत तर स्वीकृती, आदर आणि समावेशाचा संदेश देखील देतात. जेव्हा तुमचा रोजगार देणारा युनिसेक्स टॉयलेट प्रदान करतो, तेव्हा ते केवळ विविधता आणि समावेशासाठी केवळ बोलत नाहीत, ते स्वतः त्यासाठी कार्य करत असतात. LGBTQ+ समाजाविरुद्ध भेदभाव करणाऱ्यांना हा एक उत्तम संदेश आहे, की त्यांची विचारसरणी आणि त्यांचे वर्तन स्वीकारार्ह नाही.

व्यक्तींना त्यांच्या लिंग ओळखीशी जुळणारी स्वच्छतागृहे वापरण्यासाठी सुरक्षित आणि सर्वसमावेशक जागा प्रदान करून, सर्वसमावेशी स्वच्छतागृहे त्यांच्या वापराशी संबंधित मानसिक ताण आणि चिंता कमी करतात. किंबहुना, संशोधनात असे दिसून आले आहे की लिंग ओळखीशी सुसंगत सुविधा उपलब्ध करून दिल्याने ट्रान्सजेंडर व्यक्तींमध्ये आत्महत्येचे प्रमाण कमी होते.

सर्वसमावेशक शौचालयांचा LGBTQ+ समाजाच्या सदस्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि स्वास्थ्यावर अनेक प्रकारे सकारात्मक प्रभाव पडतो:

हिंसा, छळ आणि भेदभाव कमी करणे

सर्वसमावेशक स्वच्छतागृहे सक्रियपणे LGBTQ+ व्यक्तींना सार्वजनिक स्वच्छतागृहामध्ये हिंसा, छळ किंवा भेदभाव अनुभवण्याचा धोका कमी करतात. सार्वजनिक स्वच्छतागृहे जे त्यांच्या लिंग ओळख किंवा अभिव्यक्तीशी जुळत नाहीत तेथे LGBTQ+ व्यक्तींना अनेक वेळा अपशब्द, शारीरिक हल्ला किंवा सेवा नाकारणे अशा घटना घडतात. अशा घटना त्यांच्या आत्मसन्मानावर, आत्मविश्वासावर आणि एकूणच सुरक्षिततेच्या भावनेवर खोलवर परिणाम करू शकतात. अधिक स्वागतार्ह आणि आदरयुक्त वातावरण निर्माण करून, सर्वसमावेशक स्वच्छतागृहे या नुकसान कारक घटनांना प्रतिबंध करतात आणि सर्व वापरणाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या भावनेला प्रोत्साहन देतात.

प्रतिष्ठा आणि ओळख खात्री देणे

सर्वसमावेशक स्वच्छतागृहे LGBTQ+ लोकांच्या सन्मानाची आणि ओळखीची खात्री देतात, त्यांना येणाऱ्या कलंक, लाज किंवा डिसफोरियाच्या अनुभवांची काळजी घेतात. या नकारात्मक भावना त्यांच्या जीवनातील विविध पैलूंवर त्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि एकूणच स्वास्थ्यावर लक्षणीय परिणाम करू शकतात. सर्वसमावेशक शौचालये लिंग हा एक मोठा गट आहे आणि पुरुष आणि महिलांपुरता मर्यादित नाही हे मान्य करून आणि प्रमाणित करून, त्यांच्या स्वतःच्या शरीराचे सामान्यीकरण आणि दिलासा आणि स्वीकृती वाढविण्यामध्ये योगदान देतात. हे पुष्टीकरण स्वत: ची सकारात्मक भावना वाढवते आणि एकंदर मानसिक स्वास्थ्य सुधारते.

आपलेपणा आणि समुदायाची भावना जोपासणे

सर्वसमावेशक स्वच्छतागृहे LGBTQ+ व्यक्तींमध्ये आपलेपणा आणि समाजिक भावना जोपासतात. LGBTQ+ समुदायातील अनेक सदस्यांना समाजाकडून मिळणाऱ्या स्वीकृती आणि मदतीच्या अभावामुळे एकटेपणा, एकाकीपणा आणि बहिष्काराचा सामना करावा लागतो. ‘इतर’ म्हणून मिळणाऱ्या या अनुभवांमुळे नैराश्य, चिंता आणि आत्महत्येचे विचारही येऊ शकतात. LGBTQ+ व्यक्तींचे स्वागत आहे आणि त्यांची उपस्थिती वाद निर्माण करणारी नाही अशा जागा निर्माण करण्यात सर्वसमावेशक स्वच्छतागृहे मोलाची भूमिका पार पाडतात.

पुढे जाताना

सर्वसमावेशक स्वच्छतागृहांची स्थापना निश्चित करण्यासाठी कायदे आणि धोरणातील बदल महत्त्वाचे आहेत. सार्वजनिक इमारती आणि शाळांमध्ये लिंग-तटस्थ शौचालये स्थापित करणे अनिवार्य करणारे कायदे ट्रान्सजेंडर आणि नॉन-बायनरी व्यक्तींसाठी संरक्षणाची आधाररेखा प्रदान करतात. भेदभाव विरोधी कायदे ज्यात स्पष्टपणे व्यक्तींना त्यांच्या लिंग ओळखीशी जुळणारी स्वच्छतागृहे वापरण्यासाठी संरक्षणाचा समावेश आहे ते देखील सर्वसमावेशकतेला चालना देण्यासाठी आणि मानसिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. सुदैवाने, भारताने धोरणात्मक बदल तसेच कायदेशीर संरक्षणात प्रगती केली आहे.

सर्वसमावेशक ध्येय आणि धोरणे तयार करण्यासाठी LGBTQ+ अधिकारांसाठी काम करणाऱ्या NGO आणि कार्यकर्ते गट यांचे सहकार्य मिळणे आवश्यक आहे. या संस्थांकडे बहुधा मौल्यवान अंतर्दृष्टी आणि अनुभव असतात जे अधिक सूक्ष्म आणि सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील दृष्टिकोन विकसित करण्यासाठी विशेषतः भारतासारख्या विविध देशांमध्ये योगदान देऊ शकतात. सहकार्यामुळे सर्वोत्कृष्ट पद्धतींची माहिती होऊ शकते आणि सर्वसमावेशक स्वच्छतागृहांच्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकते.

सर्वसमावेशक स्वच्छतागृहांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि LGBTQ+ समाजाच्या मानसिक आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्याचे प्रयत्न विविध मार्गांद्वारे केले जाऊ शकतात. स्वच्छतेच्या वचनबद्धतेसाठी प्रसिद्ध असलेल्या हार्पिकने बदलाची ही हाक ऐकली आहे. मोकळ्या मनाने आणि उत्तम समजुतीने, ब्रँडने आपली उत्पादने LGBTQ+ समाजाचा समावेश असलेल्या बृहद समाजाची समृद्ध वीण पूर्ण करतील याची खात्री करण्यासाठी उल्लेखनीय प्रगती केली आहे. शिक्षण ही मानसिकता बदलण्याची गुरुकिल्ली आहे हे ओळखून, हार्पिकने प्रेरणादायी मोहिमा सुरू केल्या आहेत ज्या लिंग ओळखीची सुंदर विविधता अधोरेखित करतात. या सशक्त उपक्रमांद्वारे, समाजाला जागृत केले जाते, त्यांचे पालनपोषण केले जाते आणि स्वीकृती वाढेल असे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

हार्पिक आणि न्यूज18 यांच्यातील एक उल्लेखनीय सहकार्य, “मिशन स्वच्छता और पानी” म्हणून ओळखले जाते, जे केवळ स्वच्छतेच्या संकल्पनेच्या पलीकडे आहे. ही एक चळवळ आहे जी स्वच्छतागृहांचे गहन महत्त्व अधोरेखित करते, त्यांना केवळ कार्यक्षम जागा म्हणून पाहत नाही तर सुरक्षिततेचे आणि उपेक्षितांचा स्वीकार करण्याचे बीकन म्हणूनही पाहते. स्वच्छ आणि सर्वसमावेशक स्वच्छतागृहे आपल्या सर्वांना बिनशर्त सामावून घेणार्‍या आणि सक्षम करणार्‍या समाजाला चालना देण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत या दृढ विश्वासावर हे अपवादात्मक मिशन उभारले आहे. अजोड समर्पणासह, हार्पिक आणि न्यूज18 सक्रियपणे LGBTQ+ समाजाचा समावेश करतात आणि त्यांना आधार देतात, प्रत्येक व्यक्ती सुरक्षित आणि स्वीकारार्ह ठिकाणी प्रवेशास पात्र आहे, जिथे त्या व्यक्तीचा सन्मान राखला जाईल आणि त्यांची उपस्थिती आनंददायी असेल असा संदेश दिला जातो.

निष्कर्ष

मानसिक आरोग्यासंबंधित संवाद सतत विकसित होत असताना, विविध समाजांना प्रभावित करणार्‍या समस्यांचे परस्परसंबंध ओळखणे अत्यावश्यक आहे. LGBTQ+ समुदायासाठी, विशेषतः ट्रान्सजेंडर आणि नॉन-बायनरी व्यक्तींसाठी, सर्वसमावेशक स्वच्छतागृहाचा लाभ ही केवळ सोय होण्याची बाब नाही; ही प्रतिष्ठेची, सुरक्षिततेची आणि मानसिक आरोग्याशी संबंधित बाब आहे.

मिशन स्वच्छता और पानी सारख्या उपक्रमांद्वारे आणि हार्पिक सारख्या ब्रँड्सच्या कॉर्पोरेट सहभागामुळे समाज अधिक समावेशक आणि दयाळू भविष्याकडे वाटचाल करू शकतो. हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे की सर्वांसाठी सुरक्षित जागा निर्माण करून, आपण निरोगी, आनंदी आणि अधिक सुसंवादी समाजाला चालना देऊ शकतो.

येथे संवादात सामील व्हा आणि प्रत्येकासाठी स्वच्छ आणि स्वस्थ भारत निमण करण्यासाठी खारीचा वाटा उचलून तुम्ही कशी मदत करू शकता याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News