22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

किचनपासून बाथरूमपर्यंत एक कंगवा करेल तुमची सर्व कामं; जबरदस्त Kitchen Jugaad Video


नवी दिल्ली, 21 जुलै : गृहिणी म्हटलं की कामं वाटतात तितकी कमी नसतात. कामाचा व्याप बराच असतो. प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या वस्तू लागतात. शिवायही वेळ आणि मेहनतही लागते. पण एकाच वस्तू, कमी मेहनतीत आणि कमी वेळेत तुमची सर्व कामं झाली तर… साहजिकच आता हे कसं शक्य आहे, असं तुम्ही म्हणाल. पण हे शक्य आहे ते एका कंगव्याने. या जबरदस्त किचन जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

कंगवा आपण केस विंचरण्यासाठी वापरतो. तो जुना झाला की फेकून देतो. त्याचा दुसरा काही उपयोग नाही असं तुम्हाला वाटत असेल. पण  तुम्हाला विश्वास बसणार नाही, एक कंगवा तुमची किचनपासून बाथरूमपर्यंत सर्व कामं करून देईल. आता हे कसं शक्य आहे, केसासाठी वापरला जाणारा कंगवा, किचन, बाथरूममधील कामं कशी करेल, असा प्रश्न तुम्हाला पडला आहे. पण हे खरं आहे, आता कसं  यासाठी हा व्हिडीओ पाहा.

सामान्यपणे स्वयंपाक करताना गॅस किंवा किचनवर काही ना काही सांडतं. कधी दूध, कधी डाळ तर कधी आणखी काही. अशावेळी किचन स्वच्छ कऱण्यासाठी तुम्ही कंगव्याचा वापर करू शकता. एक स्वच्छ मोजा घ्या, त्यात कंगवा टाका आणि याने किचन स्वच्छ करून घ्या.

Kitchen Jugaad – पावसाळ्यात कंगव्याने वाळवा कपडे; कसं ते पाहा VIDEO

अशाच पद्धतीने मोज्यात कंगवा टाकून त्याला साबण लावून तुम्ही फ्रिज स्वच्छ करू शकता. फ्रिजच्या दरवाजावर असलेल्या रबरमध्ये घाण साचते, जी सहजासहजी निघत नाही. अशावेळी तुम्ही हा कंगवा त्या रबरमध्ये फिरवा. घाण सहजनिघेल. नंतर रबर ओल्या कापडाने स्वच्छ करून घ्या.

बाथरूममध्ये तुम्ही पाहिलं असेल बादली, फरशी, टाईल्स अस्वच्छ होतात. ते स्वच्छ करायला मेहनत लागते. अशावेळी कंगवा तुम्हाला फायदेशीर ठरेलं.

कोणतंही डिटर्जंट, लिक्विड सोप घ्या, बादलीला लावा. आता जुन्या कंगव्याला जुना तारेचा स्क्रबर लावून बादलीवर घासा. मेहनतीशिवाय बादली स्वच्छ होईल.

Kitchen Jugaad Video – घरात लावा कांद्याची माळ; टळेल मोठा धोका

Avika Rawat Foods युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

” isDesktop=”true” id=”924987″ >

(सूचना – हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही. न्यूज 18 लोकमतचा याच्याशी काही संबंध नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News