12.8 C
New York
Monday, March 4, 2024

नोकरीमध्ये सुखद अनुभव देईल, जाणून घ्या दैनंदिन राशी भविष्य


मुंबई, 23 जुलै: आज दिनांक २३ जुलै २०२३ रविवार. आज अधिक श्रावण शुक्ल पंचमी. आज चंद्र कन्या राशीत भ्रमण करेल. पाहुया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

मेष

शुभ ,अपेक्षा पूर्ण करणारा दिवस आहे. पंचम शुक्रमंगळ कलागुण वाढीस लावेल. पराक्रम आणि आर्थिक दृष्ट्या उत्तम . मानसिक ताण कमी होईल . प्रवास होतील. कौटुंबिक जीवन सुखाचे राहील. सामाजिक जाणीव निर्माण होईल. दिवस शुभ.

वृषभ

पंचम स्थानात चंद्राचे भ्रमण शुभ ठरेल .चतुर्थ स्थानातील शुक्र उत्तम असून खरेदी योग येतील . घरात काही विशेष काम निघेल. वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होईल. संतती सुख मिळेल. दिवस चांगला.

मिथुन

चंद्राचे चतुर्थस्थानातून भ्रमण सकारात्मक असून नातेवाईकांशी भेट होईल.. कुटुंब सुख मिळेल . शुक्र सुंदर व्यक्तिमत्व देईल. प्रवास योग ,भेटीगाठी होतील. प्रकृतीची काळजी घ्या. कार्य क्षेत्रात नवीन संधी मिळतील. दिवस गडबडीत जाईल.

कर्क

कर्मस्थानात गुरू राहू सोबत असून अनेक घडामोडी दाखवित आहे आर्थिक पाठबळ राहील.. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. गृह सौख्य मिळेल. वैवाहिक जीवनात उतारचढाव होतील. खर्च व गैरसमज टाळा. संतती ठीक राहील. दिवस शुभ.

सिंह

आज धर्म आणि सामाजिक जीवनात यश देणारे ग्रहमान आहे. गुरू बल असल्यामुळे आज दिवस आनंदात पार पडेल. राशीतील मंगळशुक्र मित्र मैत्रिणीकडून उत्तम सहयोग देईल. मौजमजा कराल.वैवाहिक सुख उत्तम मिळेल. मध्यम दिवस.

कन्या

जोडीदाराला कष्ट पडले तरी लाभ मिळेल. नाव आणि प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत उत्तम संधी मिळतील.आर्थिक लाभ होतील.सुख सोयी साठी खर्च कराल. दिवस खास असून संतती आनंद वार्ता देइल. दिवस उत्तम.

तुला

एक लाभदायक दिवस असून केलेल्या कामाचे चांगले फळ मिळेल . वरिष्ठ कामाची दाखल घेतील. कौटुंबिक जीवनासाठी शुभ योग असून आनंदाचे वातावरण राहील. मित्र भेट होईल. कर्ज मुक्ती होईल. दिवस शुभ .

शनिदेव आणि शुक्राच्या युतीमुळे तयार होतोय ‘खप्पर योग’, या 3 राशींचे उजळेल भाग्य

 वृश्चिक

परदेश संबंधी कामात यश मिळेल. कार्यक्षेत्रात कष्ट देणारा दिवस आहे. घरात देखील जास्तीचे काम येईल. सत्संग घडेल. घरासाठी मध्यम दिवस. शुक्रमंगळ दशमात आहे. दिवसाचा आनंद घ्या पण जपुन.

धनू

गृह सौख्य ,वाहन आणि वास्तू लाभ आणि धार्मिक आस्था निर्माण करणारा दिवस आहे.सप्तम स्थानातील दशम चंद्र भ्रमण नोकरीमध्ये सुखद अनुभव देईल. आर्थिक लाभ होतील. वैवाहिक जीवन उत्तम राहील.. दिवस शुभ.

मकर

चंद्र उत्तम फळ प्रदान करीत आहे .आनंदी राहण्याचा दिवस आहे. वैवाहिक जीवन चांगले राहील. प्रवास होतील. आर्थिक, व्यावसायिक आणि प्रकृतीच्या बाबत शुभ. मध्यम दिवस.

कुंभ

आज संततीला वेळ देऊन आपल्या दिवसाची सुरवात करा. प्रवासा साठी खर्च होईल ,पण नवीन खरेदी मौजमजा करण्यात दिवस जाईल. आर्थिक दृष्टया शुभ दिवस. दिवस बरा आहे.

मीन

आज दिवस सामाजिक दृष्टया शुभ आहे .सप्तम चंद्र घरासाठी खरेदी आणि आर्थिक हालचाली दाखवीत आहे. शत्रू पासून सावध राहा. वैवाहिक सुख उत्तम मिळेल. दिवस चांगला.

शुभम भवतू!!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News