27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

रंग बदलणारी, उलट उघडणारी छत्री पाहिलीत का? यंदा काय आहे छत्री बाजारचा ट्रेंड


नागपूर, 23 जुलै: पावसाळा सुरू झाला की आपसूक आठवण होते ती छत्री, रेनकोट किंवा पावसाळी जॅकेटची. हल्ली बाजार देखील छत्री, रेनकोट या सारख्या पावसाळी साहित्याने सजले असून ग्राहकांची रेलचेल वाढली आहे. त्यातच आता नागपुरातील छत्री बाजारात काही विशेष छत्री बघायचा मिळत आहेत. त्यात रंग बदलणारी, उलटी उघडणारी, आकर्षक जरीची अश्या निरनिराळ्या छत्र्यांसह लहान मुलांचे रंगबिरंगी रेनकोट आदी नव्या व्हरायटीचा ट्रेंण्ड बाजारात सुरू असुन ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.

पाऊस लांबल्याने छत्री रेनकोट विक्रीवर परिणाम

पावसाळा आणि रेनकोट, छत्री हे समीकरण आजही कायम आहे. काळाच्या ओघात या पावसाळी साहित्यात देखील अनेक स्थित्यंतरे आली असून काळानुसार फॅशन बदलत आहेत. हल्ली बाजारात अनेक प्रकारच्या छत्री, भिन्न भिन्न रंग आणि पॅटर्न असलेला छत्री रेनकोट विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. या विषयी अधिक माहिती देताना नागपुरातील छत्री व्यावसायिक विकास चौरसिया हे सांगतात की, “मी गेल्या 30 वर्षापासून या छत्री विक्री व्यवसायात आहे. आमच्या दुकानात वर्षभर हा सिजनेबल माल विकला जातो. यंदा पाऊस लांबला असल्याने त्याचा छत्री, रेनकोट विक्रीवर परिणाम तर झाला आहे. मात्र आता पावसाने उसंत घेतल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे.”

तीन प्रकारच्या छत्रींचे आकर्षण

आज घडीला बाजारात सर्वच प्रकारच्या छत्री आणि रेनकोट उपलब्ध आहेत. मात्र सध्या बाजारात 3 छत्र्यांची चांगलीच चर्चा आहे. त्यातील एक म्हणजे उलटी उघडणारी छत्री यामध्ये नेहमीपेक्षा उलट दिशेने उघडणारी ही छत्री आहे. यामध्ये दोन कापड असून दोन रंगांचा समावेश आहे. ही छत्री मजबूत तर आहेत शिवाय रंगसंगतीमुळे एक विशेष आकर्षण ठरते. यासोबतच फ्रिलवाली छत्री यामध्ये लेस आणि जरीचे सुंदर काम केलेली आहे. बहुतांश वेळी विदेशात दिसणारी त्याच धाटणीची ही छत्री आहे. तिसरी म्हणजे रंग बदलणारी छत्री. या छत्रीच्या कापडावर वेगवेगळ्या प्रिंट्स असून त्यावर पाणी पडल्यास ती रंग बदलत असते आणि छत्री वाळल्यानंतर ती आपल्या मूळ रंगावर येते अशा प्रकारची छत्री सध्या ट्रेंण्ड मध्ये आहे.

लहान मुलांच्या छत्रींचा ट्रेंड

नुकत्याच शाळा सुरू झाल्याने लहान मुलांची देखील छत्री रेनकोट खरीदारी करण्यासाठीची गर्दी वाढली आहे. लहान मुलांसाठी फ्रिल्स वाली, कानवाली, मल्टी कलर वाली, फॅन्सी प्रिंटिंग वाली छत्री, ज्यामध्ये बार्बी, बेन टेन, अँग्री बर्ड, अश्या कार्टून कॅरेक्टर्स वाल्या छत्र्यांची मोठी डिमांड आहे. लहान मुलांची छत्री याची सुरुवातीची किंमत 120 रुपये तर मोठ्यांची सुरुवाती किंमत 160 रुपयांपासून पुढे आहे, असे चौरासिया सांगतात.

जंगलात वाढतात या रानभाज्या आणि औषधी वनस्पती, आरोग्यासाठी आहे फायदेशीर Video

मोठ्या माणसांसाठी छत्री

लहान मुलांसह मोठ्यांसाठी देखील काही विशेष छत्री बाजारात उपलब्ध आहे. यामध्ये एका छत्रीत चार लोक आरामात मावतील अशी मोठी छत्री आहे. रेनकोट मध्ये लहान मुलांमध्ये मल्टी कलर, मल्टी प्रिंट, कार्टून कॅरेक्टर्स यांची डिमांड आहे. तर मोठ्यांमध्ये रेग्युलर शर्ट पॅन्ट रेनकोट, जॅकेट्स यांची डिमांड आहे. विशेषता महिलांमध्ये हाफ मिडी व स्कर्ट वाले रेनकोट नव्याने बाजारात आले आहेत, अशी माहिती छाता बाजारचे मालक विकास चौरसिया यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News