27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

विविध सांस्कृतिक पद्धतींचा आदर करणाऱ्या आणि सामावून घेणार्‍या स्वच्छतागृहांची रचना करणे – News18 लोकमत


स्वच्छतागृहे मानवी आरोग्यासाठी आणि सन्मानासाठी आवश्यक आहेत, परंतु त्यांचा एकच प्रकार सर्वांना लागू होत नाही. वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये साफसफाई, स्वच्छता, गोपनीयता आणि लिंग यांच्याबद्दल वेगवेगळ्या पद्धती आणि समजुती आहेत. या मतभेदांचा विचार करणाऱ्या आणि त्यांना सामावून घेणार्‍या स्वच्छतागृहांची रचना सांस्कृतिक संवेदनशीलता, सामाजिक समावेश आणि मानवी हक्क यांना प्रोत्साहन देऊ शकते.

विशेषत: जेव्हा लिंगाच्या बाबतीत विचार केला जातो तेव्हा सांस्कृतिक पैलू महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. वसाहतींच्या आधीच्या भारतामध्ये, हिजरा समाजाचा इतिहास काळाच्या धुक्यामध्ये विरला आहे. रॉयल कोर्ट आणि सांस्कृतिक समारंभात विशेष भूमिका गृहीत धरून, ट्रान्सजेंडर व्यक्ती, इंटरसेक्स लोक आणि नपुंसक यांचा समावेश करणारा एक ठळक सामाजिक गट, त्या गटाला आदरणीय आणि रहस्यमय दोन्ही मानले गेले आहे. तरीही, वसाहतवादी राजवटीने बदल घडवून आणल्यामुळे, हिजरा समुदायाच्या संबंधीच्या सामाजिक दृष्टिकोनात बदल झाला आणि उपेक्षा आणि कलंक त्यांच्या पदरी आले. तीन शतकांहून अधिकच्या वसाहतवादी नियमांमुळे, आपण त्यांना बाजूला सारले, त्यांचे मूलभूत हक्क हिरावून घेतले आणि त्यांना असंख्य संधी नाकारल्या.

आज, भारतातील स्वच्छतागृहांमध्ये लिंगाच्या बायनरी समजुतीच्या आधारावर फरक केला जातो – तुम्ही एकतर पुरुषांचे स्वच्छतागृह वापरू शकता किंवा स्त्रियांचे. असे केल्याने, आपण पुरुष किंवा स्त्री अशी ओळखत नसलेल्या कोणाचेही अस्तित्व अमान्य करतो. आपण संदेश पाठवतो की ‘योग्य’ प्रकारची लिंग ओळख स्त्री आणि पुरुष अशीच आहे आणि त्या दोनच्या पेक्षा वेगळे असलेले इतर कोणीही आपोआपच इतर म्हणून गणले जातात.

सुदैवाने, हा दृष्टिकोन आता बदलत आहे. 2014 मध्ये, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने हिजड्यांना ‘तृतीय लिंग’ म्हणून अधिकृतपणे मान्यता दिली आणि त्यांच्या कायदेशीर अधिकारांचे रक्षण आणि त्यांचे संरक्षण सुनिश्चित करण्याचा मार्ग मोकळा केला. 2011 च्या जनगणनेनुसार, भारतात 4.88 लाख ट्रान्सजेंडर व्यक्ती आहेत, त्यापैकी 55,000 लहान मुले आहेत. आणि त्या सर्वांना स्वच्छतागृहाचा वापर करणे गरजेचे आहे, जशी आपल्याला गरज आहे तशीच. सर्वोच्च न्यायालयाने कोर्टाच्या ऑगस्ट कॉरिडॉरमध्येच नऊ लिंग-तटस्थ प्रसाधनगृहे स्थापन करून आणखी एक आदर्श ठेवला आहे.

हा उपक्रम एक धाडसी, प्रभावी सुरुवात असली तरी, आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. जसे आपण स्वच्छ भारत मिशनच्या अंमलबजावणीमध्यी पाहिले आहे, बदल होण्यासाठी वेळ लागतो. आपण प्रत्येक भारतीयासाठी स्वच्छतागृहे बांधू शकतो, परंतु जर आपण वर्तणुकीतील बदलाच्या पैलूंकडे लक्ष दिले नाही आणि सांस्कृतिक संवेदनशीलता दाखवली नाही, तर आपण आपलीच वाट बिकट करत आहोत.

स्वच्छतागृह रचनेमध्ये सांस्कृतिक संवेदनशीलता का महत्त्वाची आहे?

स्वच्छतागृहे ही केवळ कार्याभाग साधण्याची जागा नसून सामाजिक आणि प्रतीकात्मक जागा देखील आहेत. ते लोकांच्या ओळख, निकष आणि अपेक्षा प्रतिबिंबित करतात आणि आकार देतात. ती लोकांच्या शिक्षण, आरोग्य सेवा, रोजगार आणि सार्वजनिक जीवन यावर देखील प्रभाव टाकू शकतात.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, जगातील 1.7 अब्ज लोकांना स्वच्छतागृहे किंवा मुतारीसारख्या मूलभूत स्वच्छता सुविधांचा अभाव आहे. यामुळे त्यांचे आरोग्य, सुरक्षितता आणि प्रतिष्ठेला गंभीर धोका निर्माण होतो. तथापि, त्यांचा वापर आणि देखभाल पक्की करण्यासाठी स्वच्छतागृहे उपलब्ध करणे पुरेसे नाही. स्वच्छतागृहे इच्छित वापरकर्त्यांसाठी स्वीकार्य, योग्य आणि परवडणारी देखील असावीत.

येथे काही महत्त्वाची प्राधान्ये आहेत जी संस्कृतीनुसार बदलतात:

⦁    काही वापरकर्ते बसण्याच्या संडासपेक्षा उकिडवे बसण्याच्या संडासाला प्राधान्य देतात, कारण त्यांना अधिक सुलभ, स्वच्छतापूर्ण आणि नैसर्गिक वाटते.

⦁    काही वापरकर्ते शोषखड्ड्याच्या स्वच्छतागृहापेक्षा फ्लश करण्याच्या स्वच्छतागृहाला प्राधान्य देतात, कारण त्यांना अधिक आधुनिक, सोयीस्कर आणि दुर्गंधी कमी येणारे वाटते.

⦁    काही वापरकर्ते सेप्टिक टाक्यांपेक्षा कंपोस्ट स्वच्छतागृहाला प्राधान्य देतात, कारण ती अधिक पर्यावरणपूरक, किफायतशीर आणि उत्पादनक्षम वाटतात.

⦁    काही वापरकर्ते स्वच्छतेसाठी कागदापेक्षा पाणी वापरण्यास प्राधान्य देतात, कारण त्यांना अधिक स्वच्छ, ताजेतवाने आणि त्यांच्या धार्मिक विश्वासांबद्दल आदर वाटतो.

⦁    काही वापरकर्त्यांनी पाणी पुरवठ्यासाठी बादल्यांपेक्षा बिडेट्स वापरणे पसंत केले कारण त्यांना अधिक कार्यक्षम, सोपे आणि विवेकी वाटले.

⦁    काही वापरकर्ते घराबाहेरील स्वच्छतागृहापेक्षा ते घरामध्ये असणे सुरक्षित, खाजगी आणि वापरण्यास सोपे वाटत असल्याने अधिक पसंत करतात.

⦁    काही वापरकर्ते अधिक स्वच्छता, प्रशस्त आणि सुव्यवस्थित वाटत असल्याने स्नानगृहांसह एकत्रित संडासपेक्षा ते स्नानगृहापासून वेगळे असणे पसंत करतात.

⦁    काही वापरकर्ते विना खिडकी स्वच्छतागृहापेक्षा खिडकी असण्याला प्राधान्य देतात, कारण त्यांना अधिक हवेशीर, प्रकाशित आणि आल्हाददायक वाटते.

⦁    काही वापरकर्ते लिंग-तटस्थ स्वच्छतागृहांपेक्षा लिंग-विभक्त स्वच्छतागृहे असणे पसंत करतात, कारण त्याने त्यांना अधिक आरामदायक, सुरक्षित आणि योग्यतेचे वाटते.

⦁    काही वापरकर्ते लॉक असलेली स्वच्छतागृहे पसंत करतात, कारण त्यांना अधिक सुरक्षित, आत्मविश्वास पूर्ण आणि प्रतिष्ठेशी निगडीत वाटते.

⦁    काही वापरकर्ते रॅम्प, रेल आणि आसने असेली स्वच्छतागृहे असणे पसंत करतात, कारण ती अपंग, वृद्ध किंवा लहान मुलांसाठी अधिक वापरायला योग्य, आश्वासक आणि आरामदायक असतात.

ही प्राधान्ये प्रदेश, समुदाय आणि व्यक्तींनुसार बदलू शकतात. ती कालांतराने देखील बदलतात, कारण लोक नवीन परिस्थिती, तंत्रज्ञान आणि प्रभावांशी जुळवून घेतात. त्यामुळे, वापरकर्त्यांच्या वैविध्यपूर्ण आणि बदलत्या प्राधान्यांची पूर्तता करणारी स्वच्छतागृहे तयार करणे हे एक गुंतागुंतीच आणि आव्हानात्मक काम आहे.

या सांस्कृतिक पैलूंकडे दुर्लक्ष करणार्‍या किंवा त्यांचे उल्लंघन करणार्‍या स्वच्छतागृहांची रचना करताना कमी वापर करणे, गैरवापर, तोडफोड, सुविधांवर बहिष्कार करणे असे होऊ शकते आणि त्यांच्या वापरकर्त्यांमध्ये वाद देखील होऊ शकतो, या सांस्कृतिक पैलूंचा आदर करणारी आणि त्यांना सामावून घेणारी स्वच्छतागृहांची रचना केल्याने उलट परिणाम होऊ शकतो. असे वापरकर्ते ज्यांना आपले म्हणणे ऐकले गेले आहे आणि त्याचा आदर केला गेला आहे असे वाटते ते या परिसराची अधिक चांगली काळजी घेतात, सुसंवाद आणि परस्पर आदर असलेली लहान आश्रयस्थाने निर्माण करतात.

भारताने विजय प्राप्त केला आहे

येथे काही स्वच्छतागृहांच्या रचना आहेत ज्यांनी खूपच चांगले काम केले आहे.

सुलभ शौचालय:

⦁    ही कमी किमतीची सार्वजनिक शौचालय व्यवस्था आहे जी ट्विन-पिट पोर-फ्लश तंत्रज्ञान वापरते.

⦁    ते वापरकर्त्यांसाठी स्क्वॅटिंग आणि सिटिंग दोन्ही पर्याय प्रदान करतात.

⦁    ते स्वच्छता करण्यासाठी आणि धुण्यासाठी पाणी देखील पुरवतात.

⦁    ते सांडपाण्याचा बागकाम किंवा फ्लशिंगसाठी पुनर्वापर करतात.

⦁    ते मानवी कचऱ्याचे स्वयंपाकासाठी किंवा प्रकाशासाठी मानवी रूपांतर करतात.

⦁    हे शौचालय वापरण्यासाठी आणि देखभालीसाठी नाममात्र शुल्क आकारले जाते.

⦁    हे स्थानिक लोकांना, विशेषत: महिलांना, स्वच्छतागृहांची काळजी घेण्यासाठी आणि साफसफाई करण्यासाठी रोजगार प्रदान करते.

⦁    हे वापरकर्त्यांसाठी आरोग्य शिक्षण आणि सामाजिक सेवा देखील प्रदान करते.

⦁    शाश्वत स्वच्छतेचे मॉडेल म्हणून भारत आणि परदेशात याचा व्यापकपणे स्वीकार केला गेला आहे.

इराम सायंटिफिक टॉयलेट:

⦁    ही एक हाय-टेक सार्वजनिक शौचालय प्रणाली आहे जी रिमोट-नियंत्रित ई-टॉयलेट तंत्रज्ञान वापरते.

⦁    हे वापरकर्त्यांसाठी पूर्णपणे स्वयंचलित आणि स्व-स्वच्छता शौचालय अनुभव प्रदान करते.

⦁    यात सेन्सर आहेत जे वापरकर्त्याची उपस्थिती ओळखतात आणि फ्लशिंग, साफसफाई आणि निर्जंतुकीकरण यंत्रणा सक्रिय करतात.

⦁    यात सौर पॅनेल आहेत जे टॉयलेटच्या कार्यांना वीज देतात आणि अतिरिक्त वीज निर्माण करतात.

⦁    यात एक मोबाइल अॅप समाविष्ट आहे जे वापरकर्त्याला स्वच्छतागृह शोधण्यासाठी, वापरण्यासाठी आणि रेट करण्यासाठी सुविधा प्रदान करते.

⦁    यात एक वेब पोर्टल देखील आहे जे ऑपरेटरला शौचालयांचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्याची सुविधा देते.

⦁    शाळा, उद्याने, बस स्थानके, पर्यटन स्थळे अशा विविध सार्वजनिक ठिकाणी ते बसवण्यात आले आहे.

ग्रामालय शौचालय:

⦁    ही एक सामुदायिक शौचालय प्रणाली आहे जी एक सहभागात्मक दृष्टीकोन वापरते.

⦁    यात शौचालयांचे नियोजन, रचना, बांधकाम आणि व्यवस्थापन यामध्ये वापरकर्त्यांचा समावेश आहे.

⦁    हे वापरकर्त्यांसाठी सांस्कृतिकदृष्ट्या योग्य आणि स्वीकार्य शौचालये प्रदान करते.

⦁    हे शौचालय बांधण्यासाठी स्थानिक साहित्य आणि कौशल्ये वापरली जातात.

⦁    हे वापरकर्त्यांना स्वच्छता आणि सफाई पद्धतींबद्दल शिक्षित करते आणि प्रेरणा प्रदान करते.

⦁    हे वापरकर्त्यांना शौचालयांची देखरेख ठेवण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी स्वयं-मदत गट आणि फेडरेशन तयार करण्यासाठी सक्षम करते आणि सहकार्य करते.

सुरक्षित आणि स्वच्छ शौचालये असण्याचे फायदे LGBTQ+ समाजापर्यंत पोहोचतील याची खात्री करण्यासाठी आपल्याला आता या उत्तमोत्तम डिझाईन्सला सर्व लिंगसमावेशक शौचालय डिझाइनच्या तत्त्वांसह एकत्रित केलेल्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

जेंडर इन्क्लुसिव्ह टॉयलेट डिझाईनचे मुख्य तत्व काय आहेत?

सर्वसमावेशक शौचालये ही अशी स्वच्छतागृहे आहेत जी मानवी शरीरे आणि ओळखींची विविधता सामावून घेण्यासाठी डिझाइन केलेली आहेत. त्यांना लिंग-तटस्थ, सर्व-लिंग, किंवा युनिसेक्स टॉयलेट म्हणून देखील ओळखले जाते. सर्वसमावेशक शौचालये वेगवेगळ्या स्वरूपात असू शकतात, जसे की सिंगल-स्टॉल किंवा मल्टी-स्टॉल युनिट, परंतु काही सामान्य वैशिष्ट्ये त्यात सामायिक असतात:

⦁    ते वापरकर्त्यांना त्यांच्या जन्माच्या वेळी नियुक्त केलेले लिंग, लिंग ओळख किंवा लिंग अभिव्यक्तीच्या आधारावर भेदभाव करत नाहीत.

⦁    तेथे स्पष्टता देणारी आणि आदर दर्शविणारी चिन्हे आहेत जी सूचित करतात की ते प्रत्येकासाठी खुले आहे.

⦁    तेथे पुरेशी गोपनीयता आणि सुरक्षा उपाय असतात, जसे की कुलूप, पडदे किंवा विभाजने.

⦁    तेथे अपंग लोकांसाठी वापरता येतील अशी वैशिष्ट्ये आहेत, जसे की पकडण्यासाठी बार, उतरण किंवा कमी उंचीवर असलेले सिंक.

सर्वसमावेशक भविष्याकडे जाण्याचा मार्ग शोधणे आहे

जसे आपण बघत आहोत, या दोन दृष्टिकोनातून मिळालेल्या उत्तमाची सांगड घालणे हे काही अवघड नाही. सुलभ शौचालय असो, एरम सायंटिफिक टॉयलेट असो किंवा ग्रामालय टॉयलेट असो, त्या सर्वांवर लिंग तटस्थ डिझाइनची तत्त्वे लागू करणे कठीण नाही. स्वच्छ भारत मिशनमध्ये ज्याप्रमाणे तळागाळातील संस्था, स्वयंसेवी संस्था, सरकारी संस्था, सेलिब्रिटी आणि प्रभाव पाडणाऱ्या व्यक्ति यांचा मोठा सहभाग होता, त्याचप्रमाणे या कार्यासाठीही सहकार्याची गरज आहे. कॉर्पोरेट गुंतवणुकीशिवाय कोणतीही गोष्ट इंच भरसुद्धा पुढे सरकत नाही – विशेषत: गुंतवणूकीच्या स्त्रोताकडून असेल तेव्हा.

लॅव्हेटरी केअर सेगमेंटमधील भारतातील अग्रगण्य ब्रँड हार्पिक, शौचालयाचे महत्त्व कार्यभाग साधण्याच्या जागेपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे हे उत्तमरीत्या ओळखून आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी लिहिले आहे की शौचालये जीव वाचवतात. जेव्हा आपण शाळांमध्ये महिलांना स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृहे देत नाही, तेव्हा त्या शाळा सोडून देतात. जेव्हा ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स आणि बायनरी नसलेल्या लोकांकडे लिंग तटस्थ स्वच्छतागृहे नसतात आणि त्यांनी लिंगनिहाय जागा वापरणे आवश्यक असते, तेव्हा त्यांना सार्वजनिक स्वच्छतागृहामध्ये शाब्दिक छळ, शारीरिक हल्ला आणि लैंगिक अत्याचार होण्याचा धोका असतो. स्वच्छतागृह हे संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांचा (SDGs) अविभाज्य भाग आहे, ज्यात सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता सुनिश्चित करणे आणि लिंग, अपंगत्व किंवा इतर कोणत्याही स्थितीवर आधारित असमानता कमी करणे आवश्यक आहे.

आपल्याला सर्वलिंग समावेशक स्वच्छतागृहांची गरज आहे, कारण लिंग हे केवळ स्त्री आणि पुरुष इतकेच मर्यादित नाही.

त्यामुळेच हार्पिकने परिवर्तनाची ही हाक स्वीकारली आहे. मोकळ्या मनाने आणि सखोल ज्ञानाने, हार्पिकने आपली उत्पादने LGBTQ+ समुदायाचा समावेश असलेल्या समाजातील समृद्ध वीण पूर्ण करतात याची खात्री करण्यासाठी उल्लेखनीय प्रगती केली आहे. शिक्षण ही मनोवृत्ती बदलण्याची गुरुकिल्ली आहे हे ओळखून, हार्पिकने प्रेरणादायक मोहिमा सुरू केल्या आहेत ज्या लिंग अभिव्यक्तीच्या सुंदर विविधतेवर प्रकाश टाकतात. या सशक्त उपक्रमांद्वारे, समाजाला जागृत केले जाते, त्यांचे पालनपोषण केले जाते आणि स्वीकृती वाढेल असे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

या उपक्रमांच्या शिखरावर, हार्पिक आणि न्यूज 18 चे मिशन स्वच्छता और पानी: एक अशी चळवळ आहे जी स्वच्छतागृहांचे महत्त्व जाणते, त्यांना केवळ कार्यभाग साधण्याची जागा म्हणूनच पाहत नाही तर सुरक्षिततेचे आणि उपेक्षितांसाठी स्वीकार करण्याचे बीकन म्हणून पाहते. स्वच्छ आणि सर्वसमावेशक शौचालये आम्हा सर्वांना बिनशर्त सामावून घेणार्‍या आणि सक्षम बनविणार्‍या समाजाला चालना देण्यासाठी अत्यावश्यक आहेत या दृढ विश्वासावर हे विशेष मिशन उभे केले गेले आहे.

अटूट समर्पणासह, हार्पिक आणि न्यूज 18 सक्रियपणे LGBTQ+ समाजाचा अंतर्भाव करतात आणि त्यांचे समर्थन करतात, प्रत्येक व्यक्ती सुरक्षित आणि स्वीकारार्ह ठिकाणी प्रवेशास पात्र आहे, जिथे त्यांचा सन्मान राखला जातो आणि त्यांची उपस्थिती स्वागतार्ह असते असा संदेश दिला जातो. संवादाला प्रोत्साहन देऊन, सहयोगी स्वतःला शिक्षित करू शकतील अशी जागा निर्माण करून, आणि तळागाळातील चळवळी आणि NGO ला पाठिंबा मिळवण्यासाठी एक मोठे व्यासपीठ देऊन, मिशन स्वच्छता और पानी भागीदारी आणि निष्ठा सक्षम करत आहे ज्यामुळे एकमेकांची पोहोच आणि प्रभाव वाढविण्यात मदत होते.

अशा प्रकारे आपण न्याय्य समाज निर्माण करतो – एकमेकांचा आवाज मोठा करून. तुम्ही या राष्ट्रीय परिवर्तनाचा एक भाग कसा बनू शकता हे जाणून घेण्यासाठी आम्हाला येथे सामील व्हा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News