22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

वैवाहिक जीवनात कुरबुरी, जाणून घ्या साप्ताहिक राशी भविष्य


मुंबई, 23 जुलै: आज दिनांक २३ जुलै २०२३ वार रविवार. ,आज अधिक श्रावण शुक्ल पंचमी. या आठवड्यातील ग्रह गोचर आणि चंद्राचे भ्रमण यावर आधारित साप्ताहिक राशी भविष्य पाहूया.

या सप्ताहात गुरु मेष राशीत असून राहू गुरू योग आहे. शनी कुंभ राशीत वक्री अवस्थेत असून मंगळ सिंह राशीत आहे. शनि मंगळ प्रतियोग होत आहे . शुक्र सिंह राशीत गोचर करीतअसून दिनांक २३ रोजी वक्री होणार आहे.. बुध सूर्य कर्क राशीत असून राहू केतू मेष व तुला राशीत आहेत.बुधाचे गोचर दिनांक २४ रोजी सिंह राशीत होईल. या सप्ताहात चंद्र कन्या, तुला,वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करेल. या सप्ताहात श्री विष्णूचे शुभ मंगल आशीर्वाद सर्व भाविकांना मिळो ही सदिच्छा. या ग्रह गोचर अनुसार व लग्नानुसार साप्ताहिक भविष्य .

मेष

राशी स्वामी मंगळ सिंह या राज राशीत आहे. त्याबरोबर वक्री होणारा शुक्र कमालीचे आकर्षण निर्माण करेल. संतती ही तुमची प्राथमिकता करेल.. व्यवसायात उत्तम संधी निर्माण होतील. राशीतील राहू वर्तमान काळात प्रत्येक बाबतीत संभ्रमित मनस्थिती करेल .त्या सोबत असलेला गुरू उच्च दर्जाची अभिरुची संपन्न प्रवृत्ती देईल. लाभ स्थानातील शनि वृद्ध व्यक्तीं कडून फायदा घडवेल.. गुरू धर्म विषयक आस्था तसेच त्या क्षेत्रात अधिकारी व्यक्तीची भेट घडवून देईल. भावंडाना उत्तम काळ. कलाकारांना प्रोत्साहन मिळेल. चंद्र आर्थिक लाभ घडवेल.. एकूण सप्ताह पूर्वार्धात उत्तम फळ देणारा ठरेल. गुरू उपासना करावी.

वृषभ

राशी स्वामी शुक्र हा राजयोग कारक असून चतुर्थ स्थानात वक्री होत आहे. घरासाठी शुभ योग निर्माण करेल. प्रवासात सुखद अनुभव येतील. स्वभावात सौम्यत्ता आणेल. गुरू मित्र आणि परदेश दौऱ्यापासून फायदा करून देईल. प्रवासाचे योग येतील. बहीण भावांशी संबंध सुधारतील. तसेच संपर्क, नवीन ओळखी यापासून फायदा होईल. संतती मानसिक त्रास देणार आहे. मनावर ताबा ठेवून हा आठवडा काळजीपूर्वक घालवावा. व्यय राहू आणि षष्ठ केतू खर्चाचे नियोजन योग्य प्रकारे करा तसेच परदेश संबंधी व्यवहार सावध राहून करा असे आवाहन करीत आहे. सप्ताह चांगला जाईल .

मिथुन

राशी स्वामी बुधाचे द्वितीय स्थानातील भ्रमण व सूर्य कार्यक्षेत्रात सहज संधी, तसेच शैक्षणिक क्षेत्रा संबंधी यश दाखवीत आहे. तृतीय स्थानात शुक्र सावधानता बाळगावी असे सांगत आहे. लौकरच बदल होईल. संततीशी जमवून घ्या . प्रवासावर भरपूर खर्च कराल. दशम स्थान जागृत आहे. नोकरीत फायदा होईल. चंद्र भ्रमण खर्च, प्रवास योग , संतती संपत्ती प्राप्ती दाखवीत आहे. घरामध्ये काही आनंदी घटना घडेल. शुभ सप्ताह.

कर्क

राशी स्वामी चंद्र कन्या राशीत कौटुंबिक लाभ होतील. मानसिक स्वास्थ्य मिळेल. . दशम गुरू परदेश गमनची संधी निर्माण करेल. तीर्थ क्षेत्राचे प्रवास घडतील. मित्र मैत्रिणीशी संबंध सुधारण्याची शक्यता आहे. दशम राहू हा कार्यक्षेत्रात होणाऱ्या बदलांचा कारक आहे. योग्य निर्णय घेऊन मार्ग काढावा लागेल. आर्थिक लाभ होतील. तसेच कुटुंबात काही शुभ घटना घडतील . आयुष्यात नवीन वक्तीचे आगमन होण्याची शक्यता आहे. वक्री शुक्र आर्थिक दृष्ट्या चांगले फळ देईल. सप्ताह शुभ जाईल.

सिंह

राशी स्वामी रवि बुध स्वस्थानात सहयोग देतील. राहू धर्म विषयक , तसेच व्यवसाय संबंधात कर्ज , बँकेचे व्यवहार इत्यादी घडवून आणेल. कार्य क्षेत्रात नवीन संधी मिळतील. त्याचा योग्य फायदा घ्या. आयुष्यात स्थैर्य राहणार नाही. रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करा. फारशी अपेक्षा ठेवू नका. घरामध्ये बदल होतील. वक्री शुक्र भरपूर खर्च करेल . राशीतील मंगळ रागावर ताबा ठेवा असे सांगत आहे. उत्तरार्ध फायद्याचा असून एकूण सप्ताह उत्तम.

कन्या

राशी स्वामी बुध रविसोबत असून कार्यक्षेत्रात दबदबा निर्माण करेल. काही व्यवसायाच्या संधी निर्माण करणार आहे. लिखाणातून फायदा होईल . प्रकृतीची काळजी घ्या. जोडीदाराला देखील फायदे होऊ शकतात. सामाजिक जबाबदारी वाढेल. तसेच समाजात नाव होईल. अष्टम राहू आर्थिक दृष्ट्या सक्षम करेल. शेअर्स लॉटरी पद्धतीने लाभ होईल. मात्र डोळ्याचे तसेच पोटाचे त्रास होऊ शकतात. काहीही कारण नसताना हुरहूर लागून मन अस्वस्थ राहील. गुरू सर्व आपत्ती मधून मार्ग काढेल. शुक्र मंगळ योग असून अविवाहित व्यक्तीं जोडीदार निवडताना जपून. सप्ताह उत्तम.

तुला

शुक्राचे लाभ स्थानातील भ्रमण घरामध्ये उंची वस्तूंची खरेदी तसेच संततीची प्रगती दाखवीत आहे. मंगळ नवीन संधी देईल. बुध उदित होत आहे. नकारात्मक लहरी कमी करील. नोकरीत हालचाली कराव्या लागतील. मातृ पितृ भेट होईल. गुरू नोकरी आणि व्यवसाय यासाठी शुभ दायक असून मातुल घराण्या कडून शुभ वर्तमान देईल. जोडीदार निवडताना काळजी घ्या. नीट चौकशी करा. तसेच वैवाहिक जीवनात गैर समज होऊ देऊ नका. चंद्र भ्रमण सुखद आर्थिक लाभ देईल. सप्ताह उत्तम.

भितिदायक स्वप्नांपासून या 4 उपायांनी करा सुटका, कायम लक्षात ठेवा ही दिशा

वृश्चिक

राशी स्वामी मंगळ दशम स्थानात असून शुक्र ही तिथेच आहे.अत्यंत यशस्वी उपक्रम हाती घ्याल प्रकृती संबंधी त्रास कमी करेल .भांडण टाळा. प्रवास,बंधू भगिनी भेट आणि कला प्रकारात रुची असा हा आठवडा आहे. अनेक नवीन व्यक्तींशी ओळख तसेच संपर्क होईल. संतती प्राप्ती साठी हा काळ शुभ आहे. लाभ स्थानातील चंद्र पूर्वार्धात शुभ फळ देईल. धार्मिक कार्यक्रम होतील. प्रवास योग येतील..लाभ दायक सप्ताह आहे.

धनु

राशी स्वामी गुरू पंचम स्थानात गृहसौख्य . सामाजिक प्रतिष्ठा ,संततीलाभ दाखवीत आहे. घरामध्ये काही सजावट,नवीन सुख सोयी करून घ्याल. पंचमातील राहू कुटुंबात वाढ सुचवीत आहे.अनेक नवीन विषयात रुची निर्माण होईल .पंचम स्थानातील ग्रहाधिक्य आर्थिक लाभ, तसेच घरात काही शुभ घटना दाखवीत आहे.भाग्य स्थानात मंगळ शुक्र पराक्रमात वाढ करेल. तसेच शत्रू निर्माण करेल. पण अखेर विजय तुमचाच होईल. चंद्र भ्रमण आर्थिक लाभ पण खर्चिक सप्ताह आणि मानसिक ताण दाखवीत आहे. उत्तरार्ध अनुकूल जाईल.

मकर

गुरू ग्रहांचे गोचर चतुर्थ स्थानातअसून शुभ फळ देतील. अष्टम मंगळ आहे उष्णतेचे विकार सतावू शकतात. शुक्र मंगळ आकर्षक घराचे स्वप्न पूर्ण करेल . जोडीदारांसाठी पैसे खर्च होतील. गुरू घरा बाबतीत शुभ ठरेल .तसेच काही चांगल्या घटना घडतील. प्रवास आणि बंधुभेट घडवेल. तुमच्या संभाषण कौशल्यात विशेष वाढ होईल. वक्री शुक्र व मंगळ वैवाहिक जीवनात कुरबुरी करेल. प्रकृती जपा. सप्ताह एकूण चांगला जाईल. शनीची उपासना करावी.

कुंभ

राशी स्वामी शनि स्वस्थानात वक्री आणि चंद्र अष्टम स्थानात जोडीदारकडून काही अनपेक्षित पेच निर्माण करू शकतो. आरोग्य जपा. दवाखान्याच्या फेऱ्या तसेच औषध पाण्यावर खर्च होऊ शकतो. काहीही अनाठायी धाडस करू नका. मंगळ सप्तम स्थानात जोडीदाराची आरोग्य चिंता निर्माण करेल. वाद करू नका. घरात शांतता ठेवा. आर्थिक लाभ तसेच पैतृक संपत्ती यासंबंधी हा आठवडा शुभ आहे. पूर्वार्ध जपून रहा. बुध कायद्याचे भान ठेवा असे सांगत आहे उत्तरार्ध मध्यम राहील.

शनिदेव आणि शुक्राच्या युतीमुळे तयार होतोय ‘खप्पर योग’, या 3 राशींचे उजळेल भाग्य

 मीन

धन स्थानातील गुरू तसेच पंचम स्थानात सूर्य बुध, षष्ठस्थानातील मंगळ शुक्र या आठवड्यात शुभ समाचार देतील. संतती लाभ होईल .शनी कुंभ राशीत काहीसा नकारात्मक अनुभव देईल. पैसा खर्च करेल. प्रवास तसेच बंधू भेट संभवते. पण प्रकृतीचे त्रास संभवतात. चंद्र प्रवासी असून पूर्वार्ध अनुकूल . शनि उपासना करावी. उत्तरार्ध प्रकृती जपा असे सांगत आहे. शुभ सप्ताह.

शुभम भवतू !!

ऋतुपर्णा मुजुमदार.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News