25.2 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

संडे सुट्टी होईल वसूल, मित्रही देतील साथ, कसा असेल 23 जुलैचा दिवस?


मुंबई, 23 जुलै: सितारा – द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa – The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 23 जुलै 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

दिवसासाठीचा सारांश : आज मेष राशीच्या व्यक्तींना प्रचंड ऊर्जा मिळेल. त्यामुळे आयुष्याच्या सर्व क्षेत्रांत त्या व्यक्ती पुढे जातील. वृषभ राशीच्या व्यक्ती सौंदर्याचं कौतुक करतील आणि रिलेशनशिप्स मजबूत करतील. मिथुन राशीच्या व्यक्तींची बुद्धिमत्ता चमकेल आणि खुल्या संवादातून सलोखा निर्माण होईल. कर्क राशीच्या व्यक्तींचे भावनिक बंध दृढ होतील. त्यांना घरी दिलासा मिळेल. सिंह राशीच्या व्यक्तींच्या पराक्रमामुळे त्यांचे रोमँटिक नातेसंबंध तयार होतील. कन्या राशीच्या व्यक्तींना तपशीलांकडे लक्ष देण्याच्या असलेल्या सवयींमुळे कामातल्या आव्हानांना तोंड देता येईल. तूळ राशीच्या व्यक्ती प्रेमात संतुलन साधतील आणि घरी शांततामय वातावरण तयार करतील. वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या तीव्रतेतून पॅशनेट नातेसंबंध विकसित होतील. धनू राशीच्या व्यक्ती धाडस करतील आणि भविष्यातल्या प्रवासांचं नियोजन करतील. कुंभ राशीच्या व्यक्तींचा प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन युनिक असेल. त्यातून सर्जनशीलतेला वाव मिळेल. मीन राशीच्या व्यक्ती अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवतील. त्यांना घरी शांतता मिळेल. आगामी दिवसात या गोष्टी अनुभवता येतील.

मेष (Aries) (21 मार्च ते 19 एप्रिल)

आज तुमच्याकडे ऊर्जा अक्षरशः ओसंडून वाहत असेल. ती तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे जायला मदत करील. तुमचं जोडीदाराबद्दलचं प्रेम वाढेल आणि नातेसंबंध दृढ होतील. घरी आराम आणि सुरक्षितता मिळत असल्याची नव्याने जाणीव होईल. कामाच्या ठिकाणी अडचणी असतील; पण तुमच्या चिकाटीमुळे तुम्ही त्यातून मार्ग काढाल. प्रवासाचे बेत सध्या रहित केले असले, तरी आकर्षक नवे अनुभव मिळण्याची शक्यता आहे. स्वतःची काळजी घेऊन हेल्दी लाइफस्टाइल राखा. फोकस्ड राहा. कारण तरच तुम्ही तुमची भविष्यातली उद्दिष्टं गाठू शकता.

LUCKY Stone – An Opal

LUCKY Color – Red

LUCKY Number – 17

वृषभ (Taurus) (20 एप्रिल ते 20 मे)

आज तुमच्या सभोवतालच्या सौंदर्याचं कौतुक करण्यात काही वेळ व्यतीत करा. तुमच्या रोमँटिक रिलेशनशिपमध्ये प्रगती होईल. त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीशी भावनिकदृष्ट्या अधिक जोडले जाल. आराम मिळण्यासाठी घरी शांत वातावरण तयार करा. कामाच्या ठिकाणी तुमच्या संयमाची परीक्षा पाहिली जाण्याची शक्यता आहे; मात्र तुम्ही टिकून राहिलात तर यशप्राप्ती होईल. ही संधी तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाचा शोध घेण्यासाठी वापरा. तुमचे व्हेकेशन प्लॅन्स आटोपते घ्यावे लागले तरी चालेल. आरोग्य सांभाळण्यासाठी स्वतःची काळजी घेणं हा महत्त्वाचा भाग आहे. तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. कारण तुम्ही भविष्यातल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकता.

LUCKY Stone – White Sapphire

LUCKY Color – Green

LUCKY Number – 26

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

आज तुमची बुद्धी पूर्वी कधीही झळकली नव्हती एवढी झळकेल. नातेसंबंधांमध्ये सलोखा राखण्यासाठी संवाद ही महत्त्वाची बाब आहे. घरी सर्जनशील व्हा आणि तुम्ही जे काही आहात त्याचं प्रतिबिंब तुमच्या आजूबाजूला दिसू द्या. कामाच्या ठिकाणी अडचणी असल्या तरी जुळवून घेण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला उत्तर शोधण्यास मदत होईल. तुमचे प्रवासाचे बेत पुढे ढकलले गेले, तर त्या वेळाचा उपयोग अभ्यासासाठी करा किंवा ऑनलाइन कोर्सेस करून तुमची तज्ज्ञता वाढवा. तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थात संतुलन राखा आणि आरोग्याची काळजी घ्या. भविष्यातली उद्दिष्टं आश्वासक दिसत आहेत. त्यामुळे त्यावर लक्ष ठेवा.

LUCKY Stone – Turquoise Jewellery

LUCKY Color – Yellow

LUCKY Number – 5

भितिदायक स्वप्नांपासून या 4 उपायांनी करा सुटका, कायम लक्षात ठेवा ही दिशा

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

आज भावना उचंबळून येऊ शकतात. त्यावर लक्ष ठेवा. तुमच्या जीवनातल्या व्यक्तींची काळजी घ्या आणि तुम्हाला काय वाटतं याबद्दल प्रामाणिक राहा. घरी तुमच्या प्रिय व्यक्तींमुळे तुम्हाला दिलासा मिळेल. त्यामुळे घर ही आरामदायी जागा असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या संयमाची परीक्षा पाहिली जाण्याची शक्यता आहे; मात्र योग्य दिशेने जाण्यासाठी तुमच्या अंतर्मनावर विश्वास ठेवा. प्रवासाचे प्लॅन्स मर्यादित असले, तरी ताजे अनुभव घेण्याकडे लक्ष द्या. स्वतःची काळजी घ्या, जेणेकरून आरोग्य चांगलं राहील. प्रेरित राहा, जेणेकरून भविष्यातली उद्दिष्टं गाठण्यास मदत होईल.

LUCKY Stone – Pearl

LUCKY Color – Silver

LUCKY Number – 22

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

तुमचा अंगभूत आकर्षकपणा आज चमकेल. तुम्ही प्रेमात असाल, तेव्हा तुमचं पॅशन हळूहळू बहरेल. तुमच्या नातेसंबंधांत प्रेम खुलेल. घरी स्वतःभोवती उबदारपणा आणि सकारात्मकता राहील याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी अडचणी असू शकतील; मात्र तुमचा आत्मविश्वास तुम्हाला त्यातून बाहेर पडायला मदत करील. तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाचा वेध घेण्यासाठी थोडा वेळ काढा. तुमचे प्रवासाचे बेत थोडे मागे राखावे लागले, तर तुमची प्रेरणा काय आहे हे शोधून काढा. तुमच्या दिनचर्येत व्यायामाचा समावेश करा आणि आरोग्याची काळजी घ्या. तुम्ही भविष्यातली उद्दिष्टं गाठू शकता. त्यामुळे उत्साहाने त्या दिशेने वाटचाल करा.

LUCKY Stone – Amber

LUCKY Color – Gold

LUCKY Number – 9

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

काटेकोरपणाकडे तुमचं असलेलं लक्ष आज उपयुक्त ठरेल. प्रेमाचे नातेसंबंध मजबूत करण्यासाठी खुल्या संवादाकडे लक्ष द्या. घरात अडगळ, पसारा आवरा आणि उत्पादकतेसाठी नियोजनबद्ध जागा तयार करा. कामाच्या ठिकाणी अडचणी असू शकतात; मात्र तुमच्या विश्लेषण कौशल्याच्या आधारे तुम्ही त्यावर मात करू शकता. तुमच्यासाठी सहलीचे प्लॅन्स मर्यादित असले, तरी या वेळाचा उपयोग आत्मपरीक्षण आणि विकासासाठी करून घ्या. रिलॅक्सेशन आणि ताण कमी करण्याला प्राधान्य द्या, जेणेकरून आरोग्याची काळजी घेतली जाईल. स्वतःवर विश्वास ठेवल्यास भविष्यातल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यास मदत होईल.

LUCKY Stone – Emerald

LUCKY Color – Navy Blue

LUCKY Number – 83

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

संतुलन राखणं हे तुमचं आजचं मार्गदर्शक तत्त्व असेल. प्रेमात असाल तेव्हा जोडीदाराशी सहमती मिळवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या संवेदनशीलतेचं प्रतिबिंब दिसेल अशी शांतता घरी तयार करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी अडचणी असल्या, तरी तुमच्या मुत्सद्देगिरीमुळे त्यावर मात करणं शक्य होईल. नियोजनानुसार प्रवास करण्याऐवजी वेगवेगळ्या संस्कृतीतल्या व्यक्तींशी नातेसंबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करा. काम आणि आराम यांमध्ये संतुलन राखल्यास तुम्हाला चांगलं राहण्यास मदत होईल. प्रक्रियेवर विश्वास ठेवा. तुमची भविष्यकालीन उद्दिष्टं उज्ज्वल दिसत आहेत.

LUCKY Stone – Rhodonite Crystal

LUCKY Color – Pink

LUCKY Number – 14

शनिदेव आणि शुक्राच्या युतीमुळे तयार होतोय ‘खप्पर योग’, या 3 राशींचे उजळेल भाग्य

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

तुमची तीव्रता ही आज तुमची प्रेरणा असेल. प्रेमात असलात, तर तुमचे बंध दृढ करण्यासाठी तुमच्या पॅशनेट बाजूचं प्रदर्शन घडवा. भावनिक विकास आणि रिफ्लेक्शन यांना प्रोत्साहन देणारी जागा घरात तयार करा. कामाच्या ठिकाणी अडचणी असल्या, तरी तुमच्या जुळवून घेण्याच्या क्षमतेमुळे त्यातून बाहेर पडू शकाल. तुमचे ट्रिप प्लॅन्स मर्यादित असले, तरी त्या संधीचा उपयोग तुमच्या मानसिकतेचा अभ्यास करण्यासाठी करा. शरीराची काळजी घेण्यासाठी मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करा. तुमची भविष्यकालीन उद्दिष्टं प्राप्त करण्यासारखी आहेत. त्यामुळे फोकस्ड राहा.

LUCKY Stone – Garnet

LUCKY Color – Maroon

LUCKY Number – 68

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

तुमची धाडसाची भावना आज तुम्हाला मार्ग दाखवील. स्वतःला लवचीक ठेवा आणि प्रेमात असाल तेव्हा नवे अनुभव घ्या. तुमचं सर्जनशील व्यक्तिमत्त्व दिसून येईल अशी जागा घरात तयार करा. कामाच्या ठिकाणी आव्हानं असतील; मात्र तुमच्या सकारात्मकतेमुळे तुम्हाला ओरिजिनल उत्तरं शोधण्यात मदत होईल. नवं परिप्रेक्ष्य मिळण्यासाठी आकर्षक गेट-अवे प्लॅन्सचं नियोजन करा. सक्रिय राहा आणि आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी निसर्गाशी निगडित कृती करा. तुमच्या भविष्यकालीन महत्त्वाकांक्षा उज्ज्वल दिसत आहेत. त्यामुळे बक्षिसावर लक्ष ठेवा.

LUCKY Stone – Amazonite

LUCKY Color – Purple

LUCKY Number – 11

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

वास्तववाद तुम्हाला आज दिशा दाखवील. स्थिरता आणि समर्पण यांमुळे तुमच्या रोमँटिक रिलेशनशिपमध्ये सुधारणा होतील. रचनात्मक वातावरण तयार करण्याला प्राधान्य द्या. तसंच, घरी दीर्घकालीन उद्दिष्टं प्राप्त करण्याला प्राधान्य द्या. कामाच्या ठिकाणी अडचणी असतील; मात्र तुमच्या लवचिकतेमुळे तुम्हाला त्यातून बाहेर पडता येईल. तुम्हाला प्रवासाचे पर्याय मर्यादित असले, तरी भविष्यातल्या यशाची उद्दिष्टं आताच ठरवा. आरोग्याची काळजी घेण्यासाठी संतुलित लाइफस्टाइल राखा. शिस्त राखल्यास तुम्ही भविष्यकालीन उद्दिष्टं गाठू शकाल.

LUCKY Stone – Tiger’s eye

LUCKY Color – Brown

LUCKY Number – 31

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

आज तुम्ही झळकाल. प्रकाशात याल. त्याचं कारण म्हणजे तुमचा ठोस दृष्टिकोन असेल. नातेसंबंधांत तुमचा युनिकनेस स्वीकारा आणि तुमच्या वैशिष्ट्यांचा आदर करणारा जोडीदार शोधा. घर ही अशी जागा बनवा, की जिथे नावीन्यता आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळेल. कामाच्या ठिकाणी समस्या असू शकतील; मात्र तुमच्या आउट ऑफ द बॉक्स विचार करण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला उत्तरं मिळण्यास मदत होईल. नव्या कन्सेप्ट्स शोधण्यासाठी आणि तुमच्या ज्ञानवृद्धीसाठी या वेळेचा उपयोग करा. तुमचे प्रवासाचे प्लॅन्स रहित करावे लागू शकतील. आरोग्याची काळजी घेण्यासाठी माइंडफुलनेस व्यायामांचा समावेश रूटीनमध्ये करा. भविष्यासाठीचे प्लॅन्स डायनॅमिक दिसत आहेत. त्यामुळे काम करणं सोडू नका.

LUCKY Stone – Aquamarine

LUCKY Color – Turquoise

LUCKY Number – 2

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

आज कोणत्याही प्रकारची शंका असल्यास अंतःप्रेरणा तुम्हाला त्यातून मार्ग दाखवील. प्रेमात असल्यास भावनिक बंधांना प्राधान्य द्या आणि तुमच्या सहानुभूतिपूर्ण स्वभावाचा स्वीकार करा. तुमचं घर ही एक शांत जागा बनवा, जिथे तुम्हाला शांतता, समृद्धी लाभेल. कामाच्या ठिकाणी अडचणी असू शकतील; पण दुसऱ्याच्या भावना समजून घेण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला त्यातून बाहेर पडता येईल. तुमच्या इमॅजिनेशनचा शोध घेण्यासाठी कलात्मकतेचा वापर करा. तुमचे ट्रिप प्लॅन्स अचानक फायनल होऊ शकतात. शांततेचे क्षण शोधा. स्वतःची काळजी घ्या. तुमची भविष्यकालीन उद्दिष्टं तुम्ही गाठू शकता. त्यामुळे मन काय सांगतंय, त्यावर विश्वास ठेवा.

LUCKY Stone – Unakite

LUCKY Color – Marine green

LUCKY Number – 75

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News