23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

OMG! या पुरुषाला आहेत महिलांसारखे ब्रेस्ट; बुब्सवाला मॅन चर्चेत


वॉशिंग्टन, 22 जुलै : महिला आणि पुरुषांची शारीरिक रचना वेगवेगळी असते. महिला आणि पुरुषांना निप्पल्स तर असतात पण बुब्स मात्र महिलांना.महिलांप्रमाणे पुरुषांच्या छातीवर ब्रेस्ट नसतात. पण एक असा पुरुष ज्याला चक्क बुब्स आहेत. त्याची छाती महिलांसारखी आहे, छातीवर ब्रेस्ट आहेत. अमेरिकेतील ही व्यक्ती आहे.

न्यूयॉर्क शहरातील ब्रुकलिन इथं राहणारा टिमोथी बेक वर्थ, आता 34 वर्षांचा आहे. त्याची छाती महिलांसारखी आहे. सामान्यपणे एखादी व्यक्ती लठ्ठ असली की तिची छाती वाढते. पण याच्याबाबतीत तसं बिलकुल नाही. वयाच्या बाराव्या वर्षी जेव्हा मुलींची छाती वाढू लागते, त्याच वयात टिमोथीच्या स्तनांचा आकार वाढू लागला. त्याला चिंता वाटू लागली. त्याने डॉक्टरांना दाखवलं.

त्याला गायनेकोमास्टिया असल्याचं निदान झालं. किशोरावस्थेत उद्भवणारी ही स्थिती. यात हार्मोन्स असंतुलनामुळे मुलांचं स्तन सामान्य आकारापेक्षा मोठे होतात.

लठ्ठपणावर उपचार करायला गेली महिला; पण पोटात होतं असं काही की डॉक्टरांनाही बसला धक्का

टिमोथीने सांगितल्यानुसार व्यायाम केलं, वजन उचललं तरी त्याचा स्तनांवर काही परिणाम नाही. स्तन कमी होत नाही. त्यांचा आकार तसाच राहतो.  त्याच्या स्तनाचा आकार 40 सी साइजच्या ब्रासारखा होता. इनसाइडर वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, टिमोथीने सांगितलं, चरबी झाल्यानंतर त्याचे स्तन लोकांच्या नजरेत अधिक येऊ लागले. त्याचं शरीर त्याची चेष्टा करत आहे, असं त्याला वाटलं. शाळा-कॉलेजमध्ये वर्गमित्रांनी त्याची इतकी चेष्टा केली की लोकांसमोर शर्ट काढायला त्याला लाज वाटली.

थोडसं खरचटलं म्हणून दुर्लक्ष केलं, नंतर मात्र जीवावर बेतलं, तरुणासोबत धक्कादायक प्रकार

जेव्हा तो मोठा झाला तेव्हा टिमोथीने स्वतःच्या शरीराचा तिरस्कार केला आणि त्याने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

पण आयुष्याच्या एका वळणावर त्याला जाणवलं की आपण हे सगळं कोणासाठी करत आहोत. आफलं शरीर एक भेट आहे आणि त्याचा तिरस्कार करणं किंवा ते बदलणं चुकीचं आहे. त्याने आफली विचारसरणी बदलली. तेव्हापासून त्याने त्याचं शरीर जसं आहे तसं स्वीकारलं आहे. आता आपले स्तन आपल्या लव्ह लाइफ किंवा आयुष्याच्या कोणत्याही पैलूत अडचण ठरतात असं त्याला वाटत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News