22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

शेव्हिंग केल्यानंतर अशाप्रकारे घ्या त्वचेची काळजी, अन्यथा होईल गंभीर परिणाम


त्वचेचं सौंदर्य टिकवण्यासाठी नियमित क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग करणं आवश्यक असतं. या स्कीन केअर रूटीन बरोबरच त्वचेवरील अनावश्यक केस काढून टाकणंही गरजेचं असतं. महिला आणि पुरुष दोघंही शरीरावरील नको असलेले केस काढतात. त्यासाठी शेव्हिंग हा सर्वांत सोयीस्कर आणि किफायतशीर पर्याय आहे. 200 रुपयांचा रेझर तुम्ही काही महिन्यांसाठी वापरू शकता. यातून अंदाजे 500 ते 800 रुपयांच्या दरम्यान बचत होते. कारण, कोणत्याही स्त्रीला साधारणपणे दर महिन्याला वॅक्सिंगसाठी 500 ते 800 खर्च करावे लागतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेव्हिंग तुमच्या त्वचेसाठी सुरक्षित आहे. पण, एखाद्यानं रेझर काळजीपूर्वक वापरलं आणि शेव्हिंग करण्यापूर्वी व नंतर त्वचेची योग्य काळजी घेतली तरच शेव्हिंग हा पूर्णपणे सुरक्षित पर्याय ठरू शकतो.

मुंबई येथील ‘द एस्थेटिक क्लिनिक’मधील कन्स्लटंट डर्माटॅलॉजिस्ट, कॉस्मेटिक डर्माटॅलॉजिस्ट आणि डर्माटो-सर्जन डॉ. रिंकी कपूर यांच्या मते, शरीरावरील केस काढण्यासाठी रेझर वापरल्यानं अनेक फायदे होतात. म्हणूनच, त्वचेचं नुकसान टाळण्यासाठी जेव्हा तुम्ही शेव्हिंगचा पर्याय निवडता तेव्हा त्याच्या वापराची योग्य पद्धत समजून घेणं महत्त्वाचं ठरतं.

डॉ. कपूर यांनी सांगितलेले शेव्हिंगचे फायदे:

1. शेव्हिंगमुळे त्वचेच्या वरच्या थरातील घाण आणि मृत पेशी निघून जातात. ते त्वचेसाठी सौम्य एक्सफोलिएटर म्हणून कार्य करते. हे मेकअपचा शिल्लक राहिलेला भाग काढून टाकण्यास देखील मदत करते. यामुळे तुमची त्वचा ताबडतोब मऊ आणि चमकदार तर होतेच शिवाय नैसर्गिकरित्या नवीन पेशी तयार होण्यास देखील मदत होते.

2. जेव्हा तुम्ही तुमच्या शरीरावरील केस शेव्ह करता तेव्हा त्वचेवरील मृत पेशी काढून टाकल्या जातात आणि त्यामुळे स्कीन केअर प्रॉडक्ट्स चांगल्याप्रकारे त्वचेत शोषली जातात. जर नियमित स्किनकेअर करूनही इच्छित परिणाम दिसत नसेल तर तुम्ही त्वचेवरील केस शेव्ह करू शकता.

3. शेव्हिंगमुळे मेकअप व्यवस्थित बसण्यास मदत होते. कारण, शेव्हिंग केल्यानंतर मेकअप प्रॉडक्ट्स त्वचेशी चांगल्या प्रकारे एकरूप होतात.

4. शेव्हिंग ही शरीरातील अनावश्यक केस काढून टाकण्याची वेदनारहित, स्वस्त आणि वेळ वाचवणारी पद्धत आहे. तुमच्याकडे सलूनमध्ये जाण्यासाठी वेळ नसेल तेंव्हा केस काढण्याचा हा एक योग्य पर्याय आहे.

5. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे किंवा ज्यांना इतर हेअर रिमूव्हल क्रीम किंवा व्हॅक्सची अॅलर्जी आहे त्यांच्यासाठी शेव्हिंग सर्वात चांगला पर्याय आहे.

Morning Routine : दररोज सकाळी खा एक केळ, ‘या’ गंभीर आजारांपासून राहाल दूर

याचा अर्थ असा नाही की, शेव्हिंग केल्यानं त्वचेच्या समस्या उद्भवतच नाही. शेव्हिंगमध्ये फक्त त्वचेच्या पृष्ठभागापासूनच केस काढले जातात. फॉलिकल्समधून (मुळांपासून) केस काढले जात नाहीत आणि त्यामुळे त्वचेवर थोडा ताण येऊ शकतो. शेव्हिंगचा त्वचेचा वरचा थर असलेल्या एपिडर्मिसवर थोडाफार परिणाम होतो. हा थर ऊती आणि त्वचेच्या इतर स्तरांसाठी ओलावा टिकवून ठेवण्याचं काम करतो.

डॉ. तरसी क्लिनिक आणि ला पिएल स्किन क्लिनिकमधील कन्स्लटंट डर्माटॅलॉजिस्ट डॉ. शेफाली तरसी नेरुरकर (एमबीबीएस, एमडी) म्हणाल्या, “शेव्हिंग करणं ही एक स्वस्त प्रक्रिया आहे आणि अनेक स्त्रिया तिलाच प्राधान्य देतात. पण, अगदी उत्तम दर्जाचे रेझर वापरूनही त्वचेच्या काही समस्या उद्भवू शकतात.” डॉ. तरसी यांनी स्पष्ट केलं की, शरीरावरील केसांचं शेव्हिंग केल्यानं बंम्प्स, निक्स, कट आणि इनग्रोन हेअर, यांसारख्या समस्या होऊ शकतात. दुर्लक्ष केल्यास बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो. अंगावरचे केस वारंवार शेव्ह केल्यामुळे त्यांच्या वाढीला गती मिळते. काही केस आजूबाजूच्या ऊतींमध्ये शिरून वाकडे होऊ लागतात आणि त्वचेला त्रास देतात. शेव्हिंग करताना कापल्यामुळे त्वचेवर हायपरपिग्मेंटेशन आणि खुणा देखील राहू शकतात. शिवाय, शेव्हिंगचा प्रभाव फार कमी दिवस टिकतो आणि चार-पाच दिवसांत केस पुन्हा दिसतात. शेव्हिंगमुळे मुरुमांची समस्या आणि काळे डागदेखील दिसू शकतात.

रेझरच्या योग्य वापरासाठी उपयुक्त टिप्स:

1. जाड आणि खरखरीत केस असतील तर त्वचेची जळजळ टाळण्यासाठी साबणाऐवजी चांगल्या दर्जाचं शेव्हिंग क्रीम वापरलं पाहिजे. शेव्हिंग क्रीम केसांना मऊ करतात. परिणामी, त्वचेचं नुकसान न होता घोटे, गुडघे आणि कोपरं इत्यादीभोवतीचे केस सहज काढता येतात.

2. शेव्हिंग करायच्या जागेवर शेव्हिंग क्रीमचा जाड थर लावण्यासाठी ब्रश किंवा हाताचा वापर करा.

3. कोणतेही कट टाळण्यासाठी वारंवार रेझर बदला.

4. योग्य रेझर निवडा. मल्टी-ब्लेड रेझरऐवजी सिंगल-ब्लेड रेझर वापरा (इनग्रोन केसांचा धोका कमी होतो). पुरुष आणि स्त्रियांनी वेगवेगळ्या प्रकारचं रेझर वापरले पाहिजेत. कारण, त्यांच्या केसांचे प्रकार वेगळे असतात. नाजूक भाग, चेहरा आणि शरीराच्या इतर अवयवांसाठीदेखील वेगळ्या प्रकारचे रेझर मिळतात. कोरफड किंवा खोबरेल तेलाच्या मॉइश्चरायझिंग स्ट्रिप्सचा रेझर वापरल्यानं अधिक फायदे मिळतील.

5. प्रॉडक्टच्या पॅकेजवर नमूद केलेल्या सूचनांचं पालन केल्यास शेव्हिंग करणं अधिक सोपं होतं.

6. त्वचेची छिद्रे उघडण्यासाठी आणि त्वचा सैल करण्यासाठी कोमट पाण्यानं शेव्हिंगची जागा ओली करा. हळुवारपणे त्वचा एक्सफोलिएट करा.

7. केसांच्या वाढीच्या दिशेनं किंवा खालच्या दिशेनं शेव्हिंग करा. सरळ पण सौम्य स्ट्रोक वापरा.

8. चेहरा शेव्ह करताना तुम्ही त्वचेला अधिक ल्युब्रिकेट करण्यासाठी प्रायमिंग ऑईल वापरू शकता.

9. बुरशी आणि गंज टाळण्यासाठी रेझर स्वच्छ आणि कोरड्या जागी ठेवा.

10. जर तुम्ही एक्झिमा किंवा सोरायसिस सारख्या त्वचेच्या समस्यांनी ग्रस्त असाल किंवा त्वचेवर पुरळ असेल तर शेव्हिंग करू नका.

शेव्हिंग केल्यानंतर त्वचेची काळजी कशी घ्यावी?

शेव्हिंग केल्यानंतर त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे. डॉ. कपूर म्हणाल्या, “शेव्हिंगनंतर त्वचेची काळजी घेण्यासाठी मॉइश्चरायझिंग क्रीम आणि मलम हे सर्वोत्तम पर्याय आहेत. ही प्रॉडक्ट्स त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये न अडकता त्वचा बरी करतात. कोरफड, खोबरेल तेल, जोजोबा तेल, शिया बटर, स्क्वेलीन आणि नियासीनामाइड, लॅव्हेंडर, कॅमोमाइल, अ‍ॅवोकॅडो तेल, ग्लिसरीन यांसारखे घटक असलेली प्रॉडक्ट्स त्वचेचं पोषण करतात आणि ती मऊ ठेवतात. त्यामुळे त्यांचा वापर केला पाहिजे.

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, शेव्हिंगनंतर तुमच्या त्वचेला मॉइश्चराईझ करणं ही स्कीन केअरमधील एक महत्त्वाची पायरी आहे. आपल्या त्वचेचा पोत कसा आहे, त्यानुसार मॉइश्चरायझरची निवड करावी. विच हेझेल आणि निलगिरी तेल सारखे घटक जीवाणू नष्ट करण्यासाठी, छिद्र घट्ट करण्यासाठी आणि तुम्हाला अधिक मॅट रंग देण्यासाठी ओळखले जातात. तेलकट त्वचा असलेल्यांसाठी हे घटक असलेली प्रॉडक्ट्स अधिक चांगलं काम करतात.

डॉ. कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण वापरत असलेल्या शेव्हिंग जेलमध्ये कडुलिंब आणि हळदीसारखे घटक असावेत. जेणेकरून त्वचेचं संरक्षण होईल. रेझरमुळे त्वचेची जळजळ, मुरुम किंवा इनग्रोन केस यांसारख्या समस्या होत असलेल्यांसाठी, सॅलिसिलिक अॅसिड किंवा हायड्रोकोर्टिसोन, टी ट्री ऑईल आणि लिंबाचा रस यांसारखे घटक उपयुक्त ठरतात.

डॉ. शेफाली तरसी नेरुरकर यांनी सांगितलं की, शेव्ह केल्यानंतर लगेच थर्मल स्पा वॉटर असलेलं सौम्य लोशन लावावं. ते नसल्यास बर्फाचा वापर करा. त्वचेचं हायड्रेशन टिकवून ठेवण्यासाठी आणि त्वचेची जळजळ होऊ नये म्हणून कोणतंही नॉन-ऑइली बॉडी मॉइश्चरायझर्स वापरता येईल.

रेझरमुळे जखम झाल्यास काय करावं?

शेव्हिंगमुळे कापणं ही सामान्य बाब आहे. या जखमा लवकर बऱ्या होण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणतीही पद्धत वापरू शकता:

1. कापलेल्या भागावर कापसाने किंवा स्वच्छ हाताने व्हॅसलीन किंवा लिप बाम लावा.

2. रक्तस्राव थांबवण्यासाठी गरम पाण्याचा कॉम्प्रेस वापरा. गरम पाण्याचा कॉम्प्रेस सुद्धा अंगभूत केस काढून टाकण्यास मदत करतो. गरम पाण्याचं जास्त प्रेशर वापरा.

3. रक्तस्राव कमी करण्यासाठी जखमेवर बर्फाचा तुकडा ठेवा.

4. रक्तस्राव कमी करण्यासाठी विच हेझेल एक चांगला पर्याय आहे.

5. पोटॅशियम तुरटीचा वापर हा वैद्यकीय सल्ल्यामध्ये नाही. पण, बरेच लोक असा दावा करतात की, ते खूप उपयुक्त आहे.

6. शेव्हिंगनंतर दिसणार्‍या कोणत्याही निक्स आणि कट्सवर अँटिपर्स्पिरंट लावा. कट दाबण्याचा प्रयत्न करू नका. कारण, यामुळे अधिक रक्तस्राव होऊ शकतो आणि डाग राहू शकतो. इन्फेक्शन टाळण्यासाठी फ्युसिडिक अॅसिड किंवा मुपिरोसिन असलेली अँटिबॅक्टेरियल क्रीम देखील वापरू शकता.

चेहरा आणि प्रायव्हेट पार्ट्सचं शेव्हिंग

चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी शेव्हिंग करू नये, असा सल्ला डॉ. नेरुरकर यांनी दिला आहे. चेहऱ्याच्या केसांवर रेझर वापरल्यानं त्वचेची जळजळ होऊन लालसरपणा येऊ शकतो. चेहऱ्याची त्वचा नाजूक आणि मऊ असते. रेझरमुळे त्वचेवर मुरुमे देखील उद्भवू शकतात.

डॉ. कपूर यांनी चेहऱ्यावरील केस काढण्याचे सुरक्षित मार्ग सुचवले आहेत. चेहऱ्यासाठीचे रेझर हे वेगळे असतात. वेगळ्या रेझरचा वापर केल्यानं चेहऱ्यावर बॅक्टेरिया आणि जंतूंचं संक्रमण होण्यास प्रतिबंध होतो. मुरुम आणि जळजळ होण्याची शक्यता कमी होते. भुवया आणि ओठांच्या वरीलभागातील केस काढण्यासाठी, खास डिझाईन केलेली आणि बॅटरीवर चालणारी उपकरणं वापरा. जी सामान्यतः वापरण्यास सुरक्षित असतात.

दोन्ही तज्ज्ञांनी, जननेंद्रिये, मान आणि मानेचा मागचा भाग, पोट किंवा ओटीपोटाचा भाग आणि नितंबावर रेझर न वापरण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय, महिलांनी खास त्यांच्यासाठी तयार केलेलं रेझर वापरलं पाहिजे. कारण, पुरुष आणि स्त्रियांच्या रेझर्समध्ये फरक असतो. महिला आणि पुरुषांच्या शेव्हिंग क्रीममधील घटक सारखेच असतात त्यामुळे दोघेही समान क्रीम वापरू शकतात. आपलं रेझर इतर कुणालाही वापरण्यासाठी देऊ नये. असं केल्यास इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.

आठवड्यातून किंवा महिन्यातून किती वेळा शेव्हिंग केलं पाहिजे, याबद्दल कोणतेही लिखित नियम नाहीत. हा आपला वैयक्तिक निर्णय आहे. पण, शेव्हिंग करताना सरासरी 3 ते 4 दिवसांचे अंतर ठेवलं पाहिजे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News