23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

मोफत आरोग्य तपासणी

 

चंद्रपूर : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक, सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्टद्वारा मोफत आरोग्य तपासणी, नाडी तपासणी व मार्गदर्शन शिबिर 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता पासून स्थानिक श्री साईबाबा मंदिर, बालाजी वार्ड, टंडन ले – आउट चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हृदयविकार, मधुमेह, सर्व प्रकारचे कर्करोग, रक्तदाब, सांधेविकार, वातविकार, पोटाचे म आजार, स्त्रीरोग, किडनी स्टोन, व मूळव्याध, काविळ, लहान मुलांचे विकार, मानसिक विकार यावर उपचार करण्यात येणार आहेत.

यामध्ये बॉडी कम्पोझिशन मॉनिटर, ड्रग अल्टरनेटिव्ह टेस्ट, व्हिसरल फॅट, बॉडी फॅट, वेट, बॉडी मास इंडेक्स (बीएमआय), सेल एज, बॉडी एज, ” रेस्टिंग मेटाबॉलिझम (आरएम), बॉडी शुगर लेव्हल वरील सर्व चाचण्यांचा समावेश आहे. नाडी तपासणी मोफत केली जाईल. या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News