3.5 C
New York
Wednesday, February 21, 2024

स्वच्छ प्रतिमा, अभ्यासु धोरणांसह विवीध विषयांचा व्यासंग असलेले व्यक्तिम्त्व म्हणजे प्रभाकर आवारी

. प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत प्रभाकर आवारी यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि आपल्या आयुष्याला आकार दिला. अभावग्रस्ततेतही त्यांची जीवनाविषयीची अपार श्रद्धा कायम राहिली तसेच आपल्या माणसांवरच त्यांचं प्रेमही कायम राहिलं. परिस्थिती कितीही कठीण असो त्यांनी हसूनच त्या परिस्थितीचा सामना केला। आणि इतरांनाही हसवत ठेवलं. आपलं दुःख मनात ठेवून इतरांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे ही एक असाधारण कृती होय आणि ती प्रभाकऱजी यांना साध्य आहे.

एखादं ध्येय जेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहतं तेव्हा ते त्याचा सातत्यपूर्ण ध्यास घेतात त्यामुळे स्वीकारलेल्या कार्यात ते यशस्वी होतात. असंही म्हटलं जातं की यश वा अपयश हे सारख्याच तटस्थ भावनेने स्वीकारायला हवे. प्रभाकर यांचं आयुष्य हे यासंदर्भातलं उत्कृष्ट उदाहरण म्हणायला हवे. एखाद्या गोष्टीत मिळालेले यश असो वा अपयश ते तेवढ्याच तठस्थतेने स्वीकारतात आणि पुन्हा हसत खेळत कामाला लागतात, स्वतःही आनंदी राहतात आणि इतरांनाही आनंद देतात. ही आयुष्यातली खरंतर कठीण कामगिरी होय पण आयुष्यातील कठीण अनुभवानी त्यांना ही किमया साध्य झाली आहे.

प्रभाकरजी यांचं आणखी एक वैशिष्ट्य मला इथे नोंदवावसं वाटतं ते म्हणजे आयुष्याच्या वाटचालीत ते ज्यांच्या सोबत राहतात त्यांच्यासोबत ते अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात, एखादी गोष्ट आवडली नाही तर ती गोष्ट तितक्याच स्पष्टपणे मांडण्याचं धारिष्ट त्यांच्याजवळ आहे.

अशा अनेक अपवादात्मक गुणांनी त्यांचे व्यक्तिमत्व समृद्ध झाल आहे असे . वृत्तपत्र क्षेत्रातील सर्वांच्या ओळखीचे व्यक्तिमत्व श्री प्रभाकर आवारी संपादक प्रभात गुंजन यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांच्याविषयी थोडसं लिहिण्याचा प्रयत्न!
प्रभाकर आवारी यांचा जन्म सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात भद्रावती तालुक्यातील राळेगाव या खेड्यात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पाटाळा व वरोरा आनंद निकेतन येथे झाले. 1996 – 97 च्या दरम्यान त्यांनी चंद्रपूर तून आपल्या पत्रकारितेची सुरुवात केली. तत्पूर्वी त्यांनी नंदोरी येथे गिट्टी क्रेशर येथे मजूर म्हणून काम केले त्यांच्या कार्याची दखल घेत श्री D R पत्तीवार यांनी त्यांना चंद्रधून या वृत्तपत्राची धुरा सोपवली त्यांनी यशस्वीपणे आपल्या कार्याला न्याय दिला. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र साप्ताहिक प्रभात गुंजन या वृत्तपत्राची सुरुवात 2009 पासून आज पर्यंत यशस्वीपणे सांभाळत आहे. प्रभाकर आवारी हे एक यशस्वी पत्रकार म्हणून समाजात व जिल्ह्यात नावारूपास आलेले आहे. याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सन 2001 पासून श्री गुरुदेव सेवा मंडळ व राष्ट्रसंत साहित्य परिषद चे अधिकृत सदस्य होऊन श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य अविरतपणे ते सांभाळत आहे. अनेक गावात त्यांनी श्री गुरुदेव सेवा मंडळाची शाखा स्थापन करण्याचे कार्य केलेले आहे. त्यांच्या या कार्याची पावती म्हणून 2007 ला त्यांना चैतन्य युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री बंडोपंत बोडेकर यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी तुळशिनगर येथे त्यांनी मंडळाची स्थापना सुद्धा केलेली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात प्रियदर्शनी या श्री गुरुदेव सेवा मंडळाची शाखा सुद्धा त्यांनी स्थापन करून आदिवासीबहुल भागात सेवा मंडळाचे कार्य जोमाने चालू हावे याकरिता सुद्धा प्रयत्न केले आहे .अशा अनेक अपवादात्मक गुणांनी त्यांचे व्यक्तिमत्व समृद्ध झाल आहे. त्यांना निरामय दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचे सगळे संकल्प मनोहर पूर्ण हो अशी मी त्यांना जन्म दिवसा निमित्य शुभेच्छा देतो. :- विनोद पन्नासे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News