25.2 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

चंद्रपूर औष्णिक केंद्रातील 450 प्रकल्पग्रस्त कामगारांचा वर्कर्स फेडरेशन मध्ये प्रवेश

Chandrapur
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या वतीने चंद्रपूर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील प्रगत कुशल योजनेअंतर्गत काम करणाऱ्या प्रकल्पग्रस्त कामगाराचा मेळावा व प्रवेश सोहळा खेडूले कुणबी समाज सभागृह तुकुम चंद्रपूर येथे संघटनेचे अध्यक्ष मोहन शर्माजी,सरचिटणीस कृष्णा भोयर, उपाध्यक्ष एस.आर.खतिब,केद्रीय कार्यकारणी सदस्य सुधीर मुंडे,आकाश आडके, कॉम्रेड पुरुषोत्तम सहारे अप्रेंटिस कृती समिती जिल्हाध्यक्ष,चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील पदाधिकारी अमोल मोंढे,विजय भोयर,रविदास मडावी,कॉम्रेड ज्ञानेश्वर बोकडे, संदिप भोयर, भुजबळराव,कोराडी येथील पदाधिकारी विशाल लोंढे यांच्या उपस्थिती मध्ये आयोजित करण्यात आला होता.हा मेळावा प्रकल्पग्रस्त कामगार गणेश कांबळे, प्रकाश धानोरकर व संजय ठाकरे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला प्रकल्पग्रस्त कामगारांनी  मेळाव्यास उपस्थित मान्यवरांचे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
मेळाव्याचे प्रास्ताविक करताना श्री.निकेत टेंभुणे यांनी चंद्रपूर येथील प्रकल्पग्रस्तांच्या वेदना सांगताना स्पष्ट केले की ज्या प्रकल्पग्रस्तांना कुशल प्रगत योजनेअंतर्गत कामावर घेतले त्यांना सुरुवातीला रुपये १४ हजार मानधन दिल्या जाते,त्यानंतर प्रत्येक वर्षी रु.५०० वाढ करण्यात येते.असे २,५०० प्रकल्पग्रस्त महाराष्ट्रात आहे. चंद्रपूर येथे ४५० कर्मचारी आहेत.४५ वर्षापासून ते ५८ वर्षापर्यंत यांना निर्वाह भत्ता दिला जातो.या भक्तामध्ये कुटुंबाचे पालन पोषण,मुलाचे शिक्षण,विवाह या जबाबदाऱ्या पार पाडता येत नाही.म्हणून किमान वेतन कामगार कायद्यानुसार वेतन द्यावे,भविष्य निर्वाह निधीची कपात करण्यात यावी,ईसआय,मेडिकल या सुविधा उपलब्ध करून द्याव्या व कामगारांना ६० वर्षापर्यंत कामाचे संरक्षण द्यावे.याबाबत विस्तृतपणे भूमिका संघटना नेतृत्वाच्या पुढे मांडली.
पूर्वीचे प्रकल्पग्रस्त श्री.सुधीर मुंडे यांनी प्रकल्पग्रस्तासाठी यापूर्वी संघटनेने कसा लढा दिला याबाबतचे मार्गदर्शन केले.संघटनेचे उपाध्यक्ष एस.आर.खतीब यांनी प्रकल्पग्रस्ताचा प्रश्न सोडवण्याकरीता संघटनेने पुढाकार घेतला असून हा प्रश्न व्यवस्थापनाच्या पुढे मांडून मार्ग काढण्यात येईल मात्र आपण सर्वांनी वर्कर्स फेडरेशनच सभासदत्व स्वीकारले पाहिजे व महाराष्ट्रातील इतर प्रकल्पग्रस्तांना सुद्धा एकत्र केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
कॉम्रेड कृष्णा भोयर मेळाव्यास मार्गदर्शन करताना म्हणाले की वर्कर्स फेडरेशन ही वीज कंपन्यातील जुनी संघटना आहे.या संघटनेने ३५ हजार रोजंदारी कामगारांना कायम करणे,अप्रेंटिस,मयत कामगार वारसांना नोकरीत सामावून घेणे ही लढाई जिंकलेली आहे.प्रकल्पग्रस्त कामगारावर आज जो अन्याय होतो आहे,तो अन्याय ते संघटित झाले नाही त्यामुळे होत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे.समान कामाला समान वेतन दिले पाहिजे. त्याची अंमलबजावणी करणे व ६० वर्षापर्यंत प्रकल्पग्रस्तांना नोकरीत संरक्षण देणे या मागण्या तुम्ही आज केलेले आहे.या मागण्या पूर्ण करण्याकरीता संघटना प्रयत्न करेल अशी आश्वासन दिले.
कॉम्रेड मोहन शर्माची संबोधित करताना म्हणाले की, आपण अनेक वर्षानंतर आज संघटनेचा सभासदाचा स्वीकारलं हा एक चांगला निर्णय तुम्ही घेतलेला आहे. आता तुम्ही संघटित झाले पाहिजे.सुरुवातीला आपण प्रशासन व सरकार बरोबर चर्चा करू.चर्चेतून प्रश्न सुटला नाही तर आपल्याला एखाद्य आंदोलन सुद्धा करावे लागेल त्या आंदोलनाची जोरदार तयारी करा.एकत्र होऊन हा प्रश्न संघटना प्रशासना मांडला तर शंभर टक्के यश मिळेल. आपल्या सर्वांच्या भावना संघटनेच्या लक्षात आहे.त्या भावना लवकरच व्यवस्थापनाकडे पत्र लिहून चर्चेची मागणी करून मांडण्यात येतील जो निर्णय होईल तो तुम्हाला कळविण्यात येईल.आपण संघटन मजबूत करावी.४५० प्रकल्पग्रस्तांनीसंघटनेमध्ये प्रवेश केला याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो व संघटना अधिक मजबूत करण्याकरीता प्रयत्न करत रहा असे आवाहन त्यांनी केले.
स्थानिक पदाधिकारी यांनी आभार प्रदर्शन kele

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News