23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

    चंद्रपूर मतदार संघात आपण मंदिर स्वच्छता अभियानाला सुरवात केली असुन चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली मंदिरापासून आपण याचा शुभारंभ केला आहे. आज आपण चंद्रपूरातील प्राचीन काळाराम मंदिर येथे स्वच्छता अभियान राबविले असुन येत्या काही दिवसात चंद्रपूरातील विविध 100 श्रध्दा स्थानांची स्वच्छता करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

     आज शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरातील प्राचीन  असलेल्या काळाराम मंदिरात स्वच्छता अभियान राबविले. यावेळी श्री माता महाकाली महोत्सव समिती, चंद्रपूर महानगरपालिका आणि यंग चांदा ब्रिगेड या सामाजिक संघटनेने सहभाग घेतला होता. यावेळी मनपा आयुक्त विपिन पालिवाल, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, माता महाकाली महोत्सव समितीचे सचिव अजय जयस्वाल, विश्वस्त मलिंद गम्पावार, यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे, आदिवासी विभागाचे जिल्हा अध्यक्ष जितेश कुळमेथे, ग्रामीण तालुकाध्यक्ष राकेश पिंपळकर, सविता दंढारे, सायली येरणे, भाग्यश्री हांडे, आशा देशमूख, अल्का मेश्राम, शंकर दंतुलवार, राम मंढे, अॅड. परमहंस यादव, राहुल मोहुर्ले, हेरमन जोसेफ, देवा कुंटा, तापोष डे, बबलू मेश्राम आदींची उपस्थिती.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News