23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

धडक देऊन ट्रक पसार, पोलीस म्हणतात ट्रक सापडेल तेव्हा कारवाई करू रामनगर पोलीस ठाण्यासमोरील अपघातात एकाचा मृत्यू

धडक देऊन ट्रक पसार, पोलीस म्हणता: ३ मार्चची घटना

चंद्रपूर : पाच दिवसांपूर्वी रामनगर पोलीस ठाण्यासमोर एका भरधाव ट्रकने पादचारी युवकास धडक दिली. यात युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर घटनेनंतर ट्रकचालकाने समोर पोलीस ठाणे असतानाही ट्रक घेऊन पळ काढला. यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरूनच अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यातआला. मात्र, पाच दिवसाचा कालावधी लोटूनही पोलिसांनी अद्याप ट्रक चालकाला शोधून काढले नाही. त्यामुळे ट्रकचालकाचा शोध घेऊन अटक करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते हिमायू अली यांनी बुधवारी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात केली.

जलनगर येथील मुकेश देवराव शेंद्रे हा सावरकर चौकातून आपल्या घराकडे जलनगरकडे येत असताना भरधाव ट्रकने त्याला धडक दिली. यात मुकेश घटनास्थळीच ठार झाला. घटनेनंतर येथे गर्दी जमली रामनगर पोलिसांना माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. एका पोलीस कर्मचाऱ्यानेच या अपघाताची तक्रार नोंदविली. यात ट्रकने धडक दिल्याचे नमूद केले. मात्र, अपघातग्रस्त ट्रकचालक व ट्रक क्रमांकाविषयी काहीही नमूद नाही. मूल मार्ग आणि नागपूर मार्गावर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले असताही पोलिसांना धडक देणाऱ्या ट्रकचा शोध लागू नये, याबाबत हिमायू अली यांनी संशय व्यक्त केला आहे. अली यांनी याबाबत संबंधित तपासी अधिकाऱ्याला माहिती विचारली असता. ट्रकच्या क्रमांकाबाबत माहिती मिळाली की, अटक करू असे सांगत हात वर केल्याचा आरोप अली यांनी केला आहे.
मुकेश शेंद्रे हा विवाहित होता. त्याला दोन लहान मुलेसुद्धा आहेत. तो कुटुंबातील कमावता असल्याने कुटुंबीय उघड्यावर पडले आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयाला आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. परंतु, पोलीस ट्रक चालकाला अटक करण्यात हेतुपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचा आरोप अली यांनी केला आहे. दरम्यान, त्यांनी पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचीही भेट घेत या अपघातप्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून मृतकाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. पत्रकार परिषदला मृतकाचे वडील देवराव शेंदे्र, लहान भाऊ पपेश शेंदे उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News