Chandrapur🗞️
अमरावती येथील श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, आर्ट गॅलरी मोर्शी रोड ,अमरावती येथे दिनांक 20,21,22, सप्टेंबर 2024 ला राज्यस्तरीय भव्य छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनीचे आयोजन अंबा नगरी फोटो -व्हिडिओग्राफर असोसिएशन, अमरावतीला आयोजित करण्यात आले होते. प्रवास /उत्सव या विषयावर चंद्रपूर येथील छायाचित्रकार देवानंद साखरकर यांच्या छायाचित्र ला प्रथम पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
महाराष्ट्रातील लुप्त होणाऱ्या लोक कला जनतेपर्यंत छायाचित्राच्या माध्यमातून पोहोचवण्या साठी या स्पर्धा व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनीचे उद्घाटन दिनांक 20 सप्टेंबरला तर समारोपीय कार्यक्रम 22 सप्टेंबरला दुपारी घेण्यात आला. प्रसंगी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभा खासदार अनिल भाऊ बोंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे , कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महात्मा फुले बँकेचे अध्यक्ष दिलीप लोखंडे, पवन कहाते ,बानी सर, प्रशांत जैन, तसेच अंबा नगरी फोटो व्हिडिओग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेश वाडेकर, सचिव आकाश लोधे, तर प्रकल्प प्रमुख निलेश शाम चौधरी, मनीष जगताप, प्रतीक रोहनकर ,उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण पखाले तर आभार आकाश लोंधे यांनी मानले.
कार्यक्रमात व्यावसायिक गटात प्रथम पारितोषिक 11000 रुपये रोख ,स्मृतिचिन्ह, मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सुप्रसिद्ध छायाचित्रकार देवानंद साखरकर चंद्रपूर यांचा सन्मान करण्यात आला.
प्रवास व उत्सव
१) देवानंद साखरकर (प्रथम पारितोषिक)
२) राहुल चोडणकर (द्वितीय पारितोषिक)
३) सुजित म्हात्रे (तृतीय पारितोषिक)
अंबानगरी फोटो -व्हिडिओग्राफर्स असोसिएशन अमरावती तर्फे 14 वी राज्यस्तरीय भव्य छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनी चे आयोजन मोठ्या थाटामाटात करण्यात आले.