सार्वजनिक आरोग्य सेवा क्षेत्रात लॉईड्स इंफिनाईट फाऊंडेशनच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जातात. उत्तम आरोग्य सुविधा सामान्य नागरिकांपर्यंत पोचल्या पाहिजेत या गोष्टीवर लॉईड्स इंफिनाईट फाऊंडेशन (LIF) चा विशेष भर आहे. या साठी सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील अनेक कल्याणकरी उपक्रमांना लॉयड्स सक्रियपणे प्रोत्साहन देत आहे.
गेल्या वर्षभरात, फाउंडेशनने समाजातील विविध आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने प्रभावी उपक्रमांची मालिका यशस्वीपणे राबविली. एकूण 14 मेगा आरोग्य शिबिरांचे यशस्वी आयोजन केले गेले. या शिबिरांच्या माध्यमा तून 5,660 पेक्षा जास्त व्यक्तींना लाभ घेता आला. शिवाय, एलआयएफ (LIF) ने अनेक गावांमध्ये नेत्र तपासणीची सुविधा निर्माण केली आहे. याचा लाभ अनेक स्थानिकांना मिळाला आहे. या नेत्र तपासणी वर आधारित तब्बल 782 चष्म्याचे वितरण आजवर करण्यात आले आहे.
या प्रयत्नांव्यतिरिक्त, LIF ने एचआयव्ही, ब्लड प्रेशर, रक्त शर्करा (शुगर) आणि हिमोग्लोबिन (HB) चाचणी वर लक्ष केंद्रित केले आहे. नुकतेच LIF ने एका सामाजिक संस्थे सोबत संलग्न रित्या ट्रक ड्रायव्हर्ससाठी संपूर्ण आरोग्य चाचणी करणारी शिबिरे आयोजित केली.
घुग्गुस नगरपरिषदेला रुग्णवाहिका आणि अंत्यसंस्कार वाहन तसेच चंद्रपूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला प्रगत लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका देणगी स्वरुपात देऊन पायाभूत आरोग्यसेवा सुविधा वाढवण्यातही फाउंडेशनने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
शिवाय, LIF ने चंद्रपूर येथील वृद्धाश्रमातील वृद्ध रहिवाशांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. वृद्धा श्रमांना आर्थिक सहाय्य देणे, सार्वजनिक आरोग्य केंद्रे आणि वृद्धांच्या सुविधांसाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणांची तरतूद करणे, या सारखे उपक्रम राबविले आहेत. सामुदायिक आरोग्य सेवा सर्वांपर्यंत पोचल्या पाहिजेत आणि स्थानिक जनतेचे कल्याण झाले पाहिजे, या उद्देशाने LIF सातत्याने कार्यरत आहे.