राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ स्पर्धेत गोंडपिपरीच्या कु. स्वाती मधुकर देशमुख हिला प्रथम व आदर्श संजय नरुले याला द्वितीय राज्यस्तरीय पुरस्कार. राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ स्पर्धा 2023/ 24 मध्ये दलित मित्र वित्तू नागापुरे अद्यापक विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय पुरस्कार पटकाविला. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यातर्फे शिक्षकांसाठी दर्जेदार शिक्षण विडिओ निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे निकाल दि. २५ सप्टेंबरला जाहीर करण्यात आले, या स्पर्धेत दलित मित्र वि.तु.नागपुरे अध्यापक विद्यालय गोंडपिपरी येथे कु. स्वाती मधुकर देशमुख हीने विज्ञान विषयात प्रथम क्रमांक पटकाविला. सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व 50 हजार पुरस्काराचे स्वरूप आहे. व आदर्श संजय नरूले यांने शिक्षण प्रशिक्षणाशी निगडित आधुनिक विचार प्रवाह यामध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व 40 हजार रुपये. पुणे येथे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या महात्मा फुले सभागृहात या राज्यस्तरीय सोहळाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला उपस्थित मा. दीपक केसरकर (शालेय मंत्री शिक्षण मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य) शिक्षण प्रधान सचिव आय. ए. कुंदन शिक्षण आयुक्त सुरज मांढरे शिक्षण संचालक राहुल रेखावार.पुणे येथे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या महात्मा फुले सभागृहात या राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन केले होते शालिय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले आजच्या आधुनिक काळा मध्ये ऑनलाईन शिक्षणाला अन्य साधारण महत्व आहे. आधुनिक तंत्रामुळे डिजिटल शिक्षणाला वेगळेच महत्व व निर्माण झाले आहे. शिक्षक व विद्यार्थी या दोन्ही घटना प्रेरित करण्यासाठी शालीय शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी ही दर्जेदार न्द निर्मिती स्पर्धा आयोजित केली. राज्यातील अनेक शिक्षकांनी या स्पर्धेत भाग घेतला, ही आनंददायी बाब आहे.
राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ स्पर्धेत कु. स्वाती देशमुख प्रथम
RELATED ARTICLES