9,999 कन्यांचे कन्यापूजन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी पाच दिवसीय महोत्सवाचा समारोप
चंद्रपूरच्या मातेची पालखी निघावी हा संकल्प केला होता, त्याची सुरुवातही झाली. मात्र, या महोत्सवाला इतके भव्यत्व मिळेल याची कल्पना नव्हती. हे केवळ लोकसहभागामुळेच शक्य झाले. आपण दिलेल्या साठीनेच चंद्रपूरचा हा महोत्सव देशपातळीवर पोहोचला आहे. या महोत्सवाचे नियोजन चंद्रपूरकरांनी हातात घेऊन पाच दिवस निःस्वार्थ सेवा दिली. या ऐतिहासिक भव्य महाकाली महोत्सवाचे खरे शिल्पकार चंद्रपूरकरच असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
पाच दिवस चाललेल्या श्री माता महाकाली महोत्सवाचा 9,999 कन्यापूजन आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि महोत्सवात सेवा देणाऱ्या चंद्रपूरकरांच्या सन्मान कार्यक्रमाने समारोप करण्यात आला. या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, यंदा महोत्सवाचे तिसरे वर्ष साजरे केले. पाच दिवसांच्या महोत्सवामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. नागरिक आणि माता भक्तांनी केलेले सहकार्य कौतुकास्पद होते. हा चंद्रपूरकरांचा महोत्सव बनला आहे. पुढच्या वर्षी आपण पुन्हा या महोत्सवात याच उर्जेसह सहभागी होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मातेची नगर प्रदक्षिणा पालखी या महोत्सवाची आत्मा आहे. यंदाच्या पालखी शोभायात्रेची भव्यता आणि नियोजनबद्धता महोत्सवाला वेगळ्या उंचीवर नेणारी ठरली, असेही त्यांनी सांगितले.
9999 कन्यांचे पुजन आणि भोजन
श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने आयोजित महोत्सवात 9 हजार 999 कन्यांचे कन्यापूजन आणि कन्याभोजन कार्यक्रम पार पडला. यावेळी सर्व शक्तिरुपी कन्यांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन झाले. श्री माता महाकाली महोत्सव धार्मिक आणि उत्साही वातावरणात पार पडला.
माता महाकाली महोत्सवात जिल्हाभरातील 9 हजार 999 कन्यांचे कन्यापूजन आणि भोजन कार्यक्रम घेण्यात आला. यात विविध शाळांतील विद्यार्थिनींनीही सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी महाकाली मंदिर परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली होती. कन्यापूजनानंतर शक्तिरुपी कन्यांना महोत्सव समितीच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली. या आयोजनात सहकार्य करणाऱ्या