चंद्रपूर: चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित जनता महाविद्यालय, चंद्रपूर अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, जिल्हा विधी प्राधिकरण सेवा, चंद्रपूर आणि सायबर पोलीस ठाणे, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पॉक्सो ॲक्ट आणि सायबर गुन्हा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे सचिव डॉ. अशोकभाऊ जिवतोडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. आनी सोबतच भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रा. वी. एस. बोढाले, वाणिज्य शाखा उपप्राचार्य उपस्थित होते. तसेच प्रमुख वक्ते म्हणून श्री. सुमित व्ही. जोशी, सचिव जिल्हा विधी प्राधिकरण सेवा तथा दिवाणी न्यायाधीष वरीष्ठ स्तर आणि अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी, चंद्रपूर. सरांनी आपल्या पोक्सो ॲक्ट मार्गदर्शनात पोक्सो ॲक्ट कसा उदयास आला, त्याची का गरज पडली हे विद्यार्थांना विस्तृतपणे समजावून सांगितले.
तसेच श्री. मुजवर युसुफ अली, सायबर हायजीन प्रॅक्टिशनर, सायबर पोलीस ठाणे, चंद्रपूर यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांन्ना आपल्या व्ययक्तिक आयुष्यात इंटरनेट चा वापर करताना कशी काळजी घेतली पाहिजे हे पटवून दिले.
मंचावर आय. क्यू
ए. सी. समन्वयक डॉ. नाहिदा बेग, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर बलकी, राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख प्रा. प्रशांत बलकी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन, आभार प्रदर्शन प्रा. विनोद रामटेके यांनी केले आणि सोबतच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मुतीस उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमाकरिता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रासेयो स्वयंसेवक तोमेश येरगुडे आणि राष्ट्रीय छात्र सेना च्या कॅडेट्स नी विशेष मेहनत घेतली.
जनता महाविद्यालयात पॉक्सो ॲक्ट आणि सायबर गुन्हा जनजागृती कार्यक्रम.
RELATED ARTICLES