माजी नगरसेविका सौ. संगीता खांडेकर यांच्या हस्ते विठ्ठल मंदिरप्र भागात अंडरग्राऊंड नालीचे बांधकाम जोमात
चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील विठ्ठल मंदिर प्रभाग क्र. १५ येथे विठ्ठल मंदिर प्रभागातील मारपीट चौक येथे महानगरपालिकेच्या नगोध्दान या निधीमधून २५ लक्ष रुपये अथक प्रयत्नाने मंजुर करुन अंडरग्राऊंड नालीचे बांधकाम युध्द पातळीवर सुरु आहे. माजी नगरसेविका सौ. संगीता खांडेकर यांच्या शुभहस्ते कामाची सुरुवात करण्यात आली. अंडरग्राऊंड नाली हनुमान चौक चनकापूरे यांच्या घरापासून मारपीट चौक, भाग्यलक्ष्मी किराणा पर्यंत तर शांताराम गर्गेलवार ते मोडकवार ते नागपूरे यांच्या घरापर्यंत अंडरग्राऊंड नाली बांधकाम सुरु आहे.