चंद्रपूर- गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धेमध्ये येथील सरदार पटेल महाविद्यालयाने सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होऊन सर्वाधिक पारितोषिक पटकावून ‘चॅम्पियनशिप’ प्राप्त केली आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आंतर महाविद्यालयीन विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात कोलाज स्पर्धेत उत्कर्ष बारापात्रे, समूह गीत मध्ये अभय प्रजापती व चमू, मूकनाट्य मध्ये सौरभ उईके, तर ‘वेस्टर्न इन्स्ट्रुमेंटल’ मध्ये जेरीमिया एव्हलुरी,वेस्टर्न ग्रुप स्पर्धेत शानिया चौहान यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ‘क्ले मॉडेलिंग’ मध्ये शिवम जुनघरे,वादविवाद मध्ये उमाकांत मिश्रा आणि श्रुती मोहितकर,यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. फोटोग्राफी मध्ये प्रणय वाढवे, वक्तृत्व मध्ये उमाकांत मिश्रा,सुगम संगीत मध्ये आदित्य शिंदेकर, लोकनृत्य मध्ये दिव्या बारसागडे आणि समूह, ‘वेस्टर्न सोलो’ स्पर्धेत शानिया चौहान या सर्वांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशात सर्वोदय शिक्षण मंडळाचे पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाचे डॉ.अजय बेले, प्रा. प्रमोद गंगासागर, प्रा.योगिता खोब्रागडे व प्रा.लीना ठाकरे यांच्यासह सर्व प्राध्यापकांचे सामुहिक प्रयत्न व विद्यार्थांच्या परिश्रमाचा महत्वाचा वाटा असल्याची प्रतिक्रिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर यांनी दिली.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल यांनी यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर व उपप्राचार्य डॉ.स्वप्नील माधमशेट्टीवार तसेच सर्व प्राध्यापकवृदांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या यशात डॉ. अजय बेले यांच्यासह प्रा. संदेश पाथर्डे, डॉ. सपना वेगीनवार,डॉ. निलेश चिमूरकर, डॉ. बिरादर, डॉ. संजय उराडे, डॉ. अनिता मत्ते डॉ. भारती दिखित, डॉ. आशा सोनी, प्रा. लीना ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.