महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमोहत्सव आयोजित करून प्रथम आलेल्या बालगृहातील लाभार्थ्यांची विभागस्तरीय बालमहोत्स्वात स्पर्धेत भाग घेण्याकरिता निवड केली जाते
या स्पर्धेत शासकीय निरीक्षण गृह / बालगृह ,स्वयंसेवी संस्था, व इतर शाळेतील विद्यार्थी भाग घेत असतात.
स्वयंसेवी संस्थेतील अपुऱ्या सुविधा उपलब्ध असताना तसेच मानधनी कर्मचारी असताना सुद्धा या संस्थेतील बालकांनी प्राप्त केलेले यश कौतुकास्पद आहे.
पुढील राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा यश प्राप्त करतील अशी आशा वक्त करतो
विभागस्तरीय चाचा नेहरू बालमोहत्सव नागपूर येथे दिनांक 12 ते 14 फेब्रुवारी या तीन दिवसीय स्पर्धेत लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था ब्रम्हपुरी द्वारा संचलित स्वामी विवेकानंद बालगृह,नागभीड जिल्हा चंद्रपूर येथील लाभार्थानी 6 ते 12 वयोगटातील कबड्डी स्पर्धेत प्रथम , खो खो स्पर्धेत प्रथम व 100 मीटर धावणे स्पर्धेत दुसरा तर 13 ते 18 वयोगटातील खो खो स्पर्धेत प्रथम तर कबड्डी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला व श्रीमती अपर्णा कोल्हे मॅडम,विभागीय उपायुक्त, महिला व बालविकास नागपूर विभाग नागपूर यांच्या शुभहस्ते व इतर पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले .सदर बालगृह नागपूर विभागात अव्वल आल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेला .या यशाबद्दल जिल्ह्यात स्वामी विवेकानंद बालगृह नागभीड या संस्थेचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. या स्पर्धेत यशस्वी होण्याकरिता संस्थेचे संस्थापक पुरुषोत्तम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली बालगृहाचे अधीक्षक नरेंद्र बोरकर , गृहपिता रवींद्र राणे यांनी अथक परिश्रम केले.