CRPF डेल्टा कंपनी 09 बटालियनच्या वतीने महाप्रसाद
यचली – विलास बोन्डे (प्रतिनिधी 28 फरवारी 25)
. शिवरात्र निमित्य रामप्पा जत्रा महोत्सव मन्नेराजाराम पोलीस मदत केंद्र CRPF डेल्टा कंपनी 09 बटालियन च्या वतिने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले या महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतलेला
यचली महाराष्ट्र – छत्तीसगड सीमेलगत विजापूर जिल्ह्यात इंद्रावती नदीच्या जवळ रामप्पा जत्रा महोत्सव दरवर्षी महाशिवरात्र निमित्त होत असते या जत्रा महोत्सवात गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, अहेरी, शिरोचा तालुक्यातील अति दुर्बंग भागात असलेले भाविक जत्रेत सहभागी होत असतात. छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यात इंद्रावती नदीच्या जवळ ही जत्रा भरत असते या जत्रेला परिसरातील हजारो भाविक इंद्रावती नदीपात्रातून कंबरभर पाणी प्रवाहातून भाविकांना नदी पार करावी लागतात भाविक आपापल्या श्रद्धेपोटी लहान मुले, महिला, पुरुष व आपल्या कुटुंबासह दुर दुरून जत्रेला येत असतात या जत्रेनिमित्त येणाऱ्या भाविका करिता मन्नेराजाराम मदत केंद्र CRPF डेल्टा कंपनी 09 बटालियनच्या वतीने 26 फरवारी 25 ला यात्रा भाविका करिता महप्रसाद व उपासची साबुदाणा खिचाडी वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले