चंद्रपूर
बालाजी वार्ड स्थित गोपाळकृष्ण उद्यान महिला योग ग्रुप च्या वतीने जागतिक महिला दिना निमित्य कार्यक्रम साजरा करण्यात आला
. सावित्रीबाई फुले पुण्यतिथी व जागतिक महिला दिवस यांचा सुयोग संगम या कार्यक्रमा निमित्य आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला मळ्यार्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भोयर मॅडम, आशा बुरटकर, पौर्णिमा गहूकर, उर्मिला तल्हार आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदा जोशी यांनी केले महिला दिनाची सुरुवात व त्याचे कारण या संदर्भातली विविध माहिती आजच्या महिलांची स्थिती याबाबत माधुरी पन्नासे यांनी मार्गदर्शन केले सावित्रीबाई फुले यांचे कार्याचे वर्णन करणारे गीत व पती-पत्नीचा गमतीदार संवाद साधना पन्नासे यांनी सादर केले आधुनिक स्त्रीच्या संदर्भात इंदिरा पडवेकर यांनी गीत सादर केले गुरुदेव सेवा मंडळाच्या महिला संघटिका व भाजपच्या माजी नगरसेविका अनुराधा हजारे यांनी महिलांना मार्गदर्शन केले आरोग्यासाठी योग किती उपयुक्त आहे यासंदर्भात सविस्तर माहिती सांगितली सुनंदा उपगंगावार यांनी पौराणिक काळ व आज या संदर्भात महिलांची भूमिका याबद्दल मार्गदर्शन केले माजी नगरसेवक प्रशांत दानव योग प्रशिक्षक ईश्वर गहूकर कोटकर साहेब यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला वार्डातील अनेक महिलांचा सहभाग लाभला योग वर्गातील सर्व महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या फेरण नृत्य व आरती करून कार्यक्रमाची सांगतात करण्यात आली सर्व महिलांनी अलपोहार घेतला कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुनंदा उपगंगावर यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता वार्डातली सर्व महिलांचा सहभाग होता,
गोपाळकृष्ण उद्यान महिला योग ग्रुप च्या वतीने जागतिक महिला दिन साजरा
RELATED ARTICLES