खासदार प्रतिभा धानोरकर या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे दिसुन येत आहे. खासदार धानोरकर यांनी निवडून आल्यानंतर 18 जुलै 2024 रोजी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव तसेच, महाप्रबंधक दक्षिण-पुर्व-मध्ये रेल्वे यांना पत्र पाठवून गोंदिया-बल्लारशहा रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची मागणी केली होती. त्या मागणी ला यश प्राप्त झाले असून 04 एप्रिल 2025 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सदर मार्गाच्या दुहेरीकरणासाठी 4819 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे समस्या संदर्भात वारंवार आढावा घेऊर चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील रेल्वे समस्या दुर करण्याच्या संदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे चे जाळे मजबूत करण्यासंदर्भात त्यांनी आपले मत व्यक्त केले होते. बल्लारशर-गोंदिया रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी देखील मा. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वरील प्रकल्पा संदर्भात सकारात्मक असल्याचे आश्वासन दिले होते. खासदार धानोरकर यांच्या मागणीला यश आल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसह गडचिरोली, भंडारा, गोंदिया येथील नागरीकांना देखील याचा लाभ होणार आहे. या संदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र सरकार व रेल्वे मंत्री यांचे आभार मानले आहे.