Wednesday, November 19, 2025
Google search engine
spot_img

बेपत्ता महिलेबाबत संपर्क करण्याचे आवाहन*

चंद्रपूर वार्ता , दि. 4 एप्रिल :

कोणालाही न सांगता घरून निघून गेलेल्या महिलेबाबत काही माहिती असल्यास संपर्क करण्याचे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.

मितलेश नेहरु देवागंन (वय २५ वर्षे) रा. गोपालपुरी आनंदनगर चंद्रपूर यांनी 26 मार्च रोजी चंद्रपूर शहर पोलिस स्टेशनला तक्रार दिली की, त्यांची पत्नी वामनी मितलेश देवागंन रा. गोपालपुरी आंनदनगर ही घरी कोणाला काही न सांगता घरून निघुन गेली. पत्नी वामनी नेहमी मोबाईलवर बोलत असल्याने तिला टोकले असता ती फिर्यादीला घर सोडून जाण्याची धमकी देत होती. तिचा वार्डात, आजुबाजुला शोध घेतला असता ती मिळून आली नाही. तसेच पठाणपुरा, गांधी चौक, जटपुरा वार्ड, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, महाकाली मंदीर परिसरात तसेच नातेवाईकांना फोन करून विचारपुस केली असता ती आली नसल्याचे सांगितले.

*बेपत्ता महिलेचे वर्णन :* उंची -5 फूट 1 इंच, रंग-गोरा, केस-काळे लांब, डोळे- लहान काळे, चेहरा- गोल, नाक-सरळ, अंगात निळया रंगाचा नाईट गाउन, पायात स्लीपर चप्पल असून सदर महिला कोणाला आढळल्यास पोस्टे. चंद्रपूर शहर येथे कळवावे.

००००००

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments