Monday, July 14, 2025
Google search engine

नोंदणी व मुद्रांक विभागातील ‘गट-ड’ संवर्गातील पद भरती*. मध्यस्थांपासून उमेदवारांनी सावध रहावे*

*मध्यस्थांपासून उमेदवारांनी सावध रहावे*

*Ø नोंदणी व मुद्रांक विभागातील ‘गट-ड’ संवर्गातील पद भरती*

चंद्रपूर,दि. 17 : नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई ‘गट-ड’ संवर्गातील 284 पदभरती करीता 22 एप्रिल 2025 रोजी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर भरती प्रक्रिया पूण करणे, ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारणे तसेच ऑनलाईन पध्दतीने परिक्षेचे आयोजन करण्याकरिता आय.बी.पी.एस. (इंस्टीट्यूट ऑफ बँकीग पर्सोनेल सिलेक्शन) कंपनीस नियुक्त केले आहे. त्यानुसार आय.बी.पी.एस. कडून 22 एप्रिल ते 16 मे 2025 दरम्यान ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरून घेण्यात आले आहेत.

आय.बी.पी.एस.च्या संकेतस्थळावर यशस्वीरीत्या भरलेले अर्ज व पात्र असलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा 1 ते 8 जुलै 2025 या कालावधीत घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेचे प्रवेशपत्र/हॉलतिकीट उमेदवारास त्यांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर आय.बी.पी.एस. कडून पाठविण्यात येणार आहे.

सदर परीक्षेकरीता विभागाकडून कोणत्याही इतर एजन्सीची वा मध्यस्थाची नेमणूक करण्यात आलेली नाही. जर याबाबत कोणती व्यक्त्ती, संस्थेकडून, मध्यस्थ अथवा तशी बतावणी करण्यात येत असल्यास अशा व्यक्ती वा संस्थेपासून उमेदवारांनी कृपया सावध राहावे, असे आवाहन नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रविंद्र विनवडे यांनी केले आहे.

००००००

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments