Monday, July 14, 2025
Google search engine

उच्च प्राथमिक शाळा सालोरीचे शिक्षक अरुण भोयर यांच्या विरोधात खोट्या सह्याची बाब उघड. शिक्षक अरुण भोयर विरोधात केलेल्या तक्रारीत अशोक राऊत या शिक्षकांनी गावाकऱ्यांच्या खोट सांगून सह्या केल्याची धक्कादायक माहिती आली समोर.

चंद्रपूर वार्ता

उच्च प्राथमिक शाळा सालोरीचे शिक्षक अरुण भोयर यांच्या विरोधात खोट्या सह्याची बाब उघड.

शिक्षक अरुण भोयर विरोधात केलेल्या तक्रारीत अशोक राऊत या शिक्षकांनी गावाकऱ्यांच्या खोट सांगून सह्या केल्याची धक्कादायक माहिती आली समोर.

वरोरा प्रतिनिधी:-

जि.प. उच्च प्राथमिक शाळा, सालोरी येथे शिक्षक म्हणून कार्यरत अरुण भोयर यांच्या विरोधात छडयंत्र रचून त्याचं शाळेतील शिक्षक अशोक राऊत यांनी सालोरी गावातील नागरिकांच्या वेगळे कारण सांगून जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली व त्यांचेवर विभागीय चौकशी लावून त्यांना नाहक त्रास दिला असल्याची धक्कादायक वाब आता समोर आली असून या विरोधात सालोरी गावातील नागरिकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे याविषयी स्पष्टीकरण करून शिक्षक अरुण भोयर हे निर्दोष असल्याचे म्हटले आहें, दरम्यान आता खोटी तक्रार करणारे अशोक राऊत चौकशीच्या घेऱ्यात आले असूनत्यांचेवर निलंबानाची कारवाई करावी अशी मागणी होतं आहें.

मिळालेल्या माहितीनुसार सालोरी गावातील उच्च प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून जबाबदारीने काम करणारे अरुण भोयर यांचेशी अशोक राऊत यांचा व्यक्तीगत वाद असल्याने अशोक राऊत त्यांनी गावातील काही नागरिकांच्या विभागीय चौकशी प्रकरणात सालोरी गावातील ग्रामस्थानांच्या खोटया सहया मारून अरुण भोयर यांना नाहक बदनाम केले होते व विभागीय चौकशी पण झाली त्या संदर्भात प्रकरण प्रशासनाकडे न्यायप्रविष्ट आहें, मात्र या प्रकरणात ज्या तक्रार कर्त्याच्या सह्या होत्या त्या तक्रार कर्त्यांनीचं आम्ही शिक्षक अरुण भोयर यांच्या विरोधात तक्रार केलेली नाही अशा प्रकारचे निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्याने शिक्षक अरुण भोयर यांच्यावर नाहक आरोप करणाऱ्या अशोक राऊत यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होतं आहें.

सालोरी गावातील त्या गावाकऱ्यांचे काय आहें म्हणणे.

अशोक राऊत तत्कालीन विषय शिक्षक, जि.प. उच्च प्राथमिक शाळा, सालोरी यांनी अरूण रामचंद्र भोयर, तत्कालीन प्राथमिक शिक्षक, जि.प. उच्च प्राथमिक शाळा, सालोरी यांच्या विभागीय चौकशी प्रकरणांत सादर केलेली सालोरी गावातील ग्रामस्थाच्या तक्रारीतील सह्या ह्या खोट्या आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडे गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहें की तकारकर्ता अशोक राऊत, तत्कालीन विषय शिक्षक, जि. प. उच्च प्राथमिक शाळा, सालोरी, यांनी प्राथमिक चौकशीचे वेळी त्यांनी आपल्या तकारीसोबत जी ग्रामस्थानच्या स्वाक्षरीची यादी सादर केली आहे त्या यादीतील अनुक्रमांकावर आमची नावे टाकुन आमच्या नावाने खोटया सहया केल्या आहेत आणि शिक्षक अरुण भोयर यांच्या विरोधात आम्ही तक्रार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments