चंद्रपूर
सर्वोदय शिक्षण मंडळ संचालित, सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, येथील अर्थशास्त्र विभागाकडून पी.एम. उषा स्कीम अंतर्गत जी. एस. सी. RUSA याद्वारे तज्ज्ञांचे विचार, ज्ञान आणि माहिती विद्यार्थ्यांना मिळावे,याकरिता “Certificate course on Importance and Participation of Economics subject in Competitive Examination”, या विषयावर वर आयोजन करण्यात आले होते त्या अंतर्गत शैक्षणिक सहलीचे आयोजन 3 सप्टेंबर 2025 रोजी यशस्वीपणे पार पडले या सहलीतील सहभागी विद्यार्थी अतिशय समाधानी आणि खुश झाले.
या सहलीला प्रा. पुष्पांजली कांबळे काटकर मॅडम प्रामुख्याने उपस्थित राहून त्यांनी विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत केला आणि मोलाचे सहकार्य केले.
अंबुजा फाउंडेशन उपरवाही येथील कौशल्य विकास फाउंडेशन या ठिकाणी सहल आयोजित केली बारावी पास विद्यार्थ्यांकरीता कौशल्यावर आधारित अनेक कोर्सेस डिप्लोमा आयटीआय उपलब्ध आहेत त्या सर्वांची प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्माण करण्याकरिता एक महिना चार महिने सहा महिन्याचे कोर्सेस त्या ठिकाणी अतिशय अल्प दरात विद्यार्थ्यां करिता आयोजित केले जातात
त्या ठिकाणी प्राचार्य श्री प्रमोद खडसे सर, श्रीयुत श्री नरेश सुभे सीनियर प्लेसमेंट एक्झिक्युटिव्ह, श्री तेजराज हेपटे प्लेसमेंट एक्झिक्यूटिव्ह, श्री रवी मडावी मोबिलायझर एक्झिक्यूटिव्ह संदीप तोडे फिटर ट्रेनर धर्मेंद्र बेलोरकर वेल्डर ट्रेनर पवन इलेक्ट्रिशियन ट्रेलर श्रीनिवास पोटारला आयटी ट्रेनर, प्रांजूग्र गौरकर जी डी ए ट्रेनर प्रफुल बोरकुटे सॉफ्ट स्किल ट्रेनर सुजित मूडपल्लीवार असिस्टंट इलेक्ट्रिशियन उमेश जुनघरे इलेक्ट्रिशियन ट्रेलर प्रवीण कन्नाके फिटर ट्रेनर सारिका बोलली जीडीए ट्रेनर विना विनू एम आय एस ऑफिस आणि कौन्सिलर नवज्योत निरांजने असिस्टंट इलेक्ट्रिशियन अमित चौधरी ऑफिस बॉय इत्यादी सर्वांनी प्रात्यक्षिकांवर आधारित कौशल्य विकास कार्यक्रमाचे ट्रेनिंग कशा पद्धतीने दिले जाते आम्हाला प्रात्यक्षिक रूम मध्ये नेऊन खूपच महत्त्वाची आणि विद्यार्थ्यांना रोजगार मिळविण्याकरिता कशी आवश्यक आहे आणि अतिशय अल्प दरात विद्यार्थी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतात आपल्यामध्ये विकास आणि कौशल्य निर्माण करू शकतात तसेच त्यांना रोजगारापर्यंत नेण्याकरिता त्यांचे कसे प्रयत्न असतात याबद्दल अतिशय मार्मिक आणि पद्धतशीर अशी माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली.
त्यानंतर बॉटनिकल गार्डन येथे स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्त तज्ञांचे मार्गदर्शन महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना मिळाले त्या ठिकाणी असलेले टेक्निक्स सुद्धा प्रात्यक्षिकांद्वारे RFO श्री प्रकाश झाडे आणि प्रोजेक्ट ऑफिसर श्री सचिन उमरे यांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण बॉटनिकल गार्डन आणि त्याबाबतची अतिशय चांगली आणि स्पष्टीकरणात्मक माहिती विद्यार्थ्यांना दिली
सरदार पटेल महाविद्यालयाच्या वतीने विशेष भेटवस्तू तसेच महाविद्यालयाचे वार्षिकांक शब्दगंधा देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे आयोजक आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शरयू पोतनूरवार यांनी ही सहल आपल्या अर्थशास्त्र विभागातील कार्यरत प्राध्यापकांच्या सहाय्याने आयोजित केली.
प्रा. वैशाली नंदुरकर , प्रा. तुषार आवळे , प्रा. प्रेक्षणा बागेसर, प्रा.आकाश वाळके , श्री. अमर शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल, यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.




