Sunday, February 15, 2026
Google search engine
spot_img

चंद्रपूर वार्ता

काँग्रेसमधील अंतर्गतवाद उघड

विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात नेता निवडीवरुन वाद; प्रदेशाध्यक्ष घेणार बैठक

महापालिकेतील गटनेता निवडीवरून काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला असून ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील संघर्ष चांगलाच टोकाला पोहोचल्याचे दिसत आहे.गटनेता निवडीच्या प्रक्रियेतून हा वाद उफाळून आला असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचा गटनेता कोण असावा, यावरून दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी गंभीर आरोप करत, काँग्रेसमधील काही नगरसेवकांना विजय वडेट्टीवार यांनी पळवल्याचा दावा केला आहे. या आरोपांमुळे पक्षातील अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर आला असून, कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाची स्थिती आहे.प्रदेशाध्यक्ष घेणार बैठक

दरम्यान, चंद्रपूरमधील हा वाढता संघर्ष शमवण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्या नागपुरात दाखल होणार आहेत. सपकाळ हे दोन्ही नेत्यांची स्वतंत्र तसेच संयुक्त बैठक घेऊन समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या बैठकीत चंद्रपूर महापालिकेतील गटनेता निवड, नगरसेवकांचे आरोप-प्रत्यारोप आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने संघटनात्मक एकता यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

या महत्त्वाच्या बैठकीला काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचे प्रतिनिधी, AICC चे प्रभारी आणि विदर्भातील महापालिका निवडणूक प्रमुख कुणाल चौधरी हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या वादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नात असल्याचे दिसत आहे.

चंद्रपूर महापालिकेतील अंतर्गत संघर्षामुळे काँग्रेसला फटका बसू नये, यासाठी नेतृत्वाकडून प्रयत्न सुरू असले तरी दोन्ही नेत्यांमधील हा वाद नेमका कसा सुटतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
#Chandrapur wartha #Marathinews #NewsUpdate

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments